Posts

Showing posts from December, 2020

Once upon a time in बुधवार पेठ,

Image
 सुरुवातीपासूनच सुरू करतो. साधी सरळ गोष्ट आहे, स्टार्ट to एंड. हा किस्सा अश्या दोन मित्रांचा आहे, ज्यांनी त्यांच्या ऐन जवानीच्या वयात अजूनही "बुधवार पेठ" पाहिलेली नसते.  पुण्यातील बुधवार पेठ.  श्री दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेऊन अनिल आणि सुनिल दोघेही बुधवार पेठच्या शोधात व्यस्त होतात. मी मुद्दामहुंन ही दोन नांवे निवडली आहेत, जेणेकरून कहाणीला थोडा आपलेपणा येईल आणि त्यामध्ये लिहताना वाचताना थोडी सत्यात जाणवेल अन्यथा त्यातील कोणत्याही पात्र, क्षण किंवा घटनेचा वास्तव्य किंवा माझ्या वैयक्तिक नावाशी, चरित्राशी वगैरे संबंध जोडण्याचा चावट आगावपणा कोणी करू नका. Okay, अनिल आणि सुनिल यांनी बुधवार पेठ केव्हाच पाहिलेली नसते. पण त्यांना गावातील, कॉलेजमधील त्यांच्या मित्रांनी सांगितलेलं असतं की, दगडूशेठ गणपती मंदिर जवळच पेठेची गल्ली आहे. म्हणूनच श्री गणेशा करून भर उन्हात ते दोघे खांद्यावर कपड्याची बॅग घेऊन मंदिराच्या आवारात घिरट्या घालण्यास सुरूवात करतात. बुधवार पेठ म्हंटल की लोकांच्या आवाजाचे volume आपोआपच कमी होते, कारण, बुधवार पेठ म्हणजे भारतातील, महाराष्ट्रातील वेश्या व्यवसायासाठी प्र

अर्धवट राहिलेला लक्ष्या.. .

Image
  खरंतर नव्वदीच्या आधीपासून सर्वांची टीव्ही पाहण्याची सुरुवात ही लक्ष्या आणि अशोक मामा पासूनच होते, आज अशोकमामा ना पाहिलं की लक्ष्याची आठवण झाली नाही असं होणार नाही, आज जर लक्ष्मीकांत असते तर त्यांचाही चेहरा अशोक मामा सारखा फुगीर झाला असता, त्यांच्याही चेहऱ्यावर बारीक दिसणारे सुरकुते दिसले असते, त्यांचेही डोळे वयोमानाने खंगले असते, जसे अशोक मामाचे केस पिकलेत, तसेच लक्ष्मीकांत यांचेही केस पिकले असते, खरंतर त्यांना कोणी लक्ष्मीकांत म्हणतच नसत, कारण, त्यांच्या प्रत्येक सिनेमांमध्ये ते नेहमी ''लक्ष्या" च असायचे, जो मरताक्षणीच सर्वांचा लाडका "लक्ष्मीकांत बेर्डे" होऊन गेला, लहानपणी बाटलीतला गंगाराम पाहिला होता, लाल रंग पाहून अंगातली पावर गायब होऊन गुंडांचा मार खाणारा लक्ष्या पाहिला होता, तात्या विंचू जेव्हा लक्ष्याच्या छाताडावर बसून 'ओम क्लिंम क्लिंम ओम भट्ट स्वाहा.. ' म्हणतो तेव्हा घामेघुम सैरावैरा झालेला लक्ष्यासुध्दा एक बोलका बाहुलाच वाटायचा, आज जर लक्ष्मीकांत असते तर कदाचित झपाटलेलाचे सुध्दा गोलमाल हॅरी पॉटर सारखे पार्टवर पार्ट निघाले असते, धडाकेबाज गंगाराम