Posts

Showing posts from February, 2021

।। शिवछत्रपती ।।

Image
 आज साडेतीनशे वर्षांनंतरही इतिहासाची पाने पुन्हा पालटून पाहिली तर, अखंड भारतभूमीवर अनेक राजे महाराजे होऊन गेलेले वाचायला आणि ऐकायला मिळतात. त्यापैकी नामोल्लेख करण्यासारखे काही मोजकेच. परंतु छत्रपती म्हणून गौरवलेले एकुलते एकच होते. जे होते एकमेक "शिवछत्रपती." ज्यांचा आदर्श इतक्या वर्षांनंतरही कमी न होता त्यामध्ये आणखीन भरच पडत गेलीय. त्याचीच प्रेरणा म्हणून छत्रपतींची ही रयतपिढी तशीच पुढे मार्गक्रमण करत आलीय. शिवनेरी किल्ल्यावर आई जिजाऊपोटी जन्मलेल्या शिवबाची कहाणीही तुम्हांआम्हांसारखीच. पण त्यांनी पाहिलेलं स्वप्ने मात्र अद्वितीय होती. दैवत मानलेल्या आई तुळजाभवानीच्या समोर मोजक्या सवंगड्यासोबत हाच शिवबा जेव्हा स्वराज्य स्थापनेची शपथ घेतो तेव्हा त्याच्या रक्तात त्या स्वप्नांतील आग पेट घेत होती. आणि तिथूनच सुरू झाला "जय भवानी जय शिवाजी" चा प्रवास, जो त्या धगधगत्या रक्ताला योग्य दिशा देण्याचे काम करत होता. पण, इतक्या लहान वयात इतके मोठे स्वप्न पाहण्याचं नेमके कारण काय असावे, हिंदवी स्वराज्य म्हणजे नेमके काय, काय होते शिवबाच्या स्वप्नातील हिंदवी स्वराज्याचे स्वरूप, आणि तो