बलात्कार Vs Justice_

"8 Year Old" is Drugged, Rapped, Murdered.

"Unimaginable, shameful, heartbroken_"

"पण आहे कोण ही असिफा..?"
आज 'असिफा' आहे. काल 'निर्भया' होती..!
दोष कोणाचा, दोष काय, आणि दोषी कोण..?
ती हिन्दू की मुसलमान..??
या सर्व प्रश्नांची उत्तरे भेटुपर्यंत उद्या कुठेतरी आणखी एक असिफा, आणखी एक निर्भया कारण नसताना बळी गेलेली असते.

"She was Just 8_"
उसे अपने हाथ और पांव में ये भी नहीं पता था,
की मेरा दाया हाथ कौनसा हैं, और बाया हाथ कौनसा....
उसने तो कभी ये भी नही समझा,
की हिन्दू क्या होता हैं, और मुसलमान क्या होता हैं.....

#whoअसिफा #whoनिर्भया and #whogiveJustice
कारण, इथे तर न्याय देणारेच उपोषणाला बसलेले असतात. आणि उरलेसुरले बाकीचे हैशटैग ठेवण्यातच व्यस्त आहेत. तेव्हा "JusticeForAsifa" बोलुनही काही फायदा नाही. म्हणून आपण एक बोलू शकतो. की "SorryAsifa..."
जरी त्या निरागस बळी ठरलेल्या असिफाला न्याय देऊ शकत नसलो तरी सहानुभूति तरी नक्कीच देऊ शकतो.

पाहणाऱ्यांना, वाचणाऱ्यांना या गोष्टी नेहमीच्याच वाटतील. पण त्या निरागस, कोवळया जीवाचा त्यात काय दोष. गुन्हा काय, गुन्हेगार कोण, याची उत्तरे शोधणे आपले काम नाही. पण त्या गुह्याला बळी न पड़ता, त्यातून बाहेर पडणे आपले कर्त्तव्य आहे. आणि झालेला गुन्हा परत घडू नये यासाठी लढणे आपला हक्क आहे. मग त्यासाठी कितीही दरवाजे ठोठवायला लागले तरी चालतील.

प्रश्न हा आहे की, आज यूपी आहे, काल दिल्ली होती, उद्या मुंबई असेल. पण या मन सुन्न करुन टाकणाऱ्या प्रवृत्ति येतात तरी कुठून. आणि याला कारणीभूत कोण असेल.
आपण अवगत केलेली पाश्चिमात्य संस्कृती, या वाईट वृत्तिला चालना देणारे काही समाजकंटक साधने, संस्कारहीन वारसा, की "स्त्री" म्हणून जन्म देणारे आपले आई वडील??

"भारतीय संस्कृती, सर्वधर्म समभाव, स्त्रीपुरुष समानता."
गुन्हा करत असताना या कोणत्याच गोष्टीची जाणीव नसते. पण गुन्हा घडला. शिक्षा झाली. गुन्हेगार सुटले. मोकाट फिरत आहेत. आता पुढे काय..?? पुन्हा गुन्हा, पुन्हा शिक्षा..!!!!!

गुन्हा घडण्याची कारणेच नष्ट झाली.किंवा गुन्हा परत घडू नये याची खबरदारी घेतली तर कदाचित काही घडू शकते. झाड़ मोठे आहे. पण त्याची लागण करायला काय अड़चण आहे. भविष्यात कदाचित त्याची सावली दुसऱ्याला भेटून जाईल. भविष्यातील असिफा, निर्भया यांना मोकळा श्वास तरी घेता येईल.

पण त्यासाठी प्रथम मुलांना लहानपणापासूनच या गोष्टीविषयी ची जाणीव असायला हवी. स्त्री-पुरुष वेगवेगळे नसून एकच आहेत. स्त्री ही फ़क्त पुरुषांच्या वासनेपुरती मर्यादित नसून, त्याच्याही पुढे ती खुप अमर्याद आहे. दोघांमध्ये बरोबरी ही कधीच होऊ शकत नाही. पण स्त्री तिच्या जागी कधीही श्रेष्ठच आहे. याची जाणीव आपल्या संस्कारामधून देण्याची गरज आहे.

सेक्स आणि स्त्री यांचे जे गलिच्छ समीकरण धर्म, समाज यामधुन रूढ़ झाले आहे. ते नष्ट होणे गरजेचे आहे. त्यासाठी आई वडील यांनी प्रथम जागरूक होणे जरुरी आहे. मुलांना रिपीट रिपीट तोच तोच इतिहास शिकवन्या ऐवजी सेक्ससंबंधी जागरूक विषयांचे नॉलेज देणे कधीही फायदेशीर ठरेल.
त्यातूनच स्त्रीकड़े पाहन्याचा दृष्टिकोन कदाचित बदलू शकेल.

जावेद अख्तर यांनी एकदा याचे स्पष्टीकरण खुप सभ्यरित्या दिले होते,
आपण आपल्या आईवर का प्रेम करत असतो..?
मग ती खरी असो वा सावत्र. कारण तिने आपल्याला जन्म दिलेला असतो म्हणून, आपली काळजी घेत असते म्हणून, आपल्याला रागावत असते म्हणून, हो बरोबर आहे.

पण जेव्हा आपण लग्न करतो, आपली बायको येते, बायकोला पोरगं होतं,
पुढे तेच पोरगं परत कोणावर प्रेम करत असते..??
त्याच्या आईवर, म्हणजे आपल्या बायकोवर.
आणि आपण..?? आपल्या आईवर की बायकोवर..?? दोघांवरही करतो.

मग परत तेच पोरगं पुढे लग्न करतं, त्याची बायको येते, आपली सून, सुनेची सासु(आपली बायको), सासूची परत सासु(आपली आई). हे समीकरण पुढे चालूच राहते.
पण आपण फ़क्त आपल्या आईवरच प्रेम करत राहतो का..?? तर नाही ना..!!

तेव्हा एक गोष्ट समजायला हवी की,
जशी आई, बायको, सून, मुलगी, बहिण, मैत्रीण, असते, तशीच असते एक स्त्री.. मग ती आपली असो किंवा इतरांची.


_whosunilmali

Comments

Popular posts from this blog

ओय हमाली.!!

Once upon a time in बुधवार पेठ,

"काळू"