Once upon a time in बुधवार पेठ,

 सुरुवातीपासूनच सुरू करतो. साधी सरळ गोष्ट आहे, स्टार्ट to एंड. हा किस्सा अश्या दोन मित्रांचा आहे, ज्यांनी त्यांच्या ऐन जवानीच्या वयात अजूनही "बुधवार पेठ" पाहिलेली नसते.  पुण्यातील बुधवार पेठ. 

श्री दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेऊन अनिल आणि सुनिल दोघेही बुधवार पेठच्या शोधात व्यस्त होतात. मी मुद्दामहुंन ही दोन नांवे निवडली आहेत, जेणेकरून कहाणीला थोडा आपलेपणा येईल आणि त्यामध्ये लिहताना वाचताना थोडी सत्यात जाणवेल अन्यथा त्यातील कोणत्याही पात्र, क्षण किंवा घटनेचा वास्तव्य किंवा माझ्या वैयक्तिक नावाशी, चरित्राशी वगैरे संबंध जोडण्याचा चावट आगावपणा कोणी करू नका. Okay,

अनिल आणि सुनिल यांनी बुधवार पेठ केव्हाच पाहिलेली नसते. पण त्यांना गावातील, कॉलेजमधील त्यांच्या मित्रांनी सांगितलेलं असतं की, दगडूशेठ गणपती मंदिर जवळच पेठेची गल्ली आहे. म्हणूनच श्री गणेशा करून भर उन्हात ते दोघे खांद्यावर कपड्याची बॅग घेऊन मंदिराच्या आवारात घिरट्या घालण्यास सुरूवात करतात.

बुधवार पेठ म्हंटल की लोकांच्या आवाजाचे volume आपोआपच कमी होते, कारण, बुधवार पेठ म्हणजे भारतातील, महाराष्ट्रातील वेश्या व्यवसायासाठी प्रसिद्ध असणारे एक ठिकाण. जिथे एकापेक्षा एक दर्जेदार माल मिळतो असं त्या भाषेत बोललं जातं. म्हणजे फ़क्त तिनशे रुपयांत फुल्ल मौजमस्ती असं मोठ्या उत्साहाने गावातील तरुण पोरं बुधवार पेठेविषयी बोलताना अनिल सुनिल ने कित्येक वेळा ऐकलं होतं. पेठेच्या गल्लीत एन्ट्री मारली की मर्द गडी फुल्ल आउट होऊन जातो, एवढंच काय तर तिथल्या स्त्रिया आत जाणाऱ्या पुरुषांच्या गळ्यात हात घालून त्यांना जबरदस्तीने त्यांच्या खोलीत घेऊन जातात, वगैरे वगैरे गोष्टी ऐकल्या असल्याने ते पूर्ण चित्र जशेच्या तसे त्यांच्या नजरेसमोर उभे राहिले होते. पण, फ़क्त चित्रच. कारण, त्यांना अजून त्या पेठेचे दर्शन होणार होते. त्याची त्यांना तशी उत्सुकताच लागलेली होती.


पण, बुधवार पेठ असो, किंवा सांगलीमधील गोकुळनगर असो, किंवा नागपूर मधील कामठीपुरा असो, अश्या ठिकाणी जाणे असभ्यपणाचे लक्षण समजले जाते. वेश्याकडे जाणे, त्यांच्याशी संबंध ठेवणे अश्या गोष्टी कोणीही उघडपणे करत नसतात. त्याविषयी उघड बोलतही नसतात. कारण, त्यामुळे त्या वेश्या गल्लीत जाऊन येणाऱ्या व्यक्तीच्या चारित्र्यवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होत असते. अश्या भीतीमुळेच अनिल सुनिल ने अश्या ठिकाणी पाऊल टाकणे कधी पसंद केले नव्हते. पण नुकतेच वयात आलेले तरुण मुलं, बायकोशी भांडून दूर झालेले नवरे, गर्लफ्रेंड सोबत ब्रेकअप झालेले लव्हरबॉय, आयुष्यात एकाकी पडलेले, या न त्या कारणांमुळे लग्न होऊ न शकलेले तरुण शरीर सुखाच्या शोधात, चलबिचल मनाला थोडासा स्वल्पविराम देण्याच्या उद्देशाने का असेना वरील सर्व मंडळी या वेश्या गल्लीचे एकदा का होईना दर्शन घेण्याचा निर्णय घेत असतात.


अनिल व सुनिल दोघे कॉलेजपासूनचे मित्र असतात. एकाच कंपनीत काम करत असलेने दोघांची नेहमी चांगली जमलेली असते. त्याच कंपनीच्या कामानिमित्त त्या दिवशी ते दोघे पुण्यात भर सकाळी पोचलेले असतात. पण, कंपनी कामासोबतच बुधवार पेठेला यंदा नक्की गाठ द्यायचीच या इराद्याने दोघेही सकाळी लवकर काम आटपून लागलीच दगडूशेठच्या चरणी दाखल झालेले असतात. त्या दोघांमध्ये अनिलचे कॉलेजपासूनच कोणत्या न कोणत्या मुलीसोबत अफेयर राहिलेले असते. त्यामुळे सेक्स ही गोष्ट अनिलसाठी तशी जुनीच होती. तशी त्याने स्वतः कबुलीही दिली होती. पण, सुनिलसाठी मात्र सेक्स, शारीरिक संबंध या गोष्टी फ़क्त ऐकून व मोबाईलमध्ये पॉर्नफ़िल्म पुरत्याच मर्यादित होत्या. कारण, ईच्छा असूनही सुनिलच्या हातून असे कृत्य कधी घडलेच नव्हते किंवा कोणत्याही मुलीसोबत सेक्स पर्यंतचा प्रसंग घडून येण्याचा योगायोगही जुळून आला नव्हता. त्यामुळेच, या गोष्टीची सुनिलला नेहमी खंत असायची. 

सेक्स म्हणजे काय असते, तो कसा केला जातो, त्याची पद्धत कोणती असते, त्याची नेमकी गरज काय असते, त्याचे कोणते चांगले वाईट परिणामही असतात का, स्त्रियांचा स्पर्श कसा असतो, त्यात अशी कोणती जादू असते, आपल्याला सेक्स करताना काही प्रॉब्लेम तरी येणार नाही ना, कंडोमचा वापर कसा केला जातो, सेक्सच्या बाबतीत आपण कमी/मागे तरी राहणार नाही ना, नग्न स्त्री प्रत्यक्षात कशी दिसते, तिचे ते कमनीय, मदमस्त मादक रुप, तिच्या मोहक अदा, नजरेतील आग यांपुढे आपला निभाव तरी लागेल ना???? पहिल्यांदा नग्न स्त्री पाहिली की लवकर शीघ्रपतन होते, असं मित्रांच्या बोलण्यातून सुनिलने वारंवार ऐकले होते. त्यामुळे वरील सर्व प्रश्नांची उत्तरे शोधणे म्हणजे सुनिलसाठी एक चॅलेंजच बनून गेले होते.


दुपारची वेळ असल्याने उन्हाची तीव्रता जाणवू लागली होती. खांद्यावर अगोदरच बॅगेचे ओझे होते, त्यात सकाळपासून पोटभर काही न खाल्लेने मंदीराबाहेर एका टपरीवर दोघेही सरबत घेण्यासाठी म्हणून थांबलेले असतात. आजूबाजूला लोकांची ये जा चालूच होती. सरबत घेत घेत सुनिल कोणाला तरी बुधवार पेठचा नेमका एड्रेस विचारण्याच्या प्रयत्नात होता. पण तसे धाडस काही त्याच्याकडून होत नव्हते. कारण, बुधवार पेठ असं ऐकूनच कोणीतरी कानाखाली जोरात आवाज काढला तर भर रस्त्यात आपल्या अब्रूचे धिंडवडे निघायला नकोत, याची त्याला भीती होती, आणि असेही आजूबाजूला मंदिराच्या सुरक्षेसाठी तैनात पोलिसांना पाहून दोघांनीही चूपचाप सरबत पिणेच पसंद केले. शेवटी दोघांनीही आपापले मोबाईल सुरू केले, गूगल मॅप ओपन केले आणि त्यामध्ये लोकेशन सर्च केले, ''दगडूशेठ गणपती मंदिर ते बुधवार पेठ.''

गुगलने दिलेल्या मार्गावर दोघेही चालू लागले होते, पण गुगलचे दक्षिण उत्तर आणि प्रत्यक्षात असलेले दक्षिण उत्तर यामध्ये दोघांचीही गफलत होत होती. पर्यायाने तीन बाजूंचे रस्ते थोड्या थोड्या अंतरावर जाऊन झाडाझडती करून झाले होते. पण, बुधवार पेठेत असणारी रोषणाई त्या रस्त्यांवर कुठेच दिसत नव्हती. परदेशात येऊन चुकलेल्या एखाद्या भारतीयांप्रमाणे त्या दोघांची अवस्था बनलेली असते. शेवटी शिल्लक राहिलेल्या एका रस्त्याच्या बाजूने दोघेही चालू लागतात. मोठ्या आशेने त्यांच्या नजरा बुधवार पेठेतील ते ऐकलेले चित्र शोधत असतात. हातात गूगल मॅप चालूच असतो. खालीवर नजर टाकत दोघेही जसजसे पुढे जात असतात, तेवढ्यात अचानक दोघे बाईपुरुष/छक्के त्या दोघांच्या हातातून त्यांचे मोबाईल हिसकावून घेतात. अनिल सुनिल दोघेही अचानक भांबंरुन जातात, आजूबाजूला पाहतात तर काही मोडक्या तोडक्या घरांच्या दरवाजाबाहेर काही स्त्रिया भडक लिपस्टिक लावून, अस्थाव्यस्थ खुर्चीवर पाय टाकून, साडीचा पदर निम्मा जमिनीवर लोळत सोडून विचित्र नजरेने त्या दोघांकडे पाहत आहेत. सुरुवातीला अचानक मोबाईल हिसकावून घेतलेने काहीच सुचेनासे झाले होते, तेवढ्यात काही आणखी स्त्रिया त्यांच्या जवळ येऊन त्यांचा हात हातात घेऊन त्यांना विचारू लागले, ''क्या रे चिकने, माल चाहीये क्या, कौन सा चाहीये बता, चायनीज, बंगाली कौनसा चाहीये बता,

त्या दोघांच्या अंगावर शहारे आलेले असतात. एकाच वेळी चार पाच जणांचा घोळका निरनिराळ्या पद्धतीने हिसके देऊन शर्ट ओढत मर्जी नसतानाही काहीही विचारण्याचा प्रयत्न करीत होता. काही समजून येण्याच्या आत त्या चार पाच बाई पुरुषांच्या घोळक्याने त्यांना एका छोट्याशा खोलीत ओढून जबरदस्तीने खेचून घेऊन जातात. पायातील चप्पल गडबडीने तसेच बाहेर काढून अनिल सुनिल दोघे आत खोलीत पोचतात. तर त्या ठिकाणी आणखी काही तरुण मुली छोट्या छोट्या कपड्यांमध्ये कॉटवर बसलेल्या झोपलेल्या दिसतात. त्यातीलच काही मुली पटकन त्या दोघांना पाहून कॉटवरून उठून दोघांजवळ येतात आणि स्वतःचे कपडे उतरवू लागतात. त्या दोघांचा हात हातात घेऊन त्यांच्या इच्छेविरुद्ध त्या मुली नको नको त्या ठिकाणी हात लावण्यास प्रवृत्त करतात.  "अरे इधर क्या झक मारने को आया क्या, मर्द हैं ना रे तुम लोग, डरते क्यू हो, पेहले किया नहीं क्या, नंगी लडकी देखी नहीं क्या, अरे भडवे दबा ना, क्या देख रहा हैं इधर उधर, नीचे हाथ लगा, नीचे देख नीचे, चल हट्ट.. . चुतीये.. . साले किसीं काम के नहीं हैं, लडकी देख के शर्मा रहे हैं, निकाल सालो को बाहर, दिखना मत कभी इधर.. . चल निकल,""" असं म्हणत त्या दोघांना त्या खोलीतून बाहेर ढकलून देण्यात येते. 

घामेघुम चेहरे घेऊन दोघेही कसेबसे आपल्या चपला सावरत खोलीतुन बाहेर रस्त्यावर येतात, आणि नरकातून बाहेर आल्या प्रमाणे सुटकेचा श्वास सोडतात. त्याच गोंधळात अनिल सुनिल दोघेही त्यांच्याशी बोलण्याचा त्यांना समजवण्याचाही प्रयत्न करीत असतात, पण त्या स्त्रिया मुलींना नेमके आंटी, दीदी, चाची, मॅडम, की भैय्या नेमके कोणत्या उच्चाराने बोलवायचे हेच त्यांना समजत नव्हते. आणि तरीही त्यांना समजावून असं काय समजावणार होते ते दोघे. "सॉरी दीदी, हम इधर गलती सें आये हैं, हमे मालूम नहीं था, हम ऍड्रेस भूल चुके थे, दोबारा नहीं आयेंगे, हमे छोड दो, हमारा मोबाईल वापस देदो प्लीज दीदी, प्लीज मॅडम, सॉरी, हमे कोई लडकी वडकी नहीं चाहीये, हमे बाहर छोड दो, हम पेहली बार यहां आये हैं, हमे सच में मालूम नहीं हैं, प्लीज, प्लीज... . ." त्यांच्या या मासुम याचनेकडे पाहूनच त्या स्त्रियांनी त्यांना बाहेर ढकलून दिले होते. 



एकंदरीत तो सर्व प्रकार खूप विभस्त्र व घाणेरडा होता. हा सगळा प्रकार फ़क्त दहा एक मिनिटांचाच होता, पण अंगावर काटे आणणारा होता. एका क्षणासाठी त्या दोघांना असे वाटले होते की आता या स्त्रिया त्यांची इज्जत लुटतात की काय! जेमतेम खोली, एका कोपऱ्यात एक कॉट तर दुसऱ्या कोपऱ्यात त्याच मुलींचे उघडे बाथरूम ते सर्व दृश्य पाहून उलटी आल्यासारखे जाणवत होते.

गुगल मॅपच्या नादात ते दोघे एका भलत्याच भुरट्या ठिकाणी जाऊन पोचले होते. बुधवार पेठ म्हणजे एक प्रशस्त वाडा आहे, तिथे कोणत्याही प्रकारची गर्दी, गलिच्छ दुर्गंधी नाही, एका पेक्षा एक इंपोर्टेड मुली बायका असतात तिथे, आपल्या मर्जीने रेटनुसार मुलगी निवडायची, कोणतीही जबरदस्ती लूटमार नाही, एकदम सिस्टीमॅटिक ऑफिशियल वेश्या अड्डा म्हणजे बुधवार पेठ,!! असे   ज्या प्रकारे कॉलेज मित्रांनी बुधवार पेठचे वर्णन केले होते तसे त्या छोट्याश्या घाणेरड्या खोलीत काहीच नव्हते. लोकेशन नुसार गुगल मॅप संपूर्ण बुधवार पेठचा रस्ता दाखवत होते. पण, बुधवार पेठेतील ती कोठी, तो वेश्या अड्डा कोठे आहे हे नेमके गूगल दाखवत नव्हते, बहुतेक गूगल सुध्दा अश्या असभ्य गोष्टी दाखवत नसावे कदाचित. 

खांद्यावरची बॅग सांभाळत दोघे त्या रस्त्यापासून दूर मुख्य रस्त्यावर आले. छातीतील धडधड अजूनही सुरूच होती. काही अपप्रसंग घडायच्या आत आपण इथून निघून जाऊया अशी विनवणी सुनिल अनिलला करू लागला होता. "अनिल भावा, पहिला इथून निघ, कोणीतरी तोंडाला काळे फासण्याअगोदर इथून बाहेर पडू, आजवर आपल्या सोबत कोणी अशी छेडछाड करण्याचं साहस केलं नाही, पण आज या लोकांनी आपली इज्जत लुटली असती.  शेण खाणे म्हणजे काय! याचं उत्तर मला आज मिळालं आहे, गप्पगुमान गणपतीचे दर्शन घेऊन घरी गेलो असतो, उगाच त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची खाज कुठून सुचली, देवाची शप्पथ आता पुन्हा कधी इकडे येणार नाही.. .""

तोंडावर आलेला घाम पुसत पुसत सुनिलची बडबड सुरूच होती. पश्चाताप झाल्याची जाणीव त्याच्या बोलण्यातुन होत होती, स्वतःच स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणे याचं ताजं उदाहरण ते दोघे स्वतः होते. अनिल मात्र अजूनही शांतच होता, त्याच्या डोक्यात काय सुरू होते याचा अंदाज अजून लागला नाही तोच, मुख्य रस्त्यावरून काही तरुण पोरांचा घोळका त्यांच्याजवळ येऊन उभा राहतो. त्यांच्यापैकी एकजण अनिलला विचारतो, "भाऊ, बुधवार पेठकडे जाणारा रस्ता हाच आहे ना? जिथे माल मारायला मिळतात!!,"

प्रश्नार्थक नजरेने अनिल त्यांना उत्तर देतो, "नक्की माहीत नाही मित्रांनो, आम्ही सुध्दा तिकडेच जात आहोत, पण आम्हालाही पत्ता सापडत नाहीये, चला आपण सगळे मिळून शोधुया," त्यांनी सुद्धा तसा होकार दिला, आणि अनिल त्यांच्या ग्रुपमध्ये सामील झाला. सुनिलला काही समजत नव्हते, कुठे जावं, अनिलच्या डोक्यात नक्की काय शिजत आहे, याचा सपशेल अंदाज आता सुनिलला आला होता. अनिलला त्याची वासना कोणत्याही किंमतीत शमवायची होती. रिकाम्या हाती परत जाणे त्याला मान्य नव्हते. स्वर्गाच्या दरवाजापाशी येऊन स्वर्गातील अप्सरांचे दर्शन न घेताच माघारी परतणे म्हणजे आलेली सुवर्णसंधी गमावल्यासारखे त्याला वाटत होते. त्या पोरांचा घोळका बघून त्याच्या या मनसूब्याला बळच मिळाले होते. दहा बारा तरुण यंग पोलीस भरती करणाऱ्या तरुणांच्या मोठा घोळका बघून कोणीही जबरदस्ती लूटमार करण्याचे धाडस करणार नाही याची अनिलला खात्री झाली होती. गमावलेला उत्साह पुन्हा त्याच्या चेहऱ्यावर बहरू लागला होता, तोसुद्धा आता त्या गँगमधलाच बनून गेला होता. नाईलाजाने सुनिलही त्यांच्या पाठोपाठ बुधवार पेठच्या त्या कोठीचा शोध घेण्यात सामील झाला. बेफिकीर होऊन आजूबाजूंच्या लोकांना ती मुले कोठीचा ऍड्रेस विचारत होतीे. त्यामुळे साहजिकच पूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध असणारी बुधवार पेठची ती रंगबेरंगी कोठीचे दर्शन प्रत्यक्ष होणारे होते. 



जसजसे ते सर्व कोठीच्या नजदीक जात होते, तसतसे त्या मायाजाल असणाऱ्या कोठीची झलक रस्त्याच्या दुतर्फा दिसून येत होती. जागोजागी काही तरुण मुली हातवारे करून त्या तरुण पोरांना आकर्षित करीत होत्या, आपल्या कमनीय शरीराचे अनोख्या शैलीत प्रदर्शन करून भुरळ पाडण्याचा त्या प्रयत्न करीत होत्या. आकर्षक लिपस्टिक लावलेले त्यांचे ओठ हवेतूनच चुंबन पास करीत होत्या. आपले सुंदर केस वाऱ्यावर उडवित, काळेभोर डोळे मारून प्रत्येकजण आपण इतरांपेक्षा खुप सुंदर आहोत, आणि ती सुंदरता आता तुमच्या वासनेची शिकार होण्यास किती आतुर बनली आहे, हे दाखवून देण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू होता. सगळ्या पोरांच्या तोंडातून वासनेची लाळ टपकत होती. अनिल सुनिलसाठी तर ते दृश्य 'न भूतो न भविष्यती' असेच होते. आपण या ठिकाणी येण्यास खूपच उशीर केला, ज्यावेळी कॉलेजमध्ये होतो तेव्हाच इतरांसोबत इथे यायला हवं होतं असं त्या दोघांनाही वाटू लागले, अर्ध्या एक तासापूर्वी घडलेला तो घाणेरडा प्रसंग दोघेही केव्हाच विसरले होते. आयुष्यात आपण खुप काही मिस केले आहे, असे त्यांना आता वाटू लागले होते. बघता बघता तो घोळका त्या कोठीजवळ आला. तीनचार मजली भव्य इमारत होती ती. ज्यामध्ये तो वेश्या अड्डा चालायचा. ज्याप्रकारे या कोठीविषयी ऐकलं होतं, जसं सिनेमा मध्ये वगैरे पाहिलं होतं, तसं हुबेहूब तरी म्हणता येणार नाही पण, त्याप्रकारेच होती ती बुधवार पेठेची वेश्या स्त्रियांची कोठी. आजूबाजूला काही दुरुस्त केलेले जुन्या पद्धतीचे दुमजली वाडे होते, ज्याच्या खिडकीतुन त्या तरुण मुली आपल्या ओठांवर लिपस्टिक लावत तिरप्या नजरेने रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या पोरांना घायाळ करीत होत्या. त्याच घरांच्या बाहेर त्यांच्या लिडर असणाऱ्या काही अनुभवी स्त्रिया खुर्ची टाकून, तोंडात पानांचा विडा टाकून त्या मुलींचा रेट ठरवीत होत्या. अनिल सुनिल हे सर्व एकदम बारकाईने पाहत होते. त्यांच्या नजरेला नजर मिळवण्याची हिम्मत सुनिलमध्ये नव्हती. तो त्या मुलींकडे पाहून शरमेने आपली मान खाली घेण्याचा प्रयत्न करीत होता. पण, त्याला तो चंदेरी मोह टाळणे मुश्किलच होते, अधूनमधून तिरप्या नजरेने तो ते सर्व न्याहाळत होता. 



मुख्य इमारतीच्या एंट्रीजवळ सर्व घोळका जमला. थोडीशी चौकशी विचारपूस करून ते सर्व पायऱ्या चढून वर जाऊ लागले. अनिलही त्यांच्या सोबत सर्वात पुढे होता. पण, पायऱ्या चढत असताना सुनिलच्या चेहऱ्यावर मात्र भीती निर्माण झाली होती. कारण, जसजसे वरच्या मजल्यावर जाईल तसे त्याला आणखी रंगीन चित्र दिसत होते. काही वयस्कर चाळीशी मधल्या स्त्रिया तोंडात विडा टाकून आलिशान सोफ्यावर बसल्या होत्या, त्यांच्या मागे काही बलदंड हट्टेकट्टे पुरुष बॉडीगार्ड सारखे उभे होते. त्या खोलींमध्ये गडद लाल पिवळा निळा प्रकाश पडला होता, रंगबिरंगी लाईट्स लागल्या होत्या. आणि अश्या त्या खोलीत जाऊन काही तरुण आपल्या आपल्या पसंतीनुसार मुली निवडत होते, त्यांचा रेट ठरवीत होते.



गोंधळ, गोंगाट, गर्दीच्या त्या ठिकाणी सुनिलला अवघडल्यासारखे झाले होते. जाणारे येणारे खांद्याला धक्का देऊन वर त्यालाच जाब विचारत होते, "क्या बे दिखता नहीं क्या अंधे..," खांद्यावरची बॅग सुनिलने पोटाशी धरली होती. पुढे जाण्याचे धाडस त्याच्याकडून होत नव्हते. उघड्या दरवाजाच्या फटीतुन दिसणाऱ्या अर्धवट नग्न स्त्रिया बघून सुनिलला स्वतःचाच तिरस्कार जाणवू लागला. ज्या इराद्याने तो त्या कोठीत पोचला होता, ते सर्व इरादे प्रत्यक्षात मात्र त्याच्या मानसिकतेला ठेच पोचवत होते. सेक्स,वासना, मोह, माया, लोभ, उत्तेजना, या सर्वांची त्याच्या मनात उलटसुलट उलथापालथ सुरू झाली होती. सेक्स विषयीं ज्या प्रश्नांची सुनिलला उत्तरे त्याला त्या कोठीतुन मिळणारी होती, ती सर्व उत्तरे त्याला त्या दरवाजाजवळच मिळाली होती. मात्र, तरीही पुढे जाऊन त्याने त्या उत्तरांची शहानिशा करण्याचा प्रयत्न केला तर आणखी काही नवीन प्रश्न निर्माण होतील, ज्यांची उत्तरे त्याला त्या रंगीन कोठीतुन केव्हाच मिळणारी नव्हती. त्यामुळेच सुनिलने माघारी परतणे पसंद केले. अनिलने त्याची बॅग सुनिलकडे सोपावली आणि तो त्याच्या मोहिमेवर निघून गेला. जाताना खिशात फ़क्त तीनशे रुपये घेऊन गेला. 


आपली बॅग कोणी चोरी करू नये म्हणून काळजीने सावरत सुनिल त्या कोठीच्या इमारतीच्या खाली पोचला. बाजूच्या एका हॉटेलमध्ये जाऊन उभा राहिला. आता त्याला तिथे फ़क्त अनिलच्या येण्याची वाट पाहत उभे राहायचे होते, फ़क्त काही मिनिटांचीच वाट पहायची होती. कारण, तेवढया मिनिटांत अनिलची मोहीम फत्ते होणार होती. पण, तेवढा वेळही तिथे वाट पाहत उभे राहणे सुनिलसाठी अवघड बनले होते. कोणीही हॉटेलमालक, दुकांनमालक,  बिनकामी त्याच्या दरवाजापुढे उभे राहू देत नव्हते. अस्वच्छ असा तो परिसर होता, त्यामुळे कुठेतरी हॉटेलमध्ये चहानाश्ता घेण्याचीही इच्छा होत नव्हती. तसाच नजर चुकवून एका कोपऱ्यात सुनिल उभा राहिला. वरच्या मजल्यावरून इशारे करणाऱ्या मुलींना न्याहाळत विचार करू लागला. कसे असेल या मुलीचं भविष्य, त्या स्त्रियांचं रोजचं जीवन कसे असेल, थोडयाश्या पैशाकरिता यांना आपल्या देहाची विक्री का बरी करावी लागली असेल, यांचे दलाल यांना योग्य तो मोबदला तर देत असतील का, असे निरनिराळे प्रश्न निर्माण झाले होते. येणाऱ्या जाणाऱ्या वेश्या स्त्रिया त्याच्या अंगाला स्पर्श करून जात होत्या, पुन्हा कोणीतरी येऊन आत खोलीत खेचून नेईल या भीतीने सुनिल निम्माअर्धा घाबरूनच त्या ठिकाणी उभे होता. कोणी ओळखीची व्यक्ती आपल्याला या ठिकाणी पाहिली तर आपली काय खैर नाही याचं जास्तीचं टेन्शन त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते. चेहरा लपवत, मोबाईल मध्ये तोंड घालून तो अनिलच्या येण्याकडे टक लावून उभा होता. 

एरवी कॉलेजच्या रोडवर, बाजारात, गल्लीमध्ये मुलींना टक लावून त्यांना वासनेच्या नजरेने पाहणारे तरुण पुरुष या ठिकाणी येऊन आपला पुरुषी तोरा क्षणासाठी का होईना विसरून जातो. कारण, इथे फ़क्त त्या स्त्रियांचीच ताकद असते. त्यांच्या सौन्दर्याची जादू असते, त्यांची त्या कोठीवर एक प्रकाची सत्ता, वचक असते. त्यांच्या या साम्राज्यात यायचे असेल तर लोकांनी आपला सभ्यपणाचा बुरखा थोड्या वेळासाठी का असेना बाजूच्या कचराकुंडीत गुंडाळून फेकून द्यावा आणि मगच इथे आगमन करावे असा निष्कर्ष सुनिलने काढला.



पंधरा मिनिटे होऊन गेले होते. अनिल खाली आला. त्याने त्याच्या बॅगेतून पैशाचे पाकीट काढले आणि त्यातून आणखी तीनशे रुपये काढू लागला. पण, पाकिटात आता फ़क्त पाचशेच रुपये शिल्लक होते. थोडा वेळ थांबून त्याने पैशाचा हिशोब केल्यावर त्याच्या लक्षात आले की, आपल्या पाकिटातून काही पैसे कमी झाले आहेत. बॅगेत इतर कुठे पैसे पडले असतील का म्हणून त्याने संपूर्ण बॅग पुन्हा चेक केली. पॅन्टचे खिसे चेक केले. पण, पाचशे रुपये सोडून त्याला आणखी पैसे सापडतच नव्हते. शेवटी त्याला समजले की, आपल्या पाकिट मधून आणखी पाचशे रुपयांची नोट चोरीला गेलेली आहे. पण, पैसे कोण चोरले असतील, कुठे चोरले असतील याचं उत्तर त्याला सापडत नव्हते. अनिल निराश झाला होता. त्याला आणखी एका मुलीसोबत सेक्स करण्याची इच्छा झाली होती. पण, त्याच्याकडे तितके पुरेसे पैसे शिल्लक नव्हते. त्याला पुन्हा परत ट्रॅव्हल करून गावीही जायचे होते. हताश मनाने अनिल त्या गल्लीतुन बाहेर निघू लागतो. पाठोपाठ सुनिल त्याचे सांत्वन करीत चालू लागतो. 

अनिलला धीर देता देता सुनिल स्वतःचे पाकिट सहज चेक करतो. तर त्याला सौम्य धक्काच बसतो. त्याला क्षणभर पटतच नव्हते की, त्याच्याही पाकिटातून पाचशेची नोट चोरीला गेलेली आहे. एकूण पैशापैकी फ़क्त पाचशेच रुपये चोरीला जातात आणि बाकीचे पैसे, ATM कार्ड्स आहे तसेच पाकिट मध्ये एकदम सुरक्षित असतात. हे पाहून अनिल सुनिल दोघेही बुचकळ्यात पडतात. त्यांच्यासोबत हा असा प्रकार नेमका कोठे घडला असावा याचा दोघेही शोध घेतात, तर त्यांच्या लक्षात येते की, सुनिल तर कोठीमध्ये आत गेला नव्हता, अनिलनेही आपले पाकिट सोबत नेले नव्हते. आणि दोघेही कोठे अन्यत्र गर्दीच्या ठिकाणी एकत्र आले नव्हते. पण, ज्यावेळी त्या बाई पुरुषांच्या टोळीने सुरुवातीला त्या दोघांना छोट्याश्या खोलीत जबरीने खेचून नेले होते. त्या ठिकाणी त्याच वेळी ते दोघे एकत्र गर्दी करून आले होते. दोघांनाही तो सगळा प्रकार पुन्हा आठवला. ज्यावेळी त्या टोळीने दोघांनाही खेचून बाथरूमच्या खोलीत घेऊन गेले होते, तेव्हा दोघांना काहीच भान नव्हते. काही समजायच्या आतच काही मुलींनी त्यांना बोलण्यात व्यस्त करून, त्यांच्या खिशातून अलगद पाकीट काढून त्यातून फक्त पाचशे पाचशे रुपये काढून घेऊन पुन्हा ते पाकीट आहे तसे खिशात ठेऊन दिले होते. पण, तो सगळा प्रसंग इतक्या झटकन घडला होता की, त्या दोघांना त्यांचे पाकीट वगैरे चेक करण्याचे भानच नव्हते. इज्जत वाचली या सुटकेनेच त्यांनी तिथून काढता पाय घेतला होता.

घडलेला सर्व प्रकार पुन्हा आठवून अनिल सुनिल दोघांनाही स्वतःची लाज वाटू लागली होती. सेक्स करून येऊनही अनिल सुद्धा ती सर्व मजा विसरून गेला होता. त्याच्या चेहऱ्यावर सुध्दा थोडी शरम जाणवत होती. काही स्त्रिया एकत्र येतात, आपल्याला भांबावुन सोडतात, पळो की सळो करून शेवटी घरातून हाकलून ढकलून बाहेर काढतात, आणि या सर्व प्रसंगात त्यांनी केलेली चोरीही लक्षात न येणे, ही त्या दोघांकरिता खूप शरमेची बाब बनली होती. सुनिलने तर तिथे जाऊन काही सेक्स सुध्दा केलेला नसतो, उलट त्यालाच पाचशेचा गंडा बसलेला असतो. त्यामुळे सुनिलचे दुःख सुनिललाच माहीत असते. त्या पाचशेमध्ये खुप काही खाल्ले असते, किंवा कपडे वगैरे खरेदी केले असते. अंगमस्तीने झालेले नुकसान सुनिलच्या पचनी पडत नव्हते. दगडूशेठने त्यांना चांगलाच धडा शिकवला असे त्याला वाटत होते. पण, उर्वरीत पैसे व पाकीट तरी सुरक्षित होते याबद्दल सुनिलला त्या टोळीचे कुतूहलच वाटले होते. पोलिसांकडे तक्रार द्यावी असा क्षणभर विचार सुनिलच्या डोक्यात येतो, पण तो विचार सेंकदात निघूनही जातो. कारण, पोलिसांनी उलट त्यांनाच प्रश्न केला असता, "मदारचोद, तिथे जाऊन काशी करण्यास कोण सांगितले होते,"


सुकलेल्या गळ्याने, घामेंघुम, थकलेल्या अवस्थेत दोघे परतीच्या प्रवासा करीता कात्रज डेपो वर येऊन पोचतात. दोघेही एकमेकांना दोष देत असतात. आणि दोघेच एकमेकांना सावरत असतात. "असू दे घे आता, झालं ते झालं, एक अनुभव तरी मिळाला, चांगली अद्दल घडली, पुन्हा अशी चूक करायची नाही बस्स.. ." असंच सुनिल वारंवार बडबडत असतो. येणारे जाणारे लोक त्यांना एखाद्या गुन्हेगारांसारखे पाहत आहेत, असं त्या दोघांना वाटत असते. त्यांनी असा गुन्हा केलेला असतो, ज्याची शिक्षा त्यांना अगोदरच मिळालेली असते.

ट्रॅव्हलमध्ये बसून केव्हा एकदा आपल्या गावी घरी पोचतो असे त्यांना वाटत असते, गावात गेल्यावर लोकांना कसं तोंड दाखवायचं, त्यांना काय उत्तरे द्यायची याची त्यां दोघांना मनातल्या मनातच काळजी लागलेली असते. घडलेला प्रकार कोणाला सांगायचा नाही, विसरून जाऊ असं ठरवून दोघेही ड्रायव्हर केबिन मध्ये वाऱ्याच्या झुळकीमध्ये झोपुन जातात, घडलेल्या प्रसंगाचे प्रायश्चित्त करीत असतात.


*【वरील स्टोरीमध्ये काही शब्दप्रयोग समाजभावना दुखावणाऱ्या असतील तर त्याबद्दल क्षमस्व, कोणत्याही लोकांच्या भावनेला ठेच पोचेल असा त्यामागे कोणताही उद्देश नाही, ती त्या स्टोरीमधील सत्यता आहे याची प्लीज नोंद घ्या, धन्यवाद,】


_whosunilmali

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

"काळू"

सपनों का IdiotBox//0.4