मी नाना पाटेकर नव्हेच..!!

श्री महालक्ष्मी प्रसन्न... श्री तुळजाभवानी प्रसन्न... जय भवानी जय जिजाऊ............आणखी काय असतं बरं, ते येणाऱ्या नऊ दिवसांमध्ये दिसेलच.

पण मी मागील नऊ दिवसांचा विचार करत होतो. न्यूज़पेपर चाळत होतो. कारण कुठेतरी ऐकायला भेटत होते की, नाना पाटेकर यांनी एका महिलेशी छेड़छाड़ करण्याचा प्रयत्न केला.
"असा नट होणे नाही." म्हणून मोठ्या दिमाखात नटसम्राट मी सुद्धा पाहिला होता. त्यामुळेच माझ्यासाठीही क्षणभर खात्री पटणे अशक्यच होते.
पण "असाही नट होऊ शकतो." हेही तितकेच खरे असावे.

त्यामुळेच,
शहानिशा करण्यासाठी म्हणून खुप गांभीर्याने शोध घेत होतो. अगदी मागील नऊ दिवसांचे सर्व न्यूज़पेपर चाळून पाहिले. पण कुठेच नाना दिसत नव्हते. आणि इतक्यात ते दिसणार ही नव्हते. कारण सर्वजण मी नाना नव्हेच. मी आलोकनाथ नव्हेच. मी रजत भाटिया नव्हेच. असंच बोलत होते.
आणि त्यांचेही बरोबरच आहे. कारण त्यांच्या दृष्टीने कदाचित छेड़छाड़ प्रकरण ही इतकी गांभीर्याची गोष्ट नसावी.

पण त्याचवेळी कुठेतरी जाणीव होत होती की, आपण अजूनही त्याच संस्कृतीप्रधान देशात आहोत.
ज्या देशामध्ये जेव्हा एखादा पुरुष एखाद्या महिलेविरोधात आवाज उठवतो, तेव्हा तो मसाला आपल्याला खुप आवडतो. पण त्याच देशात जेव्हा एखादी महिला एखाद्या पुरुषा विरोधात आवाज करते, तेव्हा तोच मसाला तमाशा वाटून राहतो. आणि जोरदार आपटतो. कारण इथे अजूनही स्त्रीचा आवाज एखाद्या चार भिंतीआडच चालतो आहे.

पण यालाही काही महिला अपवाद आहेत. तनुश्री दत्ता, कंगना राणावत, ज्वाला गुट्टा, अशी कितीतरी नावे समोर येतील. ज्यांना वाटते की, कदाचित यावेळी तरी आपला आवाज कुठेतरी ऐकला जाईल.
दहा वर्षांनी जेव्हा एखादी महिला आपल्यावर झालेल्या अन्यायाची शहानिशा करण्याचा प्रयत्न करते, तेव्हा नक्कीच त्याची गंमत उडवली जाते. कारण त्यावेळी त्यांच्या प्रसिद्धिचा प्रश्न निर्माण होतो. त्यावेळी त्यांनी केलेल्या आरोपांची इतकी दखल ही घेतली जात नसते.

"8YearOldRapped...."
अशी जेव्हा न्यूज़ येते, तेव्हा तिला आदरांजली म्हणून इंडिया गेट वर मेणबत्त्या घेऊन जाणारे आपण जेव्हा एखादी महिला बलात्कार होण्याअगोदर आवाज उठवते. तेव्हा नक्कीच आपण तिची गंमत उडवणार.

तसेच तनुश्रीच्या बाबतीत झाले. 
तिनेही तेव्हाच आवाज उठवायला हवा होता. जेव्हा नाना तिच्यावर बलात्कार करतील. पण नानांचे नशीब कि, त्यांनी तसे काही कृत्य केले नसावे. अन्यथा त्यांनी फडकवलेला "तिरंगा" पुन्हा एकदा फडकवावा लागेल. आणि त्यावेळी नानांना पुन्हा बोलावे लागेल, "आ गये मेरी मौत का तमाशा देखने..." त्यांच्यासाठी तनुश्रीचे आरोप म्हणजे जेलमधील एका मच्छर सारखेच वाटत असावेत. 
पण एखाद्या स्त्रीची सहनशक्ति ही कधीही पुरुषांपेक्ष्या जास्तच असते. त्यामुळेच कदाचित तनुश्रीला दहा वर्षांनी का असेना जाग आली असावी. दहा वर्षांनी का असेना, नाना ही सही...!!

पण,
तनुश्री दहा वर्षांनी का बोलली....?? 
तेही अमेरीकेमध्ये स्थायिक झाल्यावर. कदाचित अन्याय झाला तेव्हा तिला इंडिया सुरक्षित वाटला नसावा. पण आज तरी इंडिया सेफ आहे का..?? तिच्यासाठी, बॉलीवुडसाठी.
"असा नट होणे नाही" ऐवजी "असाही नट होऊ शकतो." या दृष्टीने जर विचार केला, तर त्या आरोपांची दूसरी बाजू नक्कीच स्पष्ट होउ शकते.

मुद्दा आरोप प्रत्यारोप किंवा स्वतःला स्पष्ट करण्याचा नाही. स्वतःला वाचवण्याचाही नाही. तर प्रश्न आहे, समाजातील एका घटकावर झालेल्या अन्यायाचा, दहा वर्षांनी का होईना उठलेल्या आवाजाचा, कुठेतरी अपेक्षित असलेल्या न्यायाचा, भविष्यातील आपल्या सुरक्षिततेचा.

आज इंडिया मध्ये सुद्धा #MeToo नावाची मोहीम राबवली जाते. हीच मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे.
याचा अर्थ स्त्रीसक्षमीकरण, जागर स्त्रीशक्तिचा, फेमिनिजम, यांच्या नावाखाली इंडिया मधील स्त्री अजूनही सक्षम झालेली नाहिये. 

बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ यांऎवजी "बेटी को सिखाओ, बेटी को बढ़ाओ" असे बोलायची गरज भासत आहे. आपला देश बदलत आहे. देशातील कायदे बदलत आहेत. तेव्हा आपणही आपले विचार, आपला दृष्टीकोन नक्कीच कुठेतरी बदलन्याची गरज आहे. 
अन्यायाविरोधातील आवाजाला न्याय हां मिळतोच. नोबेल पुरस्कृत नदिया मुराद, मलाला युसूफझाई यांनी सुद्धा त्यांच्यावरील अन्यायाविरोधात आवाज उठविला होता. यांना न्याय मिळाला होता. मग तनुश्रीला ही न्याय मिळेल...?

असो,
शारदीय नवरात्रोत्सव चालु झाला आहे. सर्वत्र देवीचे आगमन झाले आहे. मंदिरातील देवीला सजवून, तिला दागिने घालून, आपण तिला पुजतो. तिची श्रद्धा करतो. तिला वंदन करतो.
पण,
कधीकधी कुतूहल वाटते की, 
आपल्या संस्कृतिप्रधान देशामध्ये त्याच मंदिरातील देवीला निर्वस्त्र किंवा नग्न पूजन्याची प्रथा का बरी नसावी. आपण का कधी मंदिरातील देवीला निर्वस्त्र पाहू शकत नाही.
जर मंदिरातील देवी निर्वस्त्र असती, तर कदाचित आज समाजातील वास्तव स्त्री निर्वस्त्र होण्याची वेळही आली नसती.

SoSorryDeviji
जय माता दी.

_whosunilmali

Comments

  1. काळ बदलला की लोकांचे विचार बदलतात.....
    दादा तू अगदी परखड मत व्यक्त केलंस
    सलाम तुझ्या लेखणीला......

    ReplyDelete
    Replies
    1. लोकांचे विचार नक्कीच बदलत आहेत, फ़क्त त्या
      विचारांना योग्य दिशेने खतपाणी मिळाले की मग लय भारी.😊

      Delete
  2. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  3. Nice thinking...well done Sunil...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

ओय हमाली.!!

Once upon a time in बुधवार पेठ,

"काळू"