"काळू"

(On Central Bus Stand_Chiplun)
दुपारचे तीन वाजले होते. बसमधुन उतरताच मी तिला Call केला.
"Hello...."
"हा..बोल... . . . ."
मी कॉल कट केला, कारण बोलायचे धाडसच होत नव्हते. पण थोडीशी हिम्मत करुन मी परत कॉल केला.
"अगं कशी आहेस, मी चिपळूणमध्ये आलो आहे. तुला भेटायचे आहे..!!" तिचं उत्तर अनपेक्षितच होते,
"अरे, पागल आहेस का, आणि आत्ता तू चिपळूण मध्ये काय करतोयस. मला वेळ नाही तुला भेटायला, तुला काही मैनर्स वगैरे आहे का नाही..??" तिने फोन ठेवला.

ज्या अतिउत्साहाने मी घरातून बाहेर पडलो होतो, तो सगळा उत्साह एका मिनिट मध्ये नाहिसा झाला.
खुप रागाला आली होती ती. कारण मी तिला न सांगताच भेटायला आलो होतो. तिच्याशी माझी पहिलीच भेट होती ती. काहीही करुन तिला भेटायचेच असे मी मनाशी ठरवले होते.

तिच्याशी झालेल्या बोलान्यातून मी तिच्या गावाचे नाव ऐकले होते. ते माझ्या लक्ष्यात होते. मी वेळ न घालवता पर्यायी सोर्स शोधत होतो. कारण तिच्या गावी जायला बसची सोय क्वाचितच उपलब्ध होती. शेवटी मला सिक्स सीटर भेटली. तासाभराच्या प्रवासानंतर रिक्शावाल्याने मला त्यांच्या गावापासूनच्या थोड्या अंतरावर सोडले.  थोड़ीशी मनाला शांती भेटली, कारण थोड्याच वेळाने मी तिला तिच्या गावी भेटणार होतो. सकाळ पासूनच्या प्रवासाचा शेवट झाला होता एकदाचा. थोड़े अंतर चालल्यावर शेवटी मला एक मंदिर दिसले. मी सुटकेचा श्वास सोडला. कारण, तिच्या आवडत्या देवाचे मंदिर होते ते, "नागार्जुन मंदिर."

अखेर मी तिच्या गावी पोचलो होतो. मंदिरामध्ये मी थोड़ी विश्रांति घेतली आणि तिला पुन्हा कॉल केला.
"Hello, मी तुझ्या गावी आलो आहे, मंदिरामध्ये आहे..!!" खुप उत्साही होतो मी. पण काही काळापुरताच. माझ्या सगळ्या अपेक्ष्या एका क्षणात नाहीश्या झाल्या होत्या.

लगभग एक वर्ष झाले, आमची पहिली ओळख होउन. गोव्यात होतो मी त्यावेळी जॉबसाठी.
"Hi...who r u..??" पासून सुरु झालेला आमचा संवाद कधी "Hello...Miss u..." पर्यंत पोचला, काही समजलेच नाही. नकळतच घडल्या होत्या या गोष्टी.

"पोरीचा नाद, खुप बाद" असे म्हणतात खरे,
पण तीच पोरगी एखाद्याच्या भरकटलेल्या आयुष्यामध्ये आनंद देण्याचे काम करते. आपल्या आयुष्याचा "Better हाफ" ही एखादी पोरगीच असते. न सांगताही, फ़क्त आपले डोळे पाहुन आपल्या सुख-दुःखामध्ये आपल्याला धीर देणारीही एखादी पोरगीच असते, हेही तितकचं खरे आहे.
एखाद्या स्त्री ला समजावून घेणे हे आजपर्यंत कोणालाच जमले नाही. साहजिकच मलाही नाही.
पण अशी अश्यक्यप्राय गोष्ट समजून घेण्याचा मी प्रयत्न करत होतो. या प्रयत्नात मी इतका खोलवर गेलो होतो की, नंतर माझे मलाच त्यातून सावरणे कठीण बनले होते.
प्रेमात पडलो होतो मी.

"काळू"
प्रेमाने तिला मी काळू म्हणून बोलवायचो, पण ते तिला आवडत नसावे कदाचित.
"दिसायला देखणी, नटखट अदा, प्यारीसी Smile आणि Cheshmishh..." पहिल्यान्दा पाहिल्यावर मी तिची अशीच ओळख केली होती. ज्यामुळे ती मला आजही तितकीच आवडते.
"प्रेमामध्ये पडायचं नाही, पडलं तरी रागवायचं नाही, रागावलं तरी भांडायचं नाही, भांडलं तरी मैत्री तोडायची नाही, आणि मैत्री तोडली तरी एकमेकांना विसरायचं नाही.." हा आमच्यामध्ये झालेला एक Contract. ज्यामुळेच मी तिला आजही विसरु शकत नाही.

प्रेम म्हणजे काय असतं...!!
"प्रेम म्हणजे..प्रेम म्हणजे..प्रेम असतं.."
ज्याला जमतं.. त्यालाच कळतं..!!
याची कल्पना तिलाही होती आणि मलाही... आणि म्हणूनच आम्ही दोघेही कदाचित घाबरत होतो. पण शेवटी प्रेमच ते, व्यक्त नाही झाले ते कसले प्रेम..!!

सुरुवातीला एकमेकांची ओळख, नंतर काळजी, त्यातूनच share झालेल्या एकमेकांच्या गोष्टी. यामुळे मी तिच्या इतक्या जवळ गेलो होतो, की माझ्या एकट्या पडलेल्या आयुष्यामध्ये मला तिची सवयच लागून गेली होती.
सगळे काही ठीक चालू होते. पण मी हे विसरून गेलो होतो की, एखाद्याच्या प्रेमात पडणे म्हणजे एखाद्याच्या भावनेशी केलेला मानसिक खेळ असतो. आणि हीच चूक मी माझे प्रेम तिच्यासमोर व्यक्त करुन केली होती.

कारण, मी माझ्याच मनाशी खेळत होतो. एका वेगळ्याच विश्वात होतो मी. "काळू" माझ्यासाठी एक imaginary कल्पनाच बनली होती.
तिचे दिसणे, तिचे बोलणे, तिचा आवाज सर्व काही माझ्यासाठी काल्पनिकच होते. कारण, मी तिला कधी भेटलोच नव्हतो किंवा तसा प्रयत्नही केला नव्हता. माझी अवस्था अशी बनली होती की,

"बुलाती हैं वो, पर जाने का नै,
 किसीसे बेपनाह इश्क़ कर,
 मग़र हद से गुज़र जाने का नै,"

आयुष्याचा "तमाशा" बनून गेला होता.
माझ्या दृष्टीने प्रेमाची defination खुपच वेगळी होती. प्रेम करावं लागत नाही, तर प्रेम नकळतच होऊन जातं. प्रेम हे एकमेकांना बघुन किंवा निवडून केलं जाऊ शकत नाही. तर त्यासाठी एकमेकांवरील विश्वास, दोघांमधील आवडी निवडी, एकत्र घेतलेली काळजी, दिलासा, आधार, दोघांचे एकमत या गोष्टी महत्वाच्या असतात. असे मला वाटायचे.
पण प्रेमात पडण्याबरोबरच प्रेम निभावनंही तितकच गरजेचे असते. याचे भान मला नव्हते व त्यासाठी मी आजही स्वतःला माफ़ करू शकत नाही.

तरीही मनाची चढ़ाओढ़ ही चालूच होती.
एक शंका कायम होती, जी मला, माझ्या मनाला कायमची सतावून राहत होती. ती म्हणजे,
"काळू" खरचं आपल्यावर प्रेम करते का..? तिला मी खरोखरच आवडतो का..??
"असेल ही.. नसेल ही.."
पण तिने या प्रश्नांचं उत्तर कधीच दिलेलं नव्हतं.
आणि म्हणूनच त्या प्रश्नांच्या उत्तराच्या शोधात मी तिच्या गावी पोचलेलो खरा, परंतु मंदिरातून केलेल्या कॉल वर तिचा मिळालेला 'Reply' हा मलाच त्या प्रश्नांची उत्तरे शोधायला सांगत होता.

काही क्षण मी स्वतःवरच रागवत होतो. हसावं की रडावं हेच समजत नव्हते.
"आला आहेस तसा परत जा, 4.45 ला return बस भेटेल तुला...Sorry यार..!!"
हेच शब्द माझ्या कानात वारंवार घुमत होते. तिच्या गावातून बाहेर पडताना फ़क्त मंदिरातील "नागार्जुनच" त्या आठवणींची साक्ष होता. संपूर्ण परतीच्या प्रवासात मी ग़ुलाम अलींची एकच गझल ऐकत होतो.

"हम तेरे शहर में आएं हैं, मुसाफ़िर की तरह,
सिर्फ़ एक बार मुलाक़ात का मौक़ा तो दे दे..."

कारण मी रिकाम्याच आठवणी घेऊन परत जात होतो. काहीसा तिचाही राग आला होता. पण दोष माझाच होता.
"मैत्री" च्या नावाखाली मी तिच्या प्रेमात जो पडलो होतो. आणि याच चुकीचं प्रायश्चित करण्याची संधी मी आजपर्यंत शोधत आहे.

आजही "काळू" तशीच आहे,
"आपल्याच कामात बिजी राहणारी, बोलुनही न बोलनारी, इच्छा असूनही  ignor न करणारी."
दिवसेंदिवस cute होत असलेली तिच्या चेहऱ्यावरील सुंदर अशी smile तिच्या आनंदी असण्याचा पुरावा देत असते. पण नियतीचा इशारा काहीतरी वेगळाच आहे.

"काळू" माझ्यासाठी एक "काल्पनिक कथा" च आहे,
जे मी नाकारु शकत नाही. कारण, भविष्यात कधी या कथेशी भेट होईल किं नाही, हे मलाच माहीत नाही..!!
जरी योगायोगाने कधी भेट झालीच, तर आठवणींने ओल्या झालेल्या या कथेची पानेही परत भेटावीत इतकीच अपेक्षा आहे. आणि
त्यावेळीही "काळू" ला एकच सांगणे असेल,

"चाह कर चाहें फ़िर भूल देना तुम,
 दिल तोड़ तुझे जानें की इजाज़त आज़ भी हैं,
 दिल तोड़ तुझे जानें की इजाज़त आज़ भी हैं.."
 Continue______ _ _ _


_whosunilmali

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Once upon a time in बुधवार पेठ,

सपनों का IdiotBox//0.4