Political_देवदास

"चाविया खो गयी हैं..??" जी हाँ..😀

सच में देश की तिजोरी की चाविया खो गयी हैं,
आणि असेच चालू राहिले तर एक दिवस याच तिजोरी वर "कावळे" बसायला जास्त दिवस नाही लागणार..!!

'सबका साथ, सबका विकास'
याच moto ला ऐकत बघता बघता कसे दिवस विकासाच्या पदद्याआड़ गेले, काही समजलेच नाही. पण कितपत विकास झाला, कधी झाला, आणि कसा झाला याचे नक्की मोजमाप हे येणाऱ्या काही दिवसात देण्यात येणाऱ्या नविन moto वरुन दिसून येईल, तेही लेखी अक्षरी आकड्यांच्या स्वरुपात.

ज्याप्रमाणे, आधार कार्ड वरील नाव, फ़ोटो, मोबाइल नंबर अपडेट झाले, त्याचप्रमाणे देशाचे राज-कारण ही खुपच अपडेट झाले आहे. परंतु देशाचा सामान्य नागरीक किती अपडेट झाला आहे, हाच गंभीर सवाल आहे.

"बाबूजी ने कहाँ, गाँव छोड़ दो,
गाँव ने कहाँ, पारो छोड़ दो,
पारो ने कहाँ, शराब छोड़ दो,
माँ ने कहाँ, घर छोड़ दो"
In_2014 "मोदीजी ने कहाँ, सोनिया गांधी छोड़ दो,"
In_2018 "राहुल गांधी ने कहाँ, अब मोदी को छोड़ दो,"
एक दिन आयेगा, जब सब लोग कहेंगे, भाई अब "INDIA" ही छोड़ दो...!!

कारण, एक वेळ देशाचा सामान्य नागरीक गाँव, पारो, दारु, शेवटी घरही सोडेल, पण याच देशाचे राज-कारणी मंडळी आपला भ्रष्ट-आचार काही सोडणार नाहीत.

"जन धन योजना, नोटबंदी, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया" या योजना ऐकायला जितक्या छान वाटतात, तितकेच त्यांचे परिणाम हे किती परिणामकारक ठरलेत हे त्या सामान्य नागरिकालाच ठाऊक.

देशाची प्रगती ही देशाच्या अर्थव्यवस्थेवर अवलंबून असते, पण त्याच बरोबर देशाची प्रगती ही देशाच्या सुशिक्षित अश्या young जनरेशन वरही तितकीच अवलंबून असते, याचा विसर दिवसेंदिवस पडत चालला आहे. ज्या लोकांना देशाची अर्थव्यवस्था म्हणजे काय असते याची कल्पना ही नाही, अश्याच देशाच्या अर्थव्यवस्थेची (हवेली की तिजोरी😂) लूट अगदी दोन्ही हाताने केली जात आहे.

"यंग इंडिया" म्हणून ज्याला संपूर्ण विश्वात नावाजले जाते, त्याच यंग इंडिया मध्ये जाती जातींचे राजकारण ही अगदी मोकळेपणाने करण्यात येते.
ज्या छत्रपती शिवरायांनी मुठभर मावळे घेऊन स्वराज्य घडवण्याचे स्वप्न दाखवले, ज्या बाबासाहेबांनी अगदी निस्वार्थ भावनेने देशाच्या सुकर, उज्वल भविष्यासाठी स्वतःच्या पत्नी-मुलांचाही विचार केला नाही, त्याच शिवरायांना-बाबासाहेबांना परस्पर वाटून घेण्याचा अधिकार कोणत्या महाशयाने दिला आहे, हे त्यांनाच माहीत.
ज्या अभिमानाने या थोर व्यक्तींच्या नावाखाली आपण आपल्या DP चे झेंडे बदलतो, त्याच अभिमानाने, गर्वाने आपण आपल्या देशासाठी थोड़े जरी संघटित झालो तर कदाचित आपल्या देशाच्या तिजोरीच्या चाव्या या योग्य माणसाच्या हाती जातील.

पण, देशाचा नागरीक हा daily 1.5GB डेटा, मोह्हमद शमीची IPL मैच, चेन्नई माझी-मुंबई तुझी, भगवा आमचा, निळा तुमचा, हिरवा तिसऱ्याचा याच गोष्टींमध्ये जास्त व्यस्त आहे. परंतु याव्यतिरिक्त ही देश आहे हे जेव्हा लोकांना समजेल, तेव्हा कदाचित खुप वेळ झाला असेल.

"अन्न, वस्त्र, निवारा" आणि "शिक्षण" या आपल्या मुलभूत गरजा आहेत, पण त्या तरी समाधानकारक भेटत आहेत किंवा नाही याची थोड़ी जरी काळजी झाली तरी खुप झाले.
पण, सद्यपरिस्थिति पाहता "अन्न, वस्त्र, निवारा" यांना हिशोबात न धरता, देशाचे भविष्य म्हणून ओळखले जाणारे आपण "यंग इंडियन" आपल्याला मिळणारे शिक्षण हे खरच दर्जेदार आहे का?? याच शिक्षणाच्या नावाखाली केलि जाणारी आर्थिक लूट (शैक्षणिक कर्ज-13%, शासकीय महाविद्यालयां मधील भरामसाठ फी) योग्य आहे का??

अण्णा हजारे यांना उपोषणाचे Brand Ambassador बोलले जाते, तेव्हा त्यांना पत्राद्वारे एकच विनंती करावीशी वाटते, की अण्णा तुमचे शेवटचे उपोषण हे कृपया देशाच्या यंग जनरेशनच्या हक्कासाठी असावे. तेव्हा ताठ मानेने आम्हीही बोलू, "होय, मी अण्णा हजारे."

शेवटी आपणही एक भारतीय..!!

बोलावं तितकं कमीच् आहे,
पण या जातीयवादी कावळ्यांनी आपला "देवदास" करुन ठेवला आहे, हे सत्य आहे. फरक इतकाच आहे की, आपल्याकडे ना पारो आहे, ना चंद्रमुखी........😮


_whosunilmali

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

ओय हमाली.!!

Once upon a time in बुधवार पेठ,

"काळू"