ओय हमाली.!!

Exactly, बरोबर ऐकलंय तुम्ही. पण कुठे ऐकलं असेल.?? रेल्वे स्टेशन. बस स्टँड. विमानतळ मध्ये हमाली असतो की नाही याची मलाही कल्पना नाहीय. पण असेलही कदाचित. तोच हमाली जो आपण लोकांनी लहानपणी पाहिला असेल. बच्चनच्या कूली मध्ये किंवा लक्ष्याच्या हमाल दे धमाल मध्ये. खाकी पेहरावात रुबाबदार मिश्या आणि त्यावर इस्त्री मारलेली तशीच खाकी टोपी. सोबत खांद्यावर ती लाल बावट्याची निशाणी म्हणून टाकलेला लाल रुमाल. रेल्वे आली रे आली पटकन मळलेली तंबाखू तोंडात टाकायची आणि तडक प्रवाश्यांच्या बॅगा डोक्यावर घ्यायच्या. पुढे हमाली आणि मागे त्या बॅगेचा मालक हे चित्र आपण सर्वांनी पाहिलेलं असेल. किमान गोविंदाच्या कूली नं.1 मध्ये तरी पाहिला असेलच. पण, त्या रात्री जेव्हा मी आणि माझा मित्र एका बस स्टँडवर गेलो होतो, तेव्हा त्या बस स्टँडवर एका वयस्क माणसाने आम्हाला हाक दिली. "ओय हमाली.!!""" नाही.... अशी हाक नव्हती मारली त्याने. पण त्याचा त्या हाकेमागचा उद्देश तोच असावा. "अरे पोरांनो... मला थोडी माझी सायकल बसवरून काढून देता का रे.?!" अतिशय क्षीण आवाजात त्याने आम्हाला विनंती केली. प...