मूर्ख कोण? मी तू तू मी तू तू मी की, राशीबेन.. .!!

विश्लेषण प्रपंच, आज मला मुद्दामहुन स्पष्टीकरण द्यावे लागत आहे की, मी किती मूर्खपणा केलाय आणि माझा देश कसा मूर्ख बनून गेला आहे याविषयी. मला जे वाटत आहे तेच तुम्हालाही वाटत असेल, किंवा तुमच्या मनात जे चालू आहे तेच माझ्याही मनात चालू असेल असं गृहीत धरूनच मी पुढे सुरुवात करतो; होय, मी एक मूर्ख नागरिक आहे. त्यामुळेच माझा देशही तितकाच मूर्ख देश बनतो. कारण, सर्वकाही माहीत असूनही मी मुद्दामहुन काही नियम मोडले तोडले. काहीही गरज नसताना रिस्क घेण्याची हौस म्हणून मी रस्त्यावर गल्लीमध्ये हिंडत राहीलो. फुकटच्या राशनसाठी मी सर्व नियम धाब्यावर मारले. 500 रुपयांसाठी मी बँकेत पहिल्याच दिवशी गर्दी केली. काल परवाच काही मित्रांसोबत एक पावसाळी ट्रिपसुध्दा मारून आलोय. मास्क म्हणजे माझ्यासाठी एक फॅशन बनून गेलीय. "कोरोना" किंवा नोवेल कोरोना किंवा कोविड19 असंही म्हणतात याला. हा एक रोग आहे. पूर्ण जगात याची महामारी घोषित झालीये. या इवल्याश्या न दिसणाऱ्या रोगाने आपली किती मोठी दहशत निर्माण केलीय याची जाहीर पूर्वकल्पना असूनही मी त्याला एकदम हलक्यात घेतलंय! ज्यामुळे तब्बल चाळीस लाखांचा मैल पार करून...