सपनों का IdiotBox

काळू पळाली....की पळवली...??

"मादरचोद खरं खरं बोल, नाहीतर नागड़ा करून बैटने उभा आडवा फोडून काढीन."
समोर उभ्या असलेल्या खाकी वर्दीतल्या कॉनस्टेबलला बघून मला स्वतःमध्येच गणेश गायतोंडे दिसू लागला होता. क्षणभरासाठी पायाखालची जमीनच सरकली होती. गावामध्ये काहिशे तणावग्रस्त वातावरण बनले होते. माणसांचा जमाव एकत्र जमलेला होता. पण सर्वजणच भयभीत होते. सर्वत्र पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जणू काही एखादी नक्षली मोहीम चालु असावी अशी.

कोपऱ्यामध्ये टक लावून बसलेल्या एका आज्जीला मी विचारून घेतलं. परंतु त्या आजीचीही अवस्था माझ्याहुनही वाईट बनली होती.
इतक्यात त्या गर्दीमधून एक आवाज आला,
"एका एकाची झाडून चौकशी घ्या. सुटला नाही पाहिजे. आमदाराच्या पोरीला पळवली आहे साल्याने. जिथे असेल तिथून शोधून काढा."

माझ्या डोक्यामध्ये काहिशी ठिनगी पेटली. कारण बाजूच्या गावामधील आमदाराची पोरगी पळाली होती. आणि तिला शोधण्यासाठीच ही सर्व ओढ़ातान चालू होती. पण बाजूच्या गावातील आमदार, आणि त्याची पोरगी म्हणजे "काळू" असावी, असेच मला वाटू लागले होते.

होय,
तीच काळू जिला मी गेल्या वर्षभरापासून ओळखत होतो. लहानपणापासूनच खुप काळी असावी म्हणून गावातील सर्वजण तिला "काळू" म्हणून हाक मारायचे. खोडकर स्वभावाची. भयंकर रागीट. पोरांप्रमाणेच वागणारी. शिवीला शिवीनेच उत्तर देणारी काळू.
वाढत्या वयाबरोबरच काळूच्या सौंदर्यातही खुप बदल झाला होता. रागिट काळू आता देखणी दिसायला लागली होती. परंतु तिच्यातील तो खोडकरपणा अजूनही तसाच होता. हे मला तिच्या सोबतच्या गेले वर्षभराच्या बोलान्यातून जाणवले होते. आम्ही दोघे एकमेकांचे खुप चांगले मित्र बनलो होतो. पण आमची मैत्री अश्या प्रकारची होती. ज्यामध्ये आम्ही दोघांनी एकमेकाला कधी पाहिलेच नव्हते. ओळखीचे असूनही अनोळखी होतो आम्ही. पूर्णपणे....!!

पण काळू पळाली की पळवली..??
हाच प्रश्न होता. अश्या या काळूला पळवून नेण्याचे धाडस कोण करेल..! कारण तिचा बाप एक प्रतिष्ठित आमदार होता. आणि काळू त्या आमदाराची डेंबिस पोरगी होती. जी काल रात्रिपासून गायब होती. हे जेव्हा मला समजले, तेव्हा क्षणभर विश्वासच बसला नाही.

हवालदार साहेबांची चौकशी पाहुन माझ्याही हाताला दरदरुण घाम सुटला होता. काही बोलण्याच्या अगोदरच त्यांची थप्पड कानावर पडत होती. प्रत्येक घराची झाडाझड़ती चालू होती. एक एक माणसाला शोधून त्यांची चौकशी चालू होती. विशेष करून विशीतल्या तरुण पोरांची चौकशी तर खुपच कड़क, शिवराळ, हाणामारीच्या भाषेत चालू होती.
"चुतिया, कुठे आहे काळू. तुझा आणि तिचा काय संबंध आहे. कधी भेटला होता तू तिला. तुझ्याकडे तिचा मोबाईल नंबर कसा काय आला. खरं बोल. नाहीतर जिवंत ठेवणार नाही तुला भाडखाऊ."

मी सुद्धा खुप घाबरलो होतो. कारण माझीही चौकशी होणार होती. माझासुद्धा मोबाईल चेक होणार होता. त्यामुळे काळू चा नंबर डिलिट करण्यासाठी मी whatsapp ओपन केले. आणि त्यातून काळूचा नंबर शोधू लागलो.
पण कुठेतरी वाईट वाटत होते. कारण मला घाबरुण जायची काहीच गरज नव्हती. माझ्या हातून असा कोणता गुन्हा घडलाच नव्हता. मी आणि काळू फक्त एक चांगले मित्रच होतो. अश्या विचारामुळे मनाला थोडासा धीर भेटला होता.

पोलिसांच्या नजरेतून थोडासा बाजूला आलो. अन् विचार केला की जो पर्यंत पोलिस बंदोबस्त कमी होत नाही. तोपर्यंत गावातून गायब होण्याचा निर्णय घेतला. गडबडीने घरी गेलो, बॅग उचलली आणि आईला सांगितले की, मित्राच्या गावी जात आहे. यायला वेळ होईल. तू वाट पाहू नको.
गावातील वेशीतून नकळत बाहेर पडत, सर्वांच्या नजरेआड़ मी माळावरील शेतामध्ये पोचलो. विसावा म्हणून एका आंब्याच्या झाडाखाली बसून पाणी प्यायला लागलो. इतक्यात चार एक तरुण पोरांची टोळी मला शेजारील शेताच्या बांधावर दिसली. घामाघुम चेहरे, हातामध्ये कोयते, तोंडामधुन गुटख्याच्या पिचकारी मारत शिव्या देत होते ते. त्याच्याकड़े बघून वाटत होते, की ते बाजूच्या गावातीलच असावेत. त्यांनाही चकमा देऊन मी तिथून झटकन पसार झालो.

गावातून खुप लांब दुरवर पोचलो होतो मी. आमच्या आणि शेजारील गावाची बॉर्डर दिसू लागली होती. खुप जुन्या काळातील तटबंदी सारखी दिसणारी बॉर्डर लाइन होती ती. ज्यावर पोलिसांचा इतका कड़क पहारा लावण्यात आला होता, की या गावातील जनावर त्या गावामध्ये जाऊ शकणार नव्हते. जणू काही सैफअलीखान चा "तैमूर" गायब झाल्यासारखा बंदोबस्त लावण्यात आला होता.
पण गावातील खुपच कमी लोकांना त्या तटबंदी मधून बाहेर जाण्याचा एक गुप्त रस्ता माहीत होता. जिथे पोलिस बंदोबस्त ठेवणे खुप अवघड होते. वेळ न घालवता मी तिथून बाहेर पडू लागलो होतो.
हळूहळू मी पूर्णपणे बॉर्डर लाइन क्रॉस करणार इतक्यात मला त्याच रस्त्याने काहीशी लगभग जाणवू लागली. तटबंदीच्या दुसऱ्या बाजूला दोन तरुण पोरी स्वतःला लपवत आमच्या गावामध्ये एंट्री करण्याचा प्रयत्न करीत होत्या.
पूर्णपणे घाबरलेल्या, अस्थाव्यस्थ चेहरे, विस्कटलेले केस, पळून पळून उन्हामध्ये सुटलेला घाम, यामधुन त्यांची ओळख लागणे थोडेसे अवघडच वाटत होते. त्यांना पाहुन मी स्वतःला एका कोपऱ्यामध्ये लपवून घेतले. आणि त्यांच्या हालचालींवर नजर ठेवली. असे वाटत होते की त्यांना काही मदतीची गरज असावी. म्हणून मी थोडासा त्यांच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. पण त्यातील एका पोरगीच्या चेहऱ्याकड़े पाहुन वाटत होते, की हीच तर ती "काळू" नसावी...!!

नकळत तोच चेहरा, तोच भाव, आवाजातील तोच प्रेमळ बालिशपणा सर्व काही काळू सारखेच जाणवत होते. परंतु जर का ही काळूच असेल तर, ती अशी घरातून का पळाली असेल..? काही अडचण तरी नसावी तिला..?? यांसारखे कित्येक प्रश्न मनात येत होते.
एकीकडे पोलिसांच्या भीतीने मनामध्ये धाकधुक चालू होती, तर दुसरीकडे काळूबद्दलच्या निरनिराळ्या प्रश्नांनी विचारांची घालमेल चालू होती.

काळूचे प्रतिबिंब माझ्या नजरेसमोरच तरळत होते. पण मला माहीत होते की, इच्छा नसतानाही माझ्या या स्वप्नाचा शेवट काही वेळातच होणार आहे.
डोळे उघडले की काळूचे ते प्रतिबिंब नाहिशे होणार होते. त्यामुळे डोळे बंद करून तसाच तिच्या त्या क्षणभंगुर हालचालींना नजरेत कैद करत होतो......


_whosunilmali

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

ओय हमाली.!!

Once upon a time in बुधवार पेठ,

"काळू"