"शिक्षणाच्या आयचा घो..!!"

चौकातल्या कॉर्नर वर एक सहा वर्षांचं पोरगं गळ्यात पाण्याची बॉटल अडकवून स्कूल बसची वाट पाहत बसलेलं होतं. तर दुसरीकडे त्याच वयाचं दुसरं पोरगं बैलगाडीतुन जात जात अगदी निरागस होऊन त्या दुसऱ्या मुलाकडे पाहत आपल्या बापाला म्हणतं, "बा... म्यां पण साळा सिकणार.!" अवाक नजरेने बैलगाडी थांबवून बाप मनातल्या मनात पुटपुटतो, 'माझं बी पॉर साळा सिकावं.. मोठं व्हावं.!' आज विसावे शतक. विज्ञानाच्या आधारे पुढे चाललेलं शतक. याच विसाव्या शतकात एका बाजूला श्रीमंताचं पोर गळ्यात बॉटल अडकवून बसची वाट बघतयं, तर दुसऱ्या बाजूला गरीबाचं पोर आपल्याच बापासोबत चहाच्या टपरीवर मोलमजुरी करताना दिसतंय.! ज्या मुलांना जगण्यासाठी मोकळा श्वाससुद्धा घेता येत नाही, दोनवेळच्या भाकरी साठी बापासोबत चाकरी करावी लागते, ना दसरा ना दिवाळी ना ईद.! सगळं विसरून कशाचीही खंत न बाळगता बालपणाचा गाडा कसातरी पुढे ढकलणाऱ्या त्या कोवळ्या जीवावर केव्हा फुलणार हा शिक्षणाचा गंध. त्यांनी कधीच शिकायचं नाही.! की त्यांना अधिकारच नाही शिकण्याचा, प्रगतीचा, पुढे जाण्याचा, समाजाला बद्दलन्याचा.!! शिक्षणाचा नारा खरचं पोचला आहे क...