Once upon a time in बुधवार पेठ,

सुरुवातीपासूनच सुरू करतो. साधी सरळ गोष्ट आहे, स्टार्ट to एंड. हा किस्सा अश्या दोन मित्रांचा आहे, ज्यांनी त्यांच्या ऐन जवानीच्या वयात अजूनही "बुधवार पेठ" पाहिलेली नसते. पुण्यातील बुधवार पेठ. श्री दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेऊन अनिल आणि सुनिल दोघेही बुधवार पेठच्या शोधात व्यस्त होतात. मी मुद्दामहुंन ही दोन नांवे निवडली आहेत, जेणेकरून कहाणीला थोडा आपलेपणा येईल आणि त्यामध्ये लिहताना वाचताना थोडी सत्यात जाणवेल अन्यथा त्यातील कोणत्याही पात्र, क्षण किंवा घटनेचा वास्तव्य किंवा माझ्या वैयक्तिक नावाशी, चरित्राशी वगैरे संबंध जोडण्याचा चावट आगावपणा कोणी करू नका. Okay, अनिल आणि सुनिल यांनी बुधवार पेठ केव्हाच पाहिलेली नसते. पण त्यांना गावातील, कॉलेजमधील त्यांच्या मित्रांनी सांगितलेलं असतं की, दगडूशेठ गणपती मंदिर जवळच पेठेची गल्ली आहे. म्हणूनच श्री गणेशा करून भर उन्हात ते दोघे खांद्यावर कपड्याची बॅग घेऊन मंदिराच्या आवारात घिरट्या घालण्यास सुरूवात करतात. बुधवार पेठ म्हंटल की लोकांच्या आवाजाचे volume आपोआपच कमी होते, कारण, बुधवार पेठ म्हणजे भारतातील, महाराष्ट्रातील वेश्या व्यवसायासाठी...