The Historical आजोबा_

माझे आजोबा क्रिकेट शौक़ीन होते..!!
होय..in1985,

काहीसे आम्ही बुचकळ्यातच पडलो😇
ना रेडियो, ना टेलिव्हिजन, ना इंग्लिश कमेंट्रीची समज, ना क्रिकेटचा हवा तसा प्रसार...तरीही एखादी व्यक्ती क्रिकेटची इतकी मोठी fan असू शकते, आणि तेही एक आजोबा!!

कोल्हापुर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील "हेरवाड़" एक छोटसच गांव. गावाचा इतिहास ही तसा छोटाच्. पण गावाची प्रसिद्धि ही एक वेगळीच्...
"क्रिकेट__"
परंतु, या इतिहासाचे "जनक" म्हंटले तरी काही वावगे ठरणार नाही, असे माने गल्लीतील "Historical आजोबा."

ज्या काळी TV नावाची गोष्ट अतिशय दुर्मिळच. परंतु अख्य्या गावामध्ये फ़क्त माने आजोबा यांच्या घरी मात्र TV असायची. आणि तीही फ़क्त एकाच कारणासाठी.... "क्रिकेट.."

जरी त्यांना english भाषेची अडचण असली, तरी त्यावर इलाज म्हणून ते चक्क एक शिक्षित माणूस converter म्हणून बोलवत असायचे. अशी कोणतीच match नसायची, की जी दूरदर्शन वर प्रसारित झालीय व् ती त्यांनी पाहिली नाही. पूर्ण पंचक्रोशिमध्ये त्यांना फ़क्त "क्रिकेट" चा शौक़ीन म्हणूनच ओळखायचे.

"क्रिकेट" अगदी घरा घरांमध्ये पोचावा म्हणून स्वतःची वारसाची ज़मीन ही त्यांनी गहान ठेवली. स्वतःची हक्काची शेतजमींन ही मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध करुन् दिली होती. जी आजही गावामध्ये "हुड्या" तले मैदान म्हणून प्रसिद्ध आहे. मुलांना योग्य सुविधा मिळावी यासाठी त्यांनी "नाराळाच्या थांप्या" च्या बॅट ऐवजी "gray nichols" ची बॅट आणि "cooka bora" चा चेंडू सर्वप्रथम पूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्या गावी उपलब्ध करुन दिला होता.
आज गावातील प्रत्येक मुलगा हा "क्रिकेट" खेळतो, गल्लीगल्ली मध्ये "क्रिकेट"च्या टूर्नामेंट्स घेतल्या जातात. अगदी प्राथमिक शाळा, हायस्कूल, मध्ये सुद्धा "क्रिकेट" ची स्पर्धा घेतली जाते.

पण,
दुःख इतकेच वाटते की, ज्या आजोबांनी "क्रिकेट" साठी इतके काही पणाला लावले, त्यांचाच त्यांना आता विसर पडला आहे.
आज जरी "आजोबा" आपल्यामध्ये अस्तित्वात नसले, तरी त्यांची "क्रिकेट" साठीची धडपड नक्कीच प्रेरणादायी होती.

खंत इतकीच वाटते की,
ज्या व्यक्तिमुळे हातात बॅट धरायला शिकलो, ती व्यक्ती एक आदर्श प्रेरणास्थान बनण्याऐवजी एक "Untold_Story" च बनून राहिली आहे....


_whosunilmali

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Once upon a time in बुधवार पेठ,

"काळू"

सपनों का IdiotBox//0.4