"भूक"

कामठीपुरा, गंगा-जमुना, बुधवार पेठ, गोकुळनगर.......?? महाराष्ट्रातील वेश्या व्यवसायासाठी प्रसिद्ध असलेली काही ठिकाणे. आपल्याला माहीत आहेत का..?? नाही ना..!! तर माहिती करून घ्या. कारण इथे समाजातील पुरुष लोकांची "भूक" भागवली जाते. #SparklingCityOfDreams काही दिवसांपूर्वी सहजच सोशल मीडिया चाळत होतो. तर एक पोस्ट ठळकपणे वाचनात आली.(शेयर केली असावी) लेखकाने लेखातून एका वेश्या स्त्री ची व्यथा मांडली होती. अतिशय रंजक, विदारक, सत्य मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न लेखकाने लेखातून केला होता. खुप सकारात्मक प्रतिसाद ही मिळाला होता, त्या लेखाला व लेखकाला सुद्धा. "वेश्या ही एक वेश्या नसून ती एक "वारांगणा" असते... चित्रपटात काम करणाऱ्या बोल्ड हिरोइन पेक्ष्या वेश्या कधीही श्रेष्ठच...सत्य उघडपणे मांडले आहे...खुप छान.." वगैरे वगैरे. पण, वेश्याव्यवसाय करणाऱ्या 'स्त्री' च्या वेश्येपणाची मांडणी करत असताना, आपण एका स्त्रीला सुद्धा उघडपणे नागड़े करत आहोत, याचा लेखकाला कदाचित विसर पडला असावा. असे त्या लेखातून स्पष्ट होत होते. त्यातीलच एक प्रतिक्रिया अशी होती, जी ...