Posts

Showing posts from June, 2019

ओय हमाली.!!

Image
Exactly, बरोबर ऐकलंय तुम्ही. पण कुठे ऐकलं असेल.?? रेल्वे स्टेशन. बस स्टँड. विमानतळ मध्ये हमाली असतो की नाही याची मलाही कल्पना नाहीय. पण असेलही कदाचित. तोच हमाली जो आपण लोकांनी लहानपणी पाहिला असेल. बच्चनच्या कूली मध्ये किंवा लक्ष्याच्या हमाल दे धमाल मध्ये. खाकी पेहरावात रुबाबदार मिश्या आणि त्यावर इस्त्री मारलेली तशीच खाकी टोपी. सोबत खांद्यावर ती लाल बावट्याची निशाणी म्हणून टाकलेला लाल रुमाल. रेल्वे आली रे आली पटकन मळलेली तंबाखू तोंडात टाकायची आणि तडक प्रवाश्यांच्या बॅगा डोक्यावर घ्यायच्या. पुढे हमाली आणि मागे त्या बॅगेचा मालक हे चित्र आपण सर्वांनी पाहिलेलं असेल. किमान गोविंदाच्या कूली नं.1 मध्ये तरी पाहिला असेलच. पण, त्या रात्री जेव्हा मी आणि माझा मित्र एका बस स्टँडवर गेलो होतो, तेव्हा त्या बस स्टँडवर एका वयस्क माणसाने आम्हाला हाक दिली. "ओय हमाली.!!""" नाही.... अशी हाक नव्हती मारली त्याने. पण त्याचा त्या हाकेमागचा उद्देश तोच असावा. "अरे पोरांनो... मला थोडी माझी सायकल बसवरून काढून देता का रे.?!" अतिशय क्षीण आवाजात त्याने आम्हाला विनंती केली. प

सपनों का IdiotBox//0.2

Image
"Mother इंडिया एक्सप्रेस" भारतीय रेल्वेची पेपरला जाहिरात आली होती की, लोको पायलट हव्या आहेत म्हणून. शिक्षण, वयोमर्यादा, अनुभव याचा काहीच उल्लेख नसल्याने खुश होऊन माझ्या mother इंडियाने हा फॉर्म भरला होता. कथित बेरोजगारीच्या या भीषण आगीत आमच्यासाठी ही सुवर्णसंधी आयतीच घरामध्ये चालून आली होती. आणि माझी आई, माझी mother इंडिया भारतीय रेल्वेमध्ये लोको पायलट पदावर रुजू झाली होती. Actually हे स्वप्न मला दोन पार्ट मध्ये पडलं होतं. म्हणजे सलग दोन दिवशी थोडं थोडं पाठोपाठ. असं चुकूनच होत असेल कदाचित. So, पहिल्या पार्ट मध्ये माझी mother इंडिया भारतीय रेल्वेत लोको पायलट म्हणून, आपल्या पहिल्या दिवशीच्या ड्युटीवर डायरेक्ट रेल्वे इंजिन मध्ये हजर झालेली असते. माझी आई रेल्वेत पायलट झाली याचा सर्वात जास्त आनंद मलाच झालेला असतो. कारण गेली दीड एक वर्षे मी बिनपगारी घरीच बसून होतो. त्यामुळे एक सुशिक्षित बेरोजगाराचे स्वप्न एक बेरोजगार आईच समजू शकते. Nokia1100 मॉडेलचं टॉर्चही चालू न करता येणारी माझी mom भारतीय रेल्वेची एक्सप्रेस कशी चालवेल याचा मी अगोदर विचारच केला नव्हता. पण हा विचार न केल्य