सपनों का IdiotBox//0.3
मेस्ट्रो (चोरी नाही अपहरण)
शेजारच्या घरातून ऐकायला येणारी कुजबुज नेहमीच माझी झोपमोड करणारी ठरायची. कधी दिवसां कधी मध्यरात्री. एक शब्द न शब्द त्यांच्या संवादातील माझ्या कानावर पडायचे. Actually तो संवाद नसायचाच. ती एक कुजबुज असायची स्पष्ट ऐकू न येणारी पण झोपमोड करून जाणारी. असं वाटायचं जणू काही त्यांच्यामध्ये एखादी दहशतवादी मिटिंग चालू असावी. आणि त्यांचं नेक्स्ट टार्गेट मीच आहे. जेव्हा त्यांना समजेल की, त्याच्या मिटींग मधील एक शब्द न शब्द मी ऐकत असतो. त्या क्षणीच ते माझ्यावर सहकुटुंब हल्लाबोल करणारे होते.
असो,
डिग्रीचे दिवस सुरू होते. दुसऱ्याच दिवशी माझ्या एका न सुटणाऱ्या अवघड विषयाची फायनल exam होती. अन् मी त्या दहशतवादी कुटूंबाची कुजबुज ऐकत अभ्यासाचे नियोजन करीत होतो. वेळापत्रक पाहताक्षणी माहीत झाले होते की, दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी थंडीमध्ये कुडकुडत परीक्षेला जावे लागणार. पण मला थंडीपेक्षा त्या गोल्डन विषयाचं जास्ती टेन्शन होतं. कारण, जर यावेळीही मी त्या विषयात नापास झालो, तर माझं पूर्ण वर्ष पुन्हा एकदा बेकार जाण्याच्या मार्गावर होते. माझ्यासोबत माझा मित्र "प्रा" सुद्धा परीक्षेला येणार होता. कारण त्याचं कॉलेज सुध्दा माझ्या वाटेवरच होते. त्यामुळे त्याला मी फोनवरून सांगितले की, मी सकाळी तुमच्या वस्तीमध्ये लवकर येईन आपण दोघेही उद्या एकत्र परीक्षेस जाऊ. गाडीवरून. "मेस्ट्रोने.. ."
प्रा, मी आणि "मिख्खा" लहानपणी पासूनचे चड्डीदोस्त. मिख्खा आमचा तिसरा मित्र. प्रा व मिख्खा दोघेही शेजारच्या 'हिरेवाडी' वस्तीमध्ये रहायचे. पाच सात किलोमीटर वर त्यांची वस्ती होती. गेले महिनाभर प्रा ची मेस्ट्रो माझ्याकडेच पडून होती. मेस्ट्रो म्हणजे प्रा ने कॉलेजसाठी जुगाड लावून घेतलेली एक टू व्हीलर. जिच्यामुळेच आम्ही दोघांनी एकदा थांबलेल्या ट्रॅक्टरला धडक देऊन आमची दातं पाडून घेतली होती.
सगळं काही प्लानिंगनुसार ठरलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मी खूप घाईमध्ये होतो. माझ्या अंदाजानुसार परीक्षा ही नेहमीप्रमाणे दहा वाजताच असेल, या हिशोबाने मी माझे आयडी कार्ड, हॉल तिकीट वगैरे शोधन्याच्या गोंधळात होतो. या गोंधळात मी मेस्ट्रो ऐवजी केव्हा माझी सायकल बाहेर काढली, आणि त्याच गोंधळात केव्हा मी प्रा च्या हिरेवाडी मध्ये पोचलो समजलेच नाही. मी प्रा ला आदल्या रात्री सांगितले होते की, तुझी मेस्ट्रो माझ्याकडे पडून आहे, तिला घेऊन मी लवकर सकाळी तुझ्या वस्तीवर येईन. आवरून तयार रहा.
पण सगळा गोंधळ झाला होता. मी हिरेवाडी मध्ये पोचलो खरा, पण सायकलीने.! हे मला हिरेवाडी बसस्टॉप वर आल्यावर समजले. कारण मी माझ्या गोल्डन विषयातच गुंतलो होतो.
कावराबावरा होऊन मी त्या बसस्टॉपवर नजरा टाकत होतो. आता पुढं काय करायचं? परीक्षेला कसं जायचं? वेळेत पोचणार का? याचा विचार करीत होतो. वेळ पाहण्याकरिता म्हणून मी घड्याळ पाहून घेतलं, तर पावणेआठ वाजले होते. माझ्या अंदाजानुसार अजून माझ्याकडे सव्वा दोन तास शिल्लक होते. पण पुढे काही वेगळंच विचित्र घडणारं आहे, याची मला काहीच कल्पना नव्हती.
इतक्यात, माझ्या नजरेत 'मिख्खा' दिसला. एका टपरीवर टाइमपास करीत बसला होता. मी पटकन त्याला गाठलं. त्याला माझा गोंधळ लगेच समजलाही. त्याने आपली प्लॅटिना लागलीच बाहेर काढली सुद्धा. आम्ही दोघांनी मिळून पुन्हा एक नवीन प्लॅन केला. त्यानुसार, त्याने माझी सायकल एका अडगळीच्या दुकानात ठेवायला सांगितली. जेणेकरून माझी सायकल कोणी चोरी करू नये.
इतक्या मध्ये प्रा सुद्धा आटोपशीरपणे तयार होऊन बसस्टॉप वर आला होता. अगदी ताजेतवाना खुश दिसत होता तो. पण त्याला मी घातलेल्या गोंधळाची काहीच कल्पना नव्हती. तो त्याच्या वेगळ्याच टेन्शन मध्ये दिसत होता. न राहवून त्याला मी टाइम किती झाला आहे हे विचारलं. तो म्हणाला, "अजून एक तासच शिल्लक आहे. नऊ वाजता पेपर चालू होईल. गाडी फास्ट चालीव."
माझ्या गोंधळात आणखी भर पडायला इथूनच खरी सुरुवात झाली. कारण, माझा अंदाज चुकला होता व परीक्षा दहा ऐवजी नऊ वाजता सुरू होणार होती. या विचारातच आम्ही मेस्ट्रोला घेण्यासाठी पुन्हा माझ्या गावी निघालो होतो. ऐनवेळी मिख्खा टपरीवर हजर होता, त्यामुळे मला थोडासा धीरही मिळाला होता.
बघता बघता आम्ही माझ्या घरी पोचलो. प्रा ला सुद्धा माझा गोंधळ आता समजून आला होता. गाडीवरून उतरून मी पटकन घरी जाऊन मेस्ट्रो ची चावी शोधू लागलो. पण चावी काही केल्या सापडतच नव्हती. आईनेही नेमका आजच सगळा पसारा मांडून ठेवला होता. कारण, तिला येणाऱ्या सणासुदीसाठी घराची झाडलोट करायची होती. त्यामुळे तिने घरातील सगळे साहित्य रस्त्यावर मांडून ठेवले होते. त्यामुळे अर्थातच, प्रा व मिख्खा सुद्धा रस्त्यावरच उभे होते. शेवटी सगळी उलथापालथ केल्यावर मला चावी सापडली.
पण, माझा शोध इतक्यात संपणारा नव्हता.
कारण, लास्ट टाइम मी मेस्ट्रोला कुठे पार्क केली, हेच नेमके मला आठवत नव्हते. माझ्या नजरेची दिशाभूल झाली होती. शेवटी मेंदूला जोर दिल्यावर मला पार्कींगचे ठिकाण आठवले. ज्या ठिकाणी गल्लीतल्या सगळ्या गाड्या पार्क केल्या जायच्या.
गेले काही दिवस मी पार्किंगकडे फिरकलोच नसलेने हा गोंधळ उडाला होता. पण, जेव्हा मी त्या पार्किंगच्या ठिकाणी पोचलो तेव्हा एक भयावह/ घाणेरडं चित्रच पाहतोय असं वाटलं. सगळा पार्किंगचा चेहरा मोहराच बदलून गेला होता. ती जागा पार्किंग ऐवजी म्हशींचा गोठाच वाटत होती. सर्वत्र शेणच शेण. आणि त्या शेणामध्ये बुडून उभ्या राहिलेल्या त्या सगळ्या जुनाट गाड्या. ज्या निम्म्याहून अर्ध्या शेणातच बुडून गेल्या होत्या. पण, मला प्रा ची मेस्ट्रो शोधायचीच होती. त्यामुळे नाकाला रुमाल बांधून मी त्या शेणात उतरलो. एखाद दुसरी मेस्ट्रो सारखी दिसणारी गाडी मी बाहेरही काढायचो. पण ती मेस्ट्रो नसायची.!
मेस्ट्रो कुठे सापडेना हे पाहून प्रा चा चेहराही पडलाच होता. एका क्षणी मी त्या दहशतवादी कुजबुज कुटुंबावरही संशय घेऊन पाहिले. मी माझा सगळा राग आईवर काढायचा प्रयत्नही केला. पण, आईनेही मला लगेच एक क्लु दिला.
ती म्हणाली, "अरे तुझी गाडी तर त्या पार्किंगवाल्या काकांच्या घरी आहे. एके दिवशी सामान आणायला म्हणून घेऊन गेले होते."
हे ऐकून थोडंसं समाधान भेटलं खरं पण, तितकाच रागही आला. कारण, माझ्या परवानगीशिवाय त्या काकांनी मेस्ट्रो नेलीच कशी?!! तेही माझ्या नजरेआड!!
पण, वेळ राग व्यक्त करण्याचा नव्हता. घड्याळाचे काटे फिरत होते. साडेआठ वाजून गेले होते. नऊ वाजता माझा व प्रा चा पेपर सुरू होणारा होता. प्रा ने इतक्यात माझा सगळा गोंधळ पाहिला होता. त्याने खुप विश्वासाने माझ्याकडे मेस्ट्रो ठेवायला दिली होती. शेवटी रागाच्या भरात चार शिव्या देऊन तो पेपरला जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था शोधू लागला. गावातील एका ओळखीच्या माणसाच्या गाडीवरून तो पेपरसाठी निघून गेला.
त्यासोबत मिख्खा सुद्धा घरगुती कामानिमित्त निघून गेला. जाता जाता त्याने त्याची प्लॅटिना माझ्यासाठी सोडून गेला. जेणेकरून मी सुध्दा वेळेत पेपरला जावे.
मी ठरवले होते. पेपरसाठी पंधरा वीस मिनिटे उशीर झाला तरी हरकत नाही. पण, मेस्ट्रोचा शोध घेऊनच जायचं. उशीर न करता मी त्या पार्किंगवाल्या काकांच्या घरी पोचलो. त्यांच्या सर्व खोल्या न खोल्या मी चेक करीत होतो. पण मेस्ट्रो कुठेच दिसत नव्हती. शेवटी एका अंधाऱ्या अडगळीच्या ठिकाणी मला मेस्ट्रो दिसली. पण, तो माझा क्षणिक भ्रमनिरास होता. कारण, तिथे मेस्ट्रो उभी होती. पण, त्या मेस्ट्रोची चाके गायब.!! मेस्ट्रोचे इंजिन गायब.!! मेस्ट्रोची सर्व अंतर्वस्त्रेच गायब.!! मेस्ट्रोचा फक्त सांगाडाच त्या ठिकाणी अडकून ठेवला होता.
मी सुधीरबधिर झालो होतो. एका बाजूला मेस्ट्रोचा सांगाडा बघून मेस्ट्रो कुठेतरी असेल, याच एका आशेने मी त्या ठिकाणी उभा होतो. माझ्या या गोंधळाने ते पार्किंगवाले काका माझ्याजवळ येऊन उभे राहिले. ते माझ्या खांद्यांवर हात ठेवून मला समजवायचा प्रयत्न करीत होते. मी काही विचारन्या अगोदरच त्यांनी मला सांगून टाकले की, त्यांनी माझ्या मेस्ट्रोचे सर्व पार्ट्स काढून घेतले आहेत. आणि ते सर्व पार्ट्स त्यांनी त्यांच्या जुन्या बाईकच्या दुरुस्तीसाठी वापरले आहेत. इतकेच नाही तर माझ्यासाठी त्यांनी एक दुसरी बाईक modified करून ठेवली आहे. ती modified गाडी दाखवण्यासाठीच ते मला त्यांच्या सोबत घेऊन जात होते. एखाद्या शोरूमचे फित कापून उदघाटन करावे तसे त्यांनी त्या खोलीचे दार उघडले. एखाद्या दगडाला कोरून त्यातून जशी मूर्ती बनवली जाते. तशी त्यांनी माझ्यासाठी ती गाडी modified केली होती. अलगद तात्या विंचूचा बाहुला बाहेर काढावा तसा त्यांनी मला ती गाडी खोलीबाहेर काढून दिली. आणि एक ट्रायल म्हणून गाडी स्टार्ट करायला सांगितली. पण, जशी मी ती गाडी स्टार्ट केली तशी त्या गाडीने एक विक्षिप्त रूप धारण केले. माझा त्या गाडीवरून कंट्रोल केव्हाच सुटला होता. गाडी कुठेही भकलायला लागली होती. अगदी एखाद्या खरूज लागलेल्या पिसाळलेल्या कुत्र्यासारखं कुठेही उड्या मारत होती. शेवटी एका झुडुपात जाऊन ती गाडी अस्थाव्यस्त पडून राहिली.
हा सगळा सीन माझ्यासाठी एका पिक्चर सारखाच होता. मेस्ट्रो the wonder bike सारखा. पण, त्या काकांनी मला पूर्णपणे मूर्ख बनवले होते. त्यांनी माझ्या/ प्रा च्या मेस्ट्रोची चोरी नाही तर अपहरण केले होते. मी त्यांच्यासोबत खूप वाद घातला. पण त्यांनी माझे काहीएक चालू दिले नाही. कारण, त्यांचा अश्या अपहरण प्रकरणात मोठा हातखंडाच असावा.
एव्हाना माझ्या डोक्यातून पेपरचा विचार हळूहळू बाहेर पडत होता. मला काही सुचतच नव्हते. एकच चिंता होती की, प्रा ला काय उत्तर द्यायचे.!
मी लागलीच मिख्खा ला कॉल केला. त्याला सर्व घडलेला प्रकार सांगितला. तो म्हणाला की, आपण पोलिस complaint करूया. पण, मी विचार केला की, पोलिस काय म्हणून तक्रार नोंद करून घेतील. 'चोरी की अपहरण.'
जरी त्यांनी तक्रार नोंद करून घेतली, तरी ते माझी व प्रा ची चौकशी करतील.! आमच्या कडून मेस्ट्रोची कागदपत्रे मागतील.! आमची लायसेन्स मागतील.! त्यापैकी आमच्याकडे काहीच नव्हते.! एकंदरीत माझ्या चुकीमुळे प्रा सुध्दा अडचणीमध्ये सापडणार होता. त्यामुळे पोलीस तक्रारीसाठी माझे धाडसच होत नव्हते.
वेळ निघून गेली तशी मी परीक्षेला जाण्याचा विचारही सोडून दिला. यावेळी सुद्धा माझा गोल्डन विषय परिक्षेविनाच राहणार होता. पुन्हा एक वर्ष असेच बरबाद होणारे होते. प्रा च्या मेस्ट्रोचे फक्त मडगाडच माझ्या हातात शिल्लक होते.
कॉलवर मिख्खाने सांगितले होते की, प्लॅटिनाला वस्तीवर येऊन पोच कर. आणि सायकल घेऊन जा. झालं गेलं सर्व विसर व इथून पुढे काळजी घे.
घडलेल्या सर्व गोंधळाचे प्रायश्चित्त म्हणून मी प्लॅटिनाला स्टार्ट न करताच, तिला पायी चालवत ढकलतच हिरेवाडी वस्तीमध्ये पोचलो.
_whosunilmali

इस कहाणी के सभी पात्र, घटना, एवं व्यक्ती पूर्ण रूप सें काल्पनिक हैं। इनका किसीं भी व्यक्ती या घटनाओ सें प्रत्यक्ष या अप्रत्यक्ष रूप सें कोई संबंध नहीं हैं।
ReplyDelete