सपनों का IdiotBox//0.4
"ATM चोर" दिवसभर न जेवलेने अथवा वेळेवर न जेवलेने कदाचित मला ऍसिडिटी झाली असावी. कारण, शरीरातील पित्त समुद्रमंथन व्हावे तसे वर खाली होत होते. सोबत मलाही वर खाली करण्यास भाग पाडत होते. चारी बाजूंनी आभाळ एकदम गच्च व्हावे, तसेच एकंदरीत डोक्याची अवस्था बनली होती. काही क्षण वाटायचे की, घालावा डोक्यात हात आणि जो काही extra गच्च करणारे मटेरियल आहे, त्याला बाहेर काढून फेकून दयावं. मग डोकं निवांत होऊन जाईल व शांतपणे झोपता येईल. नेमकं कोणत्या विशिष्ट कारणांनी माझं डोकं दुखत असेल, अश्या विविध कारणांवर मी शोधविचार करीत होतो. त्या विचारांमध्येच अर्धवट पहायचा राहिलेला 'पिकू' सिनेमा मी पहायला घेतला. पण, जसजसा दीपिका आणि इरफान (irrfan) चा लव्ह angle सिनेमाच्या एन्डकडे जात होता. तसतसा माझ्या शरीरातील पित्ताचे मंथन पिकूमधील बच्चनच्या लुज मोशन सारखे तोंडातून बाहेर येण्याचा प्रयत्न करीत होते. न राहवून मी मोबाईल तसाच बाजूला टाकून दिला व दोन्हीं हातांनी जोरजोराने डोके चेपू दाबू लागलो. मध्येच बॅटरी कमी असा वॉर्निंग सिग्नल मोबाईलने दिला. लागलीच एका हाताने कसाबसा मोबाईल चार्जला लावून दिल...