Posts

Showing posts from September, 2018

"पुढच्या वर्षी नक्की या... ."

Image
Hello, माइक चेक...., एक दोन तीन चार...गणपतीचा..., कृपया मंडळांनी वाहनांची गर्दी करू नये..., गणपती बाप्पा मोरया... पुढच्या..., निर्माल्य तळ्यामध्ये टाकू नका..., स्त्रियांनी लहान मुले व गळ्यातील दागिने सांभाळावित..., पाणी बोटल..पाणी..पाणी बोटल..., तुझको फिरसे जलवा दिखाना ही...., मंगलमूर्ति मोरया....,, रात्रीचे जवळपास बारा एक वाजले असतानाचे चित्र आहे हे. फुटाळा तळ्यावरचे. विजांचा सौम्य कड़कड़ाट, सोबतच ढोल ताश्यांच्या गजरामध्ये गणरायाला निरोप देण्यासाठी अगदी शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक चालू होती. अगदी वेगळ्याच स्वरूपाची विसर्जन मिरवणूक पहायला मिळाली. ना DJ होता. ना बैंड वा झांज पथक. ना कसला गोंधळ. मंडळ असो वा घरगुती बाप्पा असो, सर्वजण आपापल्या बाप्पाला घेऊन जल्लोषात, कोणी ट्रक तर कोणी ट्रैक्टर मधून येत होते. तर कोणी आपल्याच चारचाकी मधून किंवा चक्क बैलगाडीतून आपल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी आले होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता. अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्ति सर्वजण खुप खुश होते. काही लालबागच्या राण्यांचा उत्साहही अगदी पाहन्याजोगा होता. सगळ्यांच्या उत्साहाला का

अब तक "25....."

Image
18 Sept..........' Belated Birthday whosunilmali. सुनिल माळी यांची आज जयंती।😀 कारण ही तसेच आहे। इथे स्वतःच्या bdy ची आठवण करून द्यावी लागते। Bytheway, thank you so much all of you। ज्यांनी मला वेळोवेळी माझ्या 18 sept ची आठवण करून दिली। ज्यांनी मला माझ्या आनंदात आणि संकटात तितकीच मोलाची साथ दिली, त्या सर्वांचा मी ऋणी आहे। आयुष्याच्या आजवरील प्रवासाबद्दल बोलायचे झाले तर, हा प्रवास म्हणजे थिएटर मधील एका सिनेमा सारखाच आहे। आणि आज त्या सिनेमाचा "Interval" आहे. आज त्या सिनेमाची 25 एपिसोड्स पूर्ण झाली आहेत। आणि मी या सिनेमाच्या प्रमुख भूमिकेत आहे। ज्याला आजवर समजायला इतका वेळ लागला आहे की, त्याचा हा सिनेमा हॉलीवुड आहे, बॉलीवुड, की टॉलीवुड आहे। असो मला माझ्या सिनेमाची भूमिका करत असताना खुप मजा आली आहे। पण आजचा हा Interval माझ्या इथून पुढील प्रवासाची दिशा ठरवणार आहे। हाच एक क्षण असतो, जो आपल्याला आपल्या आयुष्याच्या हाइलाइट्स मध्ये घेऊन जातो। काही वर्षांपूर्वी ज्या आतुरतेने मी 18Sept ची वाट पहायचो, ती आतुरताच हळूहळू कमी होत जाते। कारण दहा वर्षांपूर्वी ज्यावेळी

सपनों का IdiotBox

काळू पळाली....की पळवली...?? "मादरचोद खरं खरं बोल, नाहीतर नागड़ा करून बैटने उभा आडवा फोडून काढीन." समोर उभ्या असलेल्या खाकी वर्दीतल्या कॉनस्टेबलला बघून मला स्वतःमध्येच गणेश गायतोंडे दिसू लागला होता. क्षणभरासाठी पायाखालची जमीनच सरकली होती. गावामध्ये काहिशे तणावग्रस्त वातावरण बनले होते. माणसांचा जमाव एकत्र जमलेला होता. पण सर्वजणच भयभीत होते. सर्वत्र पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जणू काही एखादी नक्षली मोहीम चालु असावी अशी. कोपऱ्यामध्ये टक लावून बसलेल्या एका आज्जीला मी विचारून घेतलं. परंतु त्या आजीचीही अवस्था माझ्याहुनही वाईट बनली होती. इतक्यात त्या गर्दीमधून एक आवाज आला, "एका एकाची झाडून चौकशी घ्या. सुटला नाही पाहिजे. आमदाराच्या पोरीला पळवली आहे साल्याने. जिथे असेल तिथून शोधून काढा." माझ्या डोक्यामध्ये काहिशी ठिनगी पेटली. कारण बाजूच्या गावामधील आमदाराची पोरगी पळाली होती. आणि तिला शोधण्यासाठीच ही सर्व ओढ़ातान चालू होती. पण बाजूच्या गावातील आमदार, आणि त्याची पोरगी म्हणजे "काळू" असावी, असेच मला वाटू लागले होते. होय, तीच काळू जिला मी गेल्या वर्