"पुढच्या वर्षी नक्की या... ."

Hello, माइक चेक...., एक दोन तीन चार...गणपतीचा..., कृपया मंडळांनी वाहनांची गर्दी करू नये..., गणपती बाप्पा मोरया... पुढच्या..., निर्माल्य तळ्यामध्ये टाकू नका..., स्त्रियांनी लहान मुले व गळ्यातील दागिने सांभाळावित..., पाणी बोटल..पाणी..पाणी बोटल..., तुझको फिरसे जलवा दिखाना ही...., मंगलमूर्ति मोरया....,, रात्रीचे जवळपास बारा एक वाजले असतानाचे चित्र आहे हे. फुटाळा तळ्यावरचे. विजांचा सौम्य कड़कड़ाट, सोबतच ढोल ताश्यांच्या गजरामध्ये गणरायाला निरोप देण्यासाठी अगदी शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक चालू होती. अगदी वेगळ्याच स्वरूपाची विसर्जन मिरवणूक पहायला मिळाली. ना DJ होता. ना बैंड वा झांज पथक. ना कसला गोंधळ. मंडळ असो वा घरगुती बाप्पा असो, सर्वजण आपापल्या बाप्पाला घेऊन जल्लोषात, कोणी ट्रक तर कोणी ट्रैक्टर मधून येत होते. तर कोणी आपल्याच चारचाकी मधून किंवा चक्क बैलगाडीतून आपल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी आले होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता. अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्ति सर्वजण खुप खुश होते. काही लालबागच्या राण्यांचा उत्साहही अगदी पाहन्याजोगा होता. सगळ्यांच्या उत्साहाला का...