"ती"

Ti........,

निसर्ग आणि प्रेम यांचं एक अतूट नातं आहे.
निसर्गामधील प्रत्येक अशी गोष्ट जी प्रेमाशी मिळतीजुळती असते. जसे की,
मी, तो पौर्णिमेचा चंद्र आणि "ती""""""



त्या चंद्रासारखंच आहे तिचं सौंदर्य,
निर्मळ असं........
त्याच्या शुभ्र प्रकाशात मी तिलाच शोधत असतो,
कधी लहान तर कधी मोठा होत असतो तो,
अगदी तिच्या सौंदर्या सारखाचं,
पण मला नाही फरक पडत,
मी वाट पाहतच असतो,
कधी पहाटे तर कधी रात्रि,
पण काळजी तेव्हाच वाटते, जेव्हा ती
अचानक एक दिवस गायब होते,
त्या अमावस्येच्या रात्रि.........

तरीही,
मी भान हरपुन जातो,
लक्ष नसतं की,
त्या चंद्रासोबत खुप चांदण्या सुद्धा आहेत,
चांदण्या लुकलुकत आहेत,
आपलं सुद्धा सौंदर्य दाखवायचा प्रयत्न करीत आहेत,
भांडत आहेत,
त्या प्रयत्ना मध्ये तुटून पडत ही आहेत,
पण तुला पाहण्यासाठी आतुर झालेले मन,
त्या तुटलेल्या ताऱ्यांना पाहुन अपेक्ष्या ठेवणंच विसरून गेले आहे. मन मात्र,
तुझाच चेहरा शोधन्यात मग्न आहे.

तू काळजी नको करू,
मी ही त्या ध्रुव ताऱ्यासारखाच आहे.
कदाचित तुलाही न दिसणारा,
त्याच जागी, त्याच वेळी,
नेहमी तुझीच वाट पाहणारा.......

पण,
ती पौर्णिमेची रात्र.

कधी न मिटणारे डोळे,
तुझ्या दिसन्याने सुटकेचा श्वास घेतात,
तुझी वाट पाहता पाहता,
ते सुद्धा दमुन जातात,
त्या दमलेल्या पापन्या मिटून जातात,
पण, हृदयाची धडधड़....त्यांचं काय,
त्यांना कधी दम लागेल,
हाच एक प्रश्न,
त्या मिटलेल्या पापन्यांना असतो,
त्या धडधड़ीला ही आता सवय झालीय,
तुझी वाट पाहण्याची......

दृष्टी हरवून बसलेले डोळे मात्र,
तुझ्याच आठवणीं मध्ये गुंग असतात,
रात्रिची कधी सकाळ झाली,
हे त्यांचं त्यांनाचं उमगत नाही,
जेव्हा जाग येते, तेव्हा मात्र.
तेच डोळे पश्चाताप करीत असतात. कारण,
त्यांनी तुला पुन्हा एकदा गमावलेलं असतं,
तुझ्या सौंदर्याला ते बळी पडलेले असतात,
पुन्हा एकदा.......

तू मात्र,
अगदी निस्वार्थपणे आपल्या सौंदर्याची उधळण करीत होती,
माझ्या मिटलेल्या डोळ्यांवर, अगदी रात्रभर.

त्याच डोळ्यांना आता पुन्हा एकदा वाट पहायची आहे,
त्यांना आतुरता आहे,
तुझ्या पुन्हा दिसण्याची,
तुला पुन्हा पाहण्याची,
किंचित का असेना, पण
पुन्हा लाजुन अलगद उगवणारी,
पुन्हा एकदा हसून जाणारी,
जाता जाता मलाही हसवुन जाणारी,
शोध घेईल तशी दूर जाणारी,
माझी रात्रिची झोप उडवून जाणारी,
नेहमीच वाट पहायला लावणारी,
तिच ती.
निर्मळ अशी,
रात्रिच्या चंद्रामागे दडलेली......... "ती"



_whosunilmali

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

ओय हमाली.!!

Once upon a time in बुधवार पेठ,

"काळू"