Posts

Showing posts from October, 2018

"ती"

Image
Ti........, निसर्ग आणि प्रेम यांचं एक अतूट नातं आहे. निसर्गामधील प्रत्येक अशी गोष्ट जी प्रेमाशी मिळतीजुळती असते. जसे की, मी, तो पौर्णिमेचा चंद्र आणि "ती"""""" त्या चंद्रासारखंच आहे तिचं सौंदर्य, निर्मळ असं........ त्याच्या शुभ्र प्रकाशात मी तिलाच शोधत असतो, कधी लहान तर कधी मोठा होत असतो तो, अगदी तिच्या सौंदर्या सारखाचं, पण मला नाही फरक पडत, मी वाट पाहतच असतो, कधी पहाटे तर कधी रात्रि, पण काळजी तेव्हाच वाटते, जेव्हा ती अचानक एक दिवस गायब होते, त्या अमावस्येच्या रात्रि......... तरीही, मी भान हरपुन जातो, लक्ष नसतं की, त्या चंद्रासोबत खुप चांदण्या सुद्धा आहेत, चांदण्या लुकलुकत आहेत, आपलं सुद्धा सौंदर्य दाखवायचा प्रयत्न करीत आहेत, भांडत आहेत, त्या प्रयत्ना मध्ये तुटून पडत ही आहेत, पण तुला पाहण्यासाठी आतुर झालेले मन, त्या तुटलेल्या ताऱ्यांना पाहुन अपेक्ष्या ठेवणंच विसरून गेले आहे. मन मात्र, तुझाच चेहरा शोधन्यात मग्न आहे. तू काळजी नको करू, मी ही त्या ध्रुव ताऱ्यासारखाच आहे. कदाचित तुलाही न दिसणारा, त्याच जागी, त्याच वेळी,

मी नाना पाटेकर नव्हेच..!!

Image
श्री महालक्ष्मी प्रसन्न... श्री तुळजाभवानी प्रसन्न... जय भवानी जय जिजाऊ............आणखी काय असतं बरं, ते येणाऱ्या नऊ दिवसांमध्ये दिसेलच. पण मी मागील नऊ दिवसांचा विचार करत होतो. न्यूज़पेपर चाळत होतो. कारण कुठेतरी ऐकायला भेटत होते की, नाना पाटेकर यांनी एका महिलेशी छेड़छाड़ करण्याचा प्रयत्न केला. "असा नट होणे नाही." म्हणून मोठ्या दिमाखात नटसम्राट मी सुद्धा पाहिला होता. त्यामुळेच माझ्यासाठीही क्षणभर खात्री पटणे अशक्यच होते. पण "असाही नट होऊ शकतो." हेही तितकेच खरे असावे. त्यामुळेच, शहानिशा करण्यासाठी म्हणून खुप गांभीर्याने शोध घेत होतो. अगदी मागील नऊ दिवसांचे सर्व न्यूज़पेपर चाळून पाहिले. पण कुठेच नाना दिसत नव्हते. आणि इतक्यात ते दिसणार ही नव्हते. कारण सर्वजण मी नाना नव्हेच. मी आलोकनाथ नव्हेच. मी रजत भाटिया नव्हेच. असंच बोलत होते. आणि त्यांचेही बरोबरच आहे. कारण त्यांच्या दृष्टीने कदाचित छेड़छाड़ प्रकरण ही इतकी गांभीर्याची गोष्ट नसावी. पण त्याचवेळी कुठेतरी जाणीव होत होती की, आपण अजूनही त्याच संस्कृतीप्रधान देशात आहोत. ज्या देशामध्ये जेव्हा एखादा पुरुष एख