"भूक"

कामठीपुरा, गंगा-जमुना, बुधवार पेठ, गोकुळनगर.......??

महाराष्ट्रातील वेश्या व्यवसायासाठी प्रसिद्ध असलेली काही ठिकाणे. आपल्याला माहीत आहेत का..??
नाही ना..!!
तर माहिती करून घ्या.
कारण इथे समाजातील पुरुष लोकांची "भूक" भागवली जाते.
#SparklingCityOfDreams

काही दिवसांपूर्वी सहजच सोशल मीडिया चाळत होतो. तर एक पोस्ट ठळकपणे वाचनात आली.(शेयर केली असावी) लेखकाने लेखातून एका वेश्या स्त्री ची व्यथा मांडली होती. अतिशय रंजक, विदारक, सत्य मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न लेखकाने लेखातून केला होता.
खुप सकारात्मक प्रतिसाद ही मिळाला होता, त्या लेखाला व लेखकाला सुद्धा.
"वेश्या ही एक वेश्या नसून ती एक "वारांगणा" असते... चित्रपटात काम करणाऱ्या बोल्ड हिरोइन पेक्ष्या वेश्या कधीही श्रेष्ठच...सत्य उघडपणे मांडले आहे...खुप छान.."
वगैरे वगैरे. पण,
वेश्याव्यवसाय करणाऱ्या 'स्त्री' च्या वेश्येपणाची मांडणी करत असताना, आपण एका स्त्रीला सुद्धा उघडपणे नागड़े करत आहोत, याचा लेखकाला कदाचित विसर पडला असावा. असे त्या लेखातून स्पष्ट होत होते.

त्यातीलच एक प्रतिक्रिया अशी होती, जी मला खुप वेळ खटकत होती.
"एक वेश्या ही समाजातील पुरुष लोकांची भूक भागवते, त्यामुळे ती कधीही ग्रेटच..."

"भूक"

माणूस असो वा प्राणी, उपाशिपोटी, एक दोन दिवस पोटाची खळगी नाही भरली की त्याचा मेंदू सुन्न पडतो. साधा विचार ही ठीकपणे करू शकत नसतो. पण शेवटी आपण मनुष्यप्राणीच. भूक लागली आहे म्हणून कोणी सहजपणे 'भिकारी' झाला आहे, असे मी तरी कोठे पाहिले नाही. कारण, भिकाऱ्याला सुद्धा भिकारी बनन्यामागे खुप काही कारणे असू शकतात. पण फ़क्त 'भूक' हेच कारण असू शकत नाही.

तर मग,,,, ही 'गंगा-जमुने' ची भूक अशी कोणती भूक आहे, जी सहजपणे विकत मिळते तेही अगदी 200-300 रुपयांत..!! ज्यासाठी ना उपाशी राहावं लागतं, ना कसली वनवण करावी लागते.
"वासनेची भूक" म्हणतात याला.

हो...मी सुद्धा एक पुरुष आहे. मलाही भावना आहेत. मलाही वासनेची भूक लागते. म्हणून काय, मी त्या कामठीपूरा, बुधवार पेठेत उघडपणे जाऊ शकतो..??
नाही ना..!!
भुकेल्या माणसाची भूक भागवणे, हा माणुसकीचा धर्म. व ती भूक भागवनारा परमेश्वर समान असतो. पण, वेश्याव्यवसाय व वेश्याघर म्हणजे अतिशय गालिच्छ, तुच्छ दर्जाचे ठिकाण अशी आपल्या विकसित समाजाची प्रतिष्ठित मानसिकता बनली आहे. एकिकडे स्त्रीला देवीचा दर्जा, तर त्याच वारांगनेला निकृष्ठ, हीन दर्जा हीच आजची अमान्य वास्तविकता आहे.

एका वेश्ये साठी तिचं वेश्याघर हेच तिचं स्वर्ग बनलेलं असते. कारण, त्या चौकटी बाहेर तिची स्वतःची काही ओळखच नसते. त्यावेळी तिच्याकड़े कोणी बघन्याचं ही धाडस करू शकत नाही. कारण त्यावेळी ती एक वारांगना नसून, एक 'भिकारी' असते. जी साधे भीक सुद्धा मागु शकत नाही.

कारण आपण हे विसरून जातोय की, एक prostitute स्त्री, एक वेश्या सुद्धा एक माणूस असते, तिलाही तिचं आयुष्य, तिची स्वप्ने असतात, तिलाही तिचं पोट असते, तीसुद्धा एक दोन दिवस उपाशी राहु शकते, आणि त्यामुळेच "ती" लाही कदाचित "भूक" लागू शकते,,,,, जी भूक त्याच गंगा-जमुना मध्ये भागवली जाऊ शकते. तेही फुकट मध्ये.
कारण, त्याच ठिकाणी तिला खऱ्या अर्थाने देवीचा दर्जा मिळतो. जिथं तिला साक्ष्यात पूजले जाते. ते वेश्याघरच तिच्या साठी एक 'मंदिर' असते.

शेवट इतकाच आहे,
चित्रपटात काम करणाऱ्या व बोल्ड सीन देणाऱ्या हिरोइन पेक्ष्या, वेश्या स्त्री कधीही श्रेष्ठच असते. कारण चित्रपटातील कलाकार हे पाहणाऱ्यांची "भूक" भागवू शकत नाही ना...!
त्यासाठी आम्ही लोकांनी वारांगनेची निर्मिति केली आहे...!!
अगदी होलसेल दरात..!!!
या अश्या चुकीच्या दृष्टीकोनामुळेच आज समाजातील 'आठ' वर्ष्याच्या कोवळया आयुष्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ज्याचं उत्तर फ़क्त आपण आणि आपणच देऊ शकतो.


_whosunilmali

Comments

Popular posts from this blog

ओय हमाली.!!

Once upon a time in बुधवार पेठ,

"काळू"