While watching PORN...nd.
Actually सर सॉरी सर.... प्लीज सर... आम्ही काहीच केलं नाहीय.. सॉरी सर... हा लैपटॉप आमचा नाहिये सर... सर चूक झाली... सॉरी न सर... पाया पडतो हवं तर...!!! भीतीने आम्ही घामाघुम झालो होतो.
शासकीय वसतिगृह हातकणंगले, रूम नं. 25.
खिड़कीच्या काचा व्यवस्थितपणे बंद करून मी आणि माझा जूनियर लैपटॉप समोर बसलो होतो. तसा तो लैपटॉप दुसऱ्याच मित्राचा होता. टाइमपास म्हणून मीच तो बाहेर काढला होता. मूवीज च्या फोल्डर मध्ये जाऊन पाहिलो तर त्यामध्ये मस्ती, ग्रैंड मस्तीचे पार्ट आम्हाला दिसले.
जूनियरने नुकतीच अकरावी ला एंट्री केली होती. त्यामुळे त्याला ग्रैंड मस्ती पाहण्याची खुपच घाई लागली होती. आणि त्याच्या संगतीने मला सुद्धा मस्ती अनुभवायची संधी भेटली होती.
पण मनामध्ये थोडीशी धाकधुक चालू होती. त्यामुळे सुरक्षा म्हणून आम्ही लोकांनी खिड़कीला एक पडदा लाऊन घेतला. कारण, काही दिवसांपूर्वीच वार्डन सरांनी एका आठवीच्या मुलाला रंगेहाथ PORN पाहताना पकडले होते. आणि सर्वांना धमकीवजा इशारा दिला होता की,
मोबाइल किंवा लैपटॉप मध्ये काही अश्लील साहित्य सापडल्यास त्याला वसतिगृहातुन हाकलुन देण्यात येईल.
त्यामुळेच,
ग्रैंड मस्ती सुरु करण्याअगोदरच मला खुप घाम फुटला होता. पण धाडस करून आम्ही तो मूवी पाहण्यात खुप रंगलो होतो. इतक्यात,
कोणीतरी रूमचा दरवाजा नॉक केला. मी घाईघाईने सगळे फोल्डर मिनिमाइज केले. जूनियर ने जाऊन अलगद दरवाजा ओपन केला तर संपतराव आयरेकरांची डायरेक्ट एंट्री माझ्या बेडवर झाली. पाहताक्षणीच त्यांनी लैपटॉप आपल्या हातामध्ये घेतला.
आयरेकर म्हणजे वसतिगृहातील वार्डनलाही लाजवेल असे व्यक्तिमत्व. डोळ्यांवर तिरपा चश्मा, व्हाइट कॉलर, आणि तोंडभरून नेहमी मावा. तसे ते पेशाने एक कारकुनच होते. पण सर्वांचे लाडके बनून गेले होते. कारण सर्व मुलांचा लेखाजोखा हा आयरेकरला तोड़पाठ असायचा. सर्वांच्या खाजगी हालचालींवर नजर ठेवण्याची मोहीम आयरेकरांच्या हातात होती.
त्यांनी खिड़कीच्या कोपऱ्यातुन आम्हाला अगोदरच पाहिले होते. पूर्ण तयारीनेच त्यांनी आमच्यावर धाड़ टाकली होती. आम्ही दोघेही खुप घाबरून गेलो होतो. कारण आमची मस्ती आता आयरेकरांच्या हातामध्ये होती.
त्यांनी लैपटॉप ओपन केला आणि ज्या फोल्डर मध्ये जायचा रस्ता आम्हालाही माहीत नव्हता त्याच फोल्डर मध्ये नेमके आयरेकर जाऊन पोचले. तोंडातील माव्याची पिचकारी खिड़कीतुन बाहेर मारून आयरेकर गालातल्या गालात हसु लागले. मलाही थोडेफार हसु येत होते. पण चेहऱ्यावरील घाम पाहुन मी स्वतःला कंट्रोल केले. कारण, त्या फोल्डर मध्ये काही अश्लील साहित्य आयरेकरांच्या हाती लागले होते.
"चला... लैपटॉप जप्त. सामान गुंडाळा."
तिरप्या डोळ्याने आयरेकर बोलत होता.
आम्ही दोघेही खुप विनंती करत होतो. जूनियरने तर आयरेकरचे पायच धरले होते.
"अहो सर खरंच, आम्हाला माहीत नव्हते की यामध्ये असं अश्लील काहीतरी आहे आणि तुम्हाला ते सापडेल, याची खरंच कल्पना नव्हती." मी सरांना खुप समजवायचा प्रयत्न करत होतो. माझ्या बाबतीत पहिल्यांदाच असे घडले होते. कारण त्यावेळी माझ्याकड़े साधा मोबाइलही नसायचा. पण आयरेकरला आयतेच घबाड सापडले होते. त्यांना ही संधी सोडायची नव्हती. त्यांनी आम्हाला ऑफिस मध्ये घेऊन गेले.
PORN पहावे की न पहावे.??
PORN पाहिले तर कधी आणि किती पहावे.???
PORN पाहन्याला काही वयोमर्यादा आहेत का.????
PORN पाहन्याचे काही साइड इफेक्टस आहेत का.?????
PORN कोठे उपलब्ध होते.??????
PORN मुले आणि मूली दोघेही पाहू शकतात का.???????
PORN पाहणे अश्लील आहे का. किंवा त्यामुळे आपले चारित्र खराब होईल का.????????
PORN पाहणे गुन्हा आहे का.??????????
हा प्रश्न फ़क्त माझा किंवा माझ्या जूनियरचा नाहिये.!!!
तर वयात आलेल्या प्रत्येक Gender च्या मनात हेच प्रश्न असू शकतात. ज्याची उत्तरे आजही कोणत्या शाळेत किंवा जाहिर सभेमध्ये दिली जात नसतात. कारण आजही आपल्या आजुबाजुला Sex आणि लिंगभेद या खुप संवेदनशील समजल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत.
काही दिवसांपूर्वी आपल्या देशात 350च्या वर PORN साइड्स बंद केले गेले.
का.? कश्यासाठी.??
(मलाही माहीत नाही. कारण अजूनही काही साइड्स या ओपन होत आहेत. त्यामुळे सध्यातरी सर्वांची गरज पूर्ण होते आहे.!!)
पण कदाचित आपल्या सरकारला एखादी अनुदानित PORN साइड ओपन करायची असेल. असो.
आपल्या सर्वांना व्यक्तिस्वातंत्र्य आहे. पण PORN आणि सेक्स यासारख्या गोष्टींवर उघडपणे बोलले जाईल, चर्चा केली जाईल इतके स्वातंत्र्य मिळाले आहे की नाही याबद्दल अजुनही प्रश्नचिन्ह आहे.
आजच्या आधुनिक, प्रगत समजल्या जाणाऱ्या आपल्या देशात PORN उपलब्ध होणे खुप क्षुल्लक बाब आहे. पण आजच्या तरुण पिढ़ीमध्ये PORN संदर्भात जे न सुटनारे कोड़े निर्माण होते. ही खुप गांभीर्याची बाब आहे.
पण मला कोणतेही प्रवचनपर भाषण द्यायचे नव्हते.
ऑफिस मध्ये आम्ही दोघे एखाद्या भुरट्या पाकीटमार सारखे उभे होतो. सॉरी बोलणे चालूच होतं. आयरेकरने आमची सगळी मस्ती बाहेर काढायची, असेच ठरवले होते.
वसतिगृहामध्ये वार्डन सर अजुन यायचे होते. त्यामुळे आम्ही थोडेफार बचावलो होतो. आयरेकराने सरांना कॉल करण्याचे नाटक केले आणि आमच्या कडून एक जबाब लिहून घेतला.
"मी सुनिल माळी,
आजपासून मोबाइल इत्यादी उपकरणे वसतिगृहात जवळ बाळगणार नाही. इथून पुढे मी काही अश्लील साहित्य जवळ बाळगल्यास मला वसतिगृहातून हाकलुन देण्यात यावे. याची पूर्णतः ग्वाही देत आहे."
आपला विश्वासु.
आम्ही खाली मान घालून बाहेर पडलो. कुठेतरी स्वतःची लाज वाटत होती. पण आयरेकरांच्या तावडीतुन लवकर सुटल्याचे समाधान ही होते. आम्ही तो लैपटॉप काही दिवसांसाठी वसतिगृहाबाहेर ठेऊन आलो होतो.
काही दिवसांनी ग्रेट ग्रैंड मस्ती रिलीज झाला होता. सुट्टीच्या दिवशी आम्ही मुलांनी तो सुरक्षितपणे सिनेमा थिएटर मध्ये जाऊन पाहिला.
दिवस बदललेले आहेत. आणि दिवसांमागुन आयरेकरांसोबत आपली सुद्धा मानसिकता बदललेली असावी. इतकीच अपेक्ष्या आहे.
_whosunilmali

लैँगिक समस्या, त्याविषयीचे प्रश्न, आणि त्यावर उपाय म्हणून दिले जाणारे लैँगिक शिक्षण यांसंबंधित एक उत्तम उपक्रम "महाराष्ट्र सकारात्मक कृती समिति"(महाराष्ट्र) ने गेले वर्षभरापासून हाती घेतले आहे. ज्याचे काही सकारात्मक positive असे परिणाम ही दिसून येत आहेत.
ReplyDeleteजर तुमच्या मनातही लैँगिकते विषयी काही प्रश्न, शंका असतील, तर तुमच्या प्रश्नांची उत्तरे नक्कीच तुम्हाला इथे मिळतील.
जर तुम्हाला सुद्धा या अभियाना मध्ये सहभागी व्हायचे असेल. तर "महाराष्ट्र सकारात्मक कृती समिति" या फेसबुक पेज ला भेट देऊ शकता.
Thank You.😊
😁😁😁😁
ReplyDelete😇😇😇
Delete