Posts

Showing posts from May, 2019

सपनों का IdiotBox/0.1

अजूनही मी स्वप्नातच होतो. पूर्ण रात्र त्या चौकातच उभा होतो. या गल्लीतून त्या गल्लीत घिरट्या घालत होतो. काळजीने मन चलबिचल झाले होते. मला समजत नव्हते की, ती कुठे गेली असावी.!! घरी नाहीय, चौकातल्या कट्टयावर नाहीय, मग गेली तरी कुठे.?? ती हरवली तरी नसेल.!! रात्रीचे जवळपास साडेतीन चार वाजले होते. सर्वत्र भयान शांतता असताना मी मात्र त्या चौकात सैरावैरा फेऱ्या मारत होतो. माझी नजर फक्त तिचाच शोध घेत होती. कारण, काही तासांपुर्वीच आम्ही एकत्र त्या कट्टयावर बसलो होतो. आम्ही म्हणजे ती, मी, आणि तिची आई.!! माझी आणि तिच्या आईची खूप चांगली ओळख होती. तशी तिची आणि माझी सुद्धा ओळख फार जुनी होती. पण ती नुसती ओळखी पुरतीच मर्यादीत. रात्रीचे पाय मोकळे करायचे म्हणून ते दोघे घरातून बाहेर आले होते. म्हणूनच मी सुद्धा त्या दोघांना जॉईन झालो होतो. रात्रीच्या त्या थंड हवेत तिला पाहताना अंगावर एक वेगळेच शहारे येत होते. अधून मधून येणारी एक हलकीशी झुळूक तिच्या चेहऱ्यावरील विस्कळीत केसांसोबत वेगळाच खेळ खेळत होती. आपल्याच विश्वात वावरणारी, मनातलं कधी ओठांवर न आणणारी ती. मी तिला फक्त लांबूनच पाहत होतो. कारण, माझ्यास