"पुढच्या वर्षी नक्की या... ."
Hello, माइक चेक....,
एक दोन तीन चार...गणपतीचा..., कृपया मंडळांनी वाहनांची गर्दी करू नये..., गणपती बाप्पा मोरया... पुढच्या..., निर्माल्य तळ्यामध्ये टाकू नका..., स्त्रियांनी लहान मुले व गळ्यातील दागिने सांभाळावित..., पाणी बोटल..पाणी..पाणी बोटल..., तुझको फिरसे जलवा दिखाना ही...., मंगलमूर्ति मोरया....,,
रात्रीचे जवळपास बारा एक वाजले असतानाचे चित्र आहे हे. फुटाळा तळ्यावरचे.
विजांचा सौम्य कड़कड़ाट, सोबतच ढोल ताश्यांच्या गजरामध्ये गणरायाला निरोप देण्यासाठी अगदी शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक चालू होती. अगदी वेगळ्याच स्वरूपाची विसर्जन मिरवणूक पहायला मिळाली. ना DJ होता. ना बैंड वा झांज पथक. ना कसला गोंधळ.
मंडळ असो वा घरगुती बाप्पा असो, सर्वजण आपापल्या बाप्पाला घेऊन जल्लोषात, कोणी ट्रक तर कोणी ट्रैक्टर मधून येत होते. तर कोणी आपल्याच चारचाकी मधून किंवा चक्क बैलगाडीतून आपल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी आले होते.
प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता. अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्ति सर्वजण खुप खुश होते. काही लालबागच्या राण्यांचा उत्साहही अगदी पाहन्याजोगा होता. सगळ्यांच्या उत्साहाला कारणही तसेच होते.
"बाप्पाचे विसर्जन..."
या उत्साहाला कोणतेही गालबोट लागू नये, म्हणून जी पोलिस फौज तैनात करण्यात आली होती. त्यांनीसुद्धा आपल्या ड्यूटी पाठोपाठ जल्लोषामध्ये आपला सहभाग नोंदवला होता.
(एक दोन सौम्य लाठीचार्ज सोडले तर, त्यांनी त्यांचे ब्रिदवाक्य अगदी चोख पार पाडले होते.)
पाणी वाला पाण्याच्या बोटल विकत होता, तर फुगेवाली बाई आपल्या तान्हुल्या बाळाला घेऊन फुगे विकत होती. विसर्जनाला एका जत्रेचेच स्वरुप प्राप्त झाले होते. सगळे काही नजरेत सामावून घेण्यासारखेच होते ते.
फुटाळ्याचा राजा, टेकड़ीवरचा राजा, मंडईचा राजा,
HillTop चा राजा अश्या सर्व राजांची जणू काही बैठकच बसली होती. पण ही बैठक काही वेळेपुरतीच होती. कारण काही वेळातच फुटाळ्याचे चित्र बदलणार होते. ज्याची कल्पना फ़क्त त्या राजांनाच होती.
बघता बघता रात्र ओसरून दिवस उजाडणार होता. येणारे येतच होते, जाणारे जातच होते. उत्साह कोठेही कमी होत नव्हता. आम्हाला सुद्धा घटकाभर डोळा लागला होता.
सूर्याच्या किरणांनी जेव्हा डोळ्यांना जाग आली, तेव्हा काही वेगळेच दृश्य डोळ्यांना दिसत होते. विश्वासच बसत नव्हता की आम्ही त्याच फुटाळ्यावर आहोत, जिथे काही तासांपूर्वी एक जत्रा भरली होती.
परंतु त्याच फुटाळ्याला आता स्मशानभुमी सारखेच रूप मिळाले होते. तळ्यामध्ये मृतदेह तरंगत यावा तसेच आपल्या बाप्पाचे शरीर पाण्यामध्ये एकमेकांवर तरंगत होते. कोणाचा हात पाय मोडला होता, तर कोणाचे शिर धडापासून अलग झाले होते. थरावर थर लागले होते, आणि त्या थरातून आपला बाप्पा कोणता..?? हे ओळखनेच अशक्य होते.
एका क्षणात त्सुनामी यावी आणि सर्व काही उधवस्थ करून जावी असेच झाले होते. बाप्पाची अशी अवस्था बघुन माझे हातपायच गळाले होते. महानगरपालिकेची गाड़ी एक एम्बुलेंस यावी तशी गेटमधून तळ्यावर आली होती. पाठोपाठ दोनचार जेसीबी. गाडीमधून काही माणसांची टोळी तळ्यामध्ये उतरून बाप्पाचे देह बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होती. बघता बघता सर्व तळ्यावर बाप्पाच्या अर्धवट देहांचा थरच लागला होता. एखाद्या मृतदेहाचे शवविच्छेदन करावे, तसे बाप्पाच्या देहाचे पोस्टमार्टम चालु होते.
आम्ही थक्क अवाक् होऊन सर्व पाहत होतो. ज्या गणपती बाप्पाला गेले अकरा एक दिवस एखाद्या राजासारखे जपलो होतो. त्याच गणपती बाप्पाला मी माझ्या डोळ्यासमोर गमावून बसलो होतो.
"गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या.." च्या गजरामध्ये ज्या बाप्पाला आम्ही निरोप दिला होता. तो बाप्पा आता कधीच परत येणार नव्हता. त्याची विसर्जन मिरवणूक म्हणजे एक प्रकारची मरणापूर्वीची शवयात्राच होती. ज्याची अंत्यविधि करण्याचे भाग्य सुद्धा बाप्पाच्या नाशिबी न्हवते.
ज्या जल्लोषात आपले मंडळामध्ये स्वागत होते. त्याच जल्लोषात आपली जिवंत अंत्ययात्राही निघणार आहे, याची पूर्वकल्पना कदाचित बाप्पाला मिळाली असावी, कारण बाप्पासाठी हा अनुभव काही नविन नव्हता.
निराश मनाने हताश होऊन आम्ही बाहेर निघू लागलो होतो.
बाहेर पड़ता पड़ता गेटच्या कोपऱ्यात उभ्या केलेल्या मंडपावर अशीच नजर पडली. ज्यावर लिहन्यात आले होते,
"मूर्ति स्वीकार केंद्र"
विचार करत होतो की, कोणत्या तोंडाने आम्ही बाप्पाला पुढच्या वर्षी परत येण्याचे आव्हान करत होतो.....??
_whosunilmali

Kya baat 👏
ReplyDelete