Mother tongue
भाईसाहब... एक कप चाय मिलेगा??
चौकस नजरेने त्या युवकाकडे पाहत चायवाल्याने त्याला प्रश्न केला, क्यों भाई.. कहा से हो? गुजरात से!!!
ओळख ना पाळख, पण चहावाल्याने त्या युवकाला केलेला प्रश्न हा त्या युवकाची ओळख दाखवून जात होता.
त्या व्यक्तीने त्याला उलट प्रश्न ही करण्याचा प्रयत्न केला. पण खोल विचार केल्यावर लक्ष्यात आले की, एखाद्या व्यक्तीची ओळख ही त्याच्या "मातृ-भाषा" वरूनही ठरू शकते.
हो..मी मराठी आहे,,, from कोल्हापुर!!
हे आपण जितक्या अभिमानाने एखाद्याला सांगतो. तितक्याच् अभिमानाने आपण आपल्या "मातृभाषेची" परंपरा जपतो आहोत का? हा एक स्वतःलाच विचारात टाकणारा सवाल असू शकतो.
"मराठी"
एक वेगळीच् आपुलकी, प्रेम, रांगड़ा रुबाब, आणि अभिमान आपल्याला या भाषेतून पाहायला मिळतो. 'भावा', 'मित्रा', 'आभारी आहे', 'धन्यवाद', या शब्दांमधुन मिळणारे प्रेम आपल्याला "thank you', 'bro', 'tc', 'its ok' या शब्दांमधुन क्वचितच भेटत असेल.
कधीकधी हा प्रश्न ही पडतो!! की, खरच आपल्याला "मराठी"जमते का? आपली गोची तरी होणार नाही ना?
दिवस बदलत आहेत, दिवसांमागे माणूस ही बदलत आहे. 'facebook', 'whats app' तर अगदी लहानापासून वयस्कर व्यक्तीं पर्यंत पोचले आहे. माणसाने टेक्नोलॉजी अवगत केली पाहिजे, पण त्याच बरोबर ज्या भाषेचा आपण इतका अभिमान ठेवतो, त्याला कितपत जपले पाहिजे. हाही एक प्रश्न आहे.
आज देशपातळीवर विविध प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षा घेतल्या जातात.पण त्याच स्पर्धेचा अभ्यास मात्र आपल्याला English सारख्या भाषेतून करावा लागतो. आता हा ज्याच्या त्याच्या ऐपतिचा प्रश्न आहे, पण हा एखाद्या भाषेच्या अस्तित्वाचा चिंताजनक विषय असू शकतो.
परंतु, जेव्हा एखादा आपला मित्र 'facebook' सारख्या social वेब वर एखादी 'मराठी' post अपडेट करतो, तेव्हा खरच एक वेगळा अनुभव मिळतो.
काहीही असो,
पण ज्याप्रकारे आपण आपल्या आई कडून चालायला, पळायला शिकलो, त्याचप्रमाणे ज्या भाषेमुळे आपण बोलायला शिकलो, त्या आपल्या "mother tongue" विषयी आपण कितपत गांभीर्याने विचार करतो......
_whosunilmali

Khup chan 👌❤
ReplyDelete😊😊👍
Delete