Posts

Showing posts from January, 2020

सपनों का IdiotBox//0.3

मेस्ट्रो (चोरी नाही अपहरण) शेजारच्या घरातून ऐकायला येणारी कुजबुज नेहमीच माझी झोपमोड करणारी ठरायची. कधी दिवसां कधी मध्यरात्री. एक शब्द न शब्द त्यांच्या संवादातील माझ्या कानावर पडायचे. Actually तो संवाद नसायचाच. ती एक कुजबुज असायची स्पष्ट ऐकू न येणारी पण झोपमोड करून जाणारी. असं वाटायचं जणू काही त्यांच्यामध्ये एखादी दहशतवादी मिटिंग चालू असावी. आणि त्यांचं नेक्स्ट टार्गेट मीच आहे. जेव्हा त्यांना समजेल की, त्याच्या मिटींग मधील एक शब्द न शब्द मी ऐकत असतो. त्या क्षणीच ते माझ्यावर सहकुटुंब हल्लाबोल करणारे होते. असो, डिग्रीचे दिवस सुरू होते. दुसऱ्याच दिवशी माझ्या एका न सुटणाऱ्या अवघड विषयाची फायनल exam होती. अन् मी त्या दहशतवादी कुटूंबाची कुजबुज ऐकत अभ्यासाचे नियोजन करीत होतो. वेळापत्रक पाहताक्षणी माहीत झाले होते की, दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी थंडीमध्ये कुडकुडत परीक्षेला जावे लागणार. पण मला थंडीपेक्षा त्या गोल्डन विषयाचं जास्ती टेन्शन होतं. कारण, जर यावेळीही मी त्या विषयात नापास झालो, तर माझं पूर्ण वर्ष पुन्हा एकदा बेकार जाण्याच्या मार्गावर होते. माझ्यासोबत माझा मित्र "प्रा" सुद