Posts

Showing posts from October, 2019

"ताजे चिरमुरे"

Image
खुप दिवसांपासून मनात कोणता विषयच तयार होत नव्हता. काय लिहावे, कोणत्या विषयावर लिहावे, कसे लिहावे, लिहिलेलं इतरांना आवडेल का.?! असे खूप प्रश्न शोधत असताना अचानक एक रिक्षा दिसली, जी बाजूच्या गल्लीतून आवाज करत निघत होती. लक्षात ठेवा बाग. नारळाची बाग.. . सगळ्यांना सांगा बाग. नारळाची बाग.. . विसरू नका नारळाची बाग.. . पहिल्यांदा ऐकुन खूप गमतीशीर वाटलं. पण नंतर समजले की, काही दिवसांनी येणाऱ्या निवडणुकीसाठीचा हा प्रचार चालू आहे. काही वेळाने ती रिक्षा गल्लीचे चार पाच फेऱ्या मारून निघून गेली. पण मनातील प्रश्न अजूनही त्याच जागी होते. त्यांना कोणता विषयच सापडत नव्हता. वेळ निघून जात होती. दुपारचेअंदाजे बारा एक वाजणार होते. पोटाची भूकही हळूहळू वाढत होती. पण डोळ्यांना नकळत थोडीशी डुलकी लागणार इतक्यात नेहमीच्या वेळी ऐकू येणारे ते शब्द हळुवार कानावर येऊन पडत होते, "ताजे चिरमुरे.. . ताजे चिरमुरे.. .'' लहान असल्यापासून चिरमुरे विषयी एक वेगळंच आकर्षण असायचं. तात्पुरती भूक म्हणून चहासोबत आम्ही नेहमी चिरमुरे खायचो. मंदिराच्या ठिकाणी सुद्धा प्रसाद म्हणून सर्रासपणे चिरमुरेच वाटले जातात.