M3_Confusion Hi Confusion__

लेख_Artical_Blog लिहून कष्ट घेण्याचे 'कारण' हे की, 'कारण', 'कारण' काहीच नाही. 'कारण' काही गोष्टी करण्यासाठी काहीच 'कारण' लागत नाही. 'कारण' काही गोष्टी या काही 'कारण' नसताना च करायच्या असतात.
जसे की "Maths" चा अभ्यास__M3

याचा अभ्यास करण्याचे कारण काय याचे कारण आजही मला समजलेच नाहीय.
कारण ज्या प्रकारे भारत सरकारने नोटबंदी का केली, पेट्रोलचे दर का वाढवले, बेरोजगारी का वाढली यांचे नक्की कारण आपल्याला माहीत नाही, त्याचप्रकारे याचेही कारण असू शकते, कदाचित.
काहीही असो,
कारणे शोधणे आपले काम नाही.

(Today, 8.00AM)

Best Of Luck भावा.. पेपरला तीन तास बसून ये... घाबरु नको.. टेंशन नको घेऊ.. Confuse नको होऊ... 40 मार्काचा तरी सोडवूनच ये... काही येत नसेल तर कॉपी तरी नक्कीच लिहून ये...तेही नाही जमले तर दुसऱ्याचा पेपर लिहून काढ...
पण,
M3_ सुटलाच पाहिजे..!!

सकाळी सकाळी झालेला माझा व माझ्या भावाचा हा संवाद. कारण, त्याच्या आयुष्याचा सगळ्यात महत्वाचा दिवस आहे म्हणे आज..!! काय दिवे लावतो आता त्या तीन तासात ते त्यालाच माहीत बिचाऱ्याला.

'ते तीन तास' चक दे इंडिया ची 72मिनिटच आहेत. कारण, आयुष्यातले सगळे महत्वाचे निर्णय हे त्या तीन तासामध्येच घेतले जातात. जितका विचार आयुष्यभर केला नसेल, तितका विचार त्या तीन तासात केला जातो. स्वतःची क्षमता, ओळख,
अस्तित्व, करियर, फ्यूचर प्लॅन, आई-बाबा या सगळ्यांचे अगदी प्रामाणिक विचार त्या तीन तासातच केले जातात.

पण त्यातूनही काही शुर असे असतात, ज्यांना ती तीन तासाची मैचच खेळायची नसते. मैच already च फिक्स असते. "Next_Time"

पण काही हळवे मित्र असेही असतात, ज्यांना स्वतःपेक्ष्या इतरांचीच काळजी जास्त असते. त्यातूनच मग हाताची शिर कापून घेणे, गळफास लावून घेणे, विष पिणे असे प्रकार घडून येतात.

तीन वर्षापूर्वी जेव्हा एक जीवाभावाचा मित्र फ़क्त विषयांमध्ये "Fail" झालेच्या कारणांमुळे आपल्या आयुष्याचा शेवट करुन घेतो. तो प्रसंग, त्याचा नेहमी हसरा चेहरा, त्याचा save असलेला no, आणि त्याच अजूनही active असलेलं FB अकाउंट पाहुन मन गहिवरून येतं. वाटतं की_
सगळ्या "Education_System" लाच आग लावावी.
पण करणार काय..??
यामधील 'Education' व 'System' या दोघांचाही सुरुवातीपासूनच जुगार खेळला जात आहे. ज्याचे Open-Close काय असतील, याचीही आपल्याला कल्पना नाही.

विनोदाचा भाग म्हणजे,
काल रात्रभर, मोठ्या कष्टाने फुटपट्टी(scale) वर खरडून खरडून अखंड सात आठ पाने मी maths ची example सोडवली. सोबत चिठ्याही.
तेव्हा वाटत होते की यार, परत एकदा आपण इंजीनियरिंग करावी. कारण आज इंजीनियरिंग होउन दोन वर्षे झाली मी जॉब करत आहे. पण मला अजूनही trigno, LDPD, z, laplace, इंटीग्रेशन, darivatives यांपैकी काहीही येत नाही.

ज्या आर्यभट्टानी "0" चा शोध INDIA मध्ये लावला. त्यानाही कदाचित प्रश्न पडला असेल की, "0" चा शोध हा फक्त INDIA मध्येच लागू शकतो. कारण आपल्या syestem ने त्या शून्याची किंमत इतकी कमी करुन ठेवलीय की, ती आता (-0) झाली आहे.
ज्या मुलाला "2×0=0" असते हेच माहीत नाही, त्याला two rees to zero किती..? कसे माहीत असणार..!

आपण हे असले न समजनारे शिकायचेच कश्यासाठी..?
म्हणे...'Mental Ability Test..!!'
परंतु, ज्या 'मेंटल टेस्ट' च्या नावाखाली एखाद्याचे आयुष्य, त्याचे शैक्षणिक भविष्य, त्याचे अस्तित्व यांवरच प्रश्नचिन्ह येत असेल तर खरचं अशी टेस्ट गरजेची आहे का..?? आणि जरी असेल, तर त्या टेस्ट घेण्याची पद्धत योग्य आहे का..?? नसेल तर त्याच्या सुधारणेसठी काही प्रयत्न होत आहेत का..??
नाही ना...!!
मग आपण आपल्या अस्तित्वाचा लिलाव कोणत्या किमतीवर लावायचा...?

माझ्या एका बहाद्दुर मित्राने तर direct मैडम बरोबरच सेटिंग केली होती. तेही फ़क्त M3 साठी..!!
आजही त्याला पाहिलं की हसु येते. कारण मुलगा M3 fail असूनही, gate exam मध्ये टॉप स्कोर केला होता त्याने.
यावरून लक्ष्यात येईल की, वर्षानुवर्षे ज्या पद्धतीने त्याची मेंटालिटी टेस्ट घेतली जात होती. ती कितपत योग्य होती. आणि कितपत अयोग्य..??

पेपर लिक...संदर्भात राहुल गांधीनी ट्वीट केले होते,

"हर चीज में लिक हैं,
 चौकीदार विक हैं."

यावरून राहुलजी व स्मृतीबाई यांना एकच विनंती आहे की, ट्वीटवार खेळत बसण्यापेक्ष्या कारणांच्या मुळाशी जाऊन,
त्यावर काही प्राथमिक उपाय शोधले तर कदाचित, "M3" पास-नापास होऊन, इंजीनियरिंग होऊनही चार-चार वर्षे घरीच बसलेल्या तरुणांच्या बेरोजगारीचे कारण समजू शकेल.

असो,
यासाठी आपल्यापैकीच कोणीतरी महाराष्ट्राचा 'विनोद तावड़े' बनला पाहिजे. जे इतक्या लवकर तरी शक्य नाही. तेव्हा लवकरात लवकर आपण एकच सकारात्मक positively काम करू शकतो. ती म्हणजे,
"कॉपी समर्थन__"😇

शेवटी आयुष्याच्या या चढ़उतारामध्ये असे अनेक "M3" येतील. कदाचित सुटतीलही...किंवा नाहीही...,
तेव्हा धीर न गमावता एक करू शकतो आपण,

"जो दिल से लगे, उसे कह दो,
 Hi_Hi_Hi_Hi___
 जो दिल ना लगे, उसे कह दो,
 bye_by_by_by___"


_whosunilmali

Comments

  1. ज्या लोकांना maths आवडतो. त्यांच्यासाठी क्षमस्व.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

ओय हमाली.!!

Once upon a time in बुधवार पेठ,

"काळू"