"वळू"

तुम्ही लोकांनी बोलणारा पोपट ऐकला असेल. पण मी बोलनारा "वळू" पाहिला आहे. हो अगदी जवळून. माझा खुप जवळचा मित्र. पण, तुम्हाला प्रश्न पडला असेल की, याने असा "वळू" पाहिला कुठे आणि कसा. तेही चक्क बोलणारा..!! साहजिकच....मलाही पडला होता. माणसांच्या या गर्दीमध्ये माणसानेच बोललेले ऐकायला कोणी नसताना, या वेड्याने कोणत्या वळूचा आवाज ऐकला. असेच वाटत असणार. वाटायला मजेशिर असली तरी मी त्याचा प्रत्यक्ष्यदर्शी अनुभव घेतला आहे. हेही खरचं आहे. तसा मी मात्र खुपच कमी बोलतो. कारण माझ्याकडे बोलायला खुप काही आहे. पण ते ऐकून घेणारे कोणी भेटलेच नाही. खुप एकटा पडलो होतो मी. एक माझीच दुनिया बनवली होती मी. त्यामध्ये फ़क्त मी आणि मीच होतो. पक्ष्यांचा किलबिलाट, वाऱ्याची झुळुक, मावळता सूर्य, नदीचा संथ प्रवाह, पावसाची रिपरिप, आणि आकाशातले चंद्र-तारे यांच्याच सहवासात होतो मी. खुप एकटा. दिवस मावळत होते. महीने पलटत होते. पण विचारांचे चक्र मात्र भूतकाळ, भविष्यकाळ यापेक्ष्या वर्तमान कसे जाईल यातच व्यस्थ होते. स्वतःची ओळख शोधण्याचा प्रयत्न करत होते. अश्याच एके रात्री मी फुटाळ्यावर गेलो होतो. ...