सपनों का IdiotBox//0.2

"Mother इंडिया एक्सप्रेस"

भारतीय रेल्वेची पेपरला जाहिरात आली होती की, लोको पायलट हव्या आहेत म्हणून. शिक्षण, वयोमर्यादा, अनुभव याचा काहीच उल्लेख नसल्याने खुश होऊन माझ्या mother इंडियाने हा फॉर्म भरला होता. कथित बेरोजगारीच्या या भीषण आगीत आमच्यासाठी ही सुवर्णसंधी आयतीच घरामध्ये चालून आली होती. आणि माझी आई, माझी mother इंडिया भारतीय रेल्वेमध्ये लोको पायलट पदावर रुजू झाली होती.

Actually हे स्वप्न मला दोन पार्ट मध्ये पडलं होतं. म्हणजे सलग दोन दिवशी थोडं थोडं पाठोपाठ. असं चुकूनच होत असेल कदाचित.
So, पहिल्या पार्ट मध्ये माझी mother इंडिया भारतीय रेल्वेत लोको पायलट म्हणून, आपल्या पहिल्या दिवशीच्या ड्युटीवर डायरेक्ट रेल्वे इंजिन मध्ये हजर झालेली असते. माझी आई रेल्वेत पायलट झाली याचा सर्वात जास्त आनंद मलाच झालेला असतो. कारण गेली दीड एक वर्षे मी बिनपगारी घरीच बसून होतो. त्यामुळे एक सुशिक्षित बेरोजगाराचे स्वप्न एक बेरोजगार आईच समजू शकते.

Nokia1100 मॉडेलचं टॉर्चही चालू न करता येणारी माझी mom भारतीय रेल्वेची एक्सप्रेस कशी चालवेल याचा मी अगोदर विचारच केला नव्हता. पण हा विचार न केल्याचं प्रायश्चित्त मला दुसऱ्या दिवशीच मिळालं होतं.

पहिल्या दिवशी मी आईच्या मागे हट्ट धरून अगदी लहान मुलांसारखं तिच्या मागोमाग तिच्यासोबत ड्युटीवर हजर झालो होतो. एका आईसोबत एक मुलगा चालेल अशी सवलतच रेल्वेने खास महिला लोकोपायलट साठी दिलेली होती. मी खूप खुश होतो. पहिल्यांदाच रेल्वे इंजिन मध्ये बसलो होतो. आईने कशीबशी ट्रेन चालू केली. रेल्वे धावत होती. ट्रेन घाटाघाटांतुन वळणे घेत डोंगरदऱ्याचा सफर करत होती. पण यामध्ये एक छोटासा प्रॉब्लेम होत असतो. आमचं इंजिन हे अधूनमधून बंद पडत असतं. कदाचित एअर पकडत असावं.

इंजिन बंद पडलं की आम्ही काहीतरी खटाटोप करून पुन्हा इंजिन चालू करायचो आणि पुन्हा ट्रेन पळवायचो. एकदा दोनदा करत करत एअर काढून इंजिन पळवायची आम्हाला सवयच झाली होती. अगदी भन्नाट होतं आमचं इंजिन आणि इंजिनची पायलट सुद्धा.!!
कारण तिला मी सिग्नल द्यायला सांगितलं, हॉर्न द्यायला सांगितलं की, काहीतरी वेगळाच खटका दाबून ती रिकामी व्हायची. त्यामुळे घाबरून काहीही न दाबता चुपचाप ट्रेन चालवण्याचा सल्ला मी तिला दिला होता.
फक्त ज्यावेळी इंजिन बंद पडेल, त्यावेळी आई तो नेहमीचा ओळखीचा झालेला स्वीच दाबायची. आणि मी ऑईल बदली केल्यासारखं काहीतरी करायचो. आणि पुन्हा तो ओळखीचा स्वीच प्रेस करून आम्ही ट्रेन पळवायचो. अशाप्रकारे आमची पहिल्या दिवशीची ड्युटी जवळपास संपली होती. आणि माझ्या स्वप्नाचा पहिला पार्टही.


Next Day,
दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे माझ्या mother इंडिया सोबत मी सुद्धा इंजिन मध्ये हजर झालेला होतो. तसं पहायला गेलं तर त्या इंजिनचा अर्धा पायलट हा मीसुद्धा होतो. कारण बंद पडलेलं इंजिन चालू करण्याचं तंत्र हे फक्त मलाच अवगत झालेलं होतं.
दुसऱ्या दिवशीही पुन्हा त्याच घाटांतून, डोंगरदऱ्यातुन आमची mother इंडिया एक्सप्रेस सफर करत असते. पण अनपेक्षित पणे आमची ट्रेन अचानक एका काळ्याकुट्ट अंधारी भुयारात बंद पडते. आजूबाजूला भयानक घनदाट जंगल, तो काळाकुट्ट भुयार आणि अचानक बंद पडलेलं आमचं इंजिन. या गोंधळात माझे इंजिनचे एअर काढण्याचं तंत्र पूर्णपणे फेल गेलं होतं. काहींकेल्या ते इंजिन स्टार्टच होत नव्हतं. शेवटी वैतागून जाऊन आम्ही दोघे त्या इंजिनमधून बाहेर पडतो. भुयारातून बाहेर पडल्यावर जवळच एक नाश्ता टपरी असते. थोडीशी विश्रांती म्हणून आम्ही दोघे त्या टपरीवर जातो.

पण मला थोडीशी चिंता लागली होती. कारण इंजिन बंद पडलं की आम्ही नेहमीप्रमाणे तो ओळखीचा स्वीच दाबायचो, ऑईल टाकीचे झाकण उघडायचो, टाकीची एअर बाहेर पडली की पुन्हा आम्ही ते ओळखीचं बटन प्रेस करून आमचं इंजिन चालू करायचो. पण यावेळेस हे सर्व प्रयत्न वाया गेले होते.
मी टपरीच्या मालकाला सुध्दा विचारून पाहिलं की यांवर काही उपाय शोधता येईल का.?? पण त्याचं लक्ष्य फक्त आमच्या खाण्याकडेच होतं. त्याला फक्त आमच्या पैश्याशी मतलब होता. मी माझ्या mother इंडियाकडे पाहिलं. जी नुसता खाण्यातच बिजी होती. तिच्याकडे बघून असं वाटत होतं की, भारतीय रेल्वेने खूप मोठी चूक केली आहे. कारण कोणतंही विशेष ट्रेनिंग न देता त्यांनी मोठ्या भरवश्याने माझ्या momला एका एक्सप्रेसच्या पायलटची वर्दी दिली होती. पण तिला साधं हॉर्नही वाजवता जमत नव्हतं.

इतक्यात माझ्या लक्ष्यात आलं की, आपल्या इंजिनच्या मागे काही प्रवासी डब्बे सुद्धा आहेत. ज्यामध्ये खूप प्रवासी प्रवास करत आहेत. आणि त्यांना आम्ही तिथेच त्या भुयारात सोडून आलेलो आहोत. याहूनही भयंकर म्हणजे इंजिन बंद आहे असा कोणताही सिग्नल आम्ही पुढे पास केला नव्हता.
मी खूपच घाबरलो होतो. मला तो धनुष आणि कीर्ती सुरेशचा साऊथ पिक्चर आठवत होता. ज्यामध्ये त्यांचंसुद्धा इंजिन बिघडलेलं असतं. आणि इंजिनच्या दोन्ही पायलटचा खून झालेला असतो. बिना पायलट ट्रेन धावत असते. त्याला कोणीच थांबवणे शक्य नसतं. अशा वेळी धनुषला ते इंजिन डब्यापासून वेगळं करून सेन्ट्रलच्या गोडावून मध्ये धडकवण्याची जबाबदारी दिलेली असते. धोका पत्करून.

पण, आमची परिस्थिती थोडी वेगळी होती. आमचे इंजिन बंद पडले होते. जे चालूच होत नव्हते. आणि आम्हाला समोरून एखादी दुसरी ट्रेन येऊन धडकन्याचा डेंजर धोका होता. ज्यामुळे दोन्ही ट्रेन मधील प्रवासी अगदी लहान मुलांपासून सगळेच मरण पावणार होते. तेही फक्त आम्हा दोघांमुळे.
परंतु mother इंडिया फक्त खाण्यातच बिजी होती. तिला याची काही कल्पनाच नव्हती. मी लागलीच खडबडून जागा होऊन टेबलवरून उठलो आणि ओरडत भुयाराकडे धावत सुटलो. काहीही करून मला ते इंजिन स्टार्ट करून एखादा सिग्नल कंट्रोल रूमकडे पास करायचा होता. पाठोपाठ आईसुद्धा इंजिनमध्ये पोचली होती. थोडंसं गांभीर्याने आम्ही पुन्हा तो ओळखीचा स्वीच दाबून ऑईलच्या टाकीतील एअर काढण्याचा प्रयत्न केला. जमतील ते सर्व प्रयत्न केल्यावर कसंबसं आमचं इंजिन पुन्हा चालू झालं.

मी आईला तातडीने एखादा सिग्नल कंट्रोल रूमकडे पास करायला सांगितला. पण तिच्या हातून ते काम जमण्याची चिन्हे धुसरच होती. एखादं बटन खटका स्विच दाबलं की काहीतरी वेगळंच चालू होतंय, असं ती सांगत होती. कसंबसं चालू केलेलं इंजिन पुन्हा बंद पडायला नको यासाठी काहीही न दाबता आमची एक्सप्रेस तशीच धावत होती.

इतक्यात,
"अरे उठ लवकर. सात वाजत आलेत. तो झिरो बलचा/ नाईट लॅम्पचा खटका बंद कर लवकर.!!"

इंजिनचे खटके माहीत नाहीत, पण नाईट लॅम्पचा खटका बंद केल्यावर माझ्या मनाला थोडीफार शांती मिळाली. अश्याप्रकारे पुन्हा ड्युटीवर न जाण्याचे ठरवून माझ्या आईने भारतीय रेल्वेचा राजीनामा दिलेला आहे. सोबतच आमची "mother इंडिया एक्सप्रेस" कायमची सेवेतून कालवश करण्यात आलेली आहे.❤





_whosunilmali

Comments

Popular posts from this blog

ओय हमाली.!!

Once upon a time in बुधवार पेठ,

"काळू"