सपनों का IdiotBox/0.1

अजूनही मी स्वप्नातच होतो. पूर्ण रात्र त्या चौकातच उभा होतो. या गल्लीतून त्या गल्लीत घिरट्या घालत होतो. काळजीने मन चलबिचल झाले होते. मला समजत नव्हते की, ती कुठे गेली असावी.!! घरी नाहीय, चौकातल्या कट्टयावर नाहीय, मग गेली तरी कुठे.?? ती हरवली तरी नसेल.!!

रात्रीचे जवळपास साडेतीन चार वाजले होते. सर्वत्र भयान शांतता असताना मी मात्र त्या चौकात सैरावैरा फेऱ्या मारत होतो. माझी नजर फक्त तिचाच शोध घेत होती. कारण, काही तासांपुर्वीच आम्ही एकत्र त्या कट्टयावर बसलो होतो. आम्ही म्हणजे ती, मी, आणि तिची आई.!!

माझी आणि तिच्या आईची खूप चांगली ओळख होती. तशी तिची आणि माझी सुद्धा ओळख फार जुनी होती. पण ती नुसती ओळखी पुरतीच मर्यादीत. रात्रीचे पाय मोकळे करायचे म्हणून ते दोघे घरातून बाहेर आले होते. म्हणूनच मी सुद्धा त्या दोघांना जॉईन झालो होतो.
रात्रीच्या त्या थंड हवेत तिला पाहताना अंगावर एक वेगळेच शहारे येत होते. अधून मधून येणारी एक हलकीशी झुळूक तिच्या चेहऱ्यावरील विस्कळीत केसांसोबत वेगळाच खेळ खेळत होती. आपल्याच विश्वात वावरणारी, मनातलं कधी ओठांवर न आणणारी ती. मी तिला फक्त लांबूनच पाहत होतो. कारण, माझ्यासुद्धा मनातले शब्द कधी ओठांवर आलेच नव्हते. पण त्या रात्री तिच्याकडे पाहून एक वेगळीच उत्कंठा दाटून आली होती. खूप काही नको, पण थोडे का असेना, तिच्याशी बोलायला भेटेल म्हणून मी संधीचे सोने करण्यासाठी कट्टयावर बसलो होतो. पण तिला पाहिल्यावर मनाने धाडस केलेच नाही. न राहवून मी त्या कट्टयावरून उठलो व घरी जायला निघालो.

गमतीचा भाग म्हणजे आम्ही दोघे खूप जवळचे शेजारी होतो. (एका रात्रीपुरते. स्वप्नातले) अगदी शेजारी शेजारीच. म्हणजे इतक्या जवळचे की, जर का तिच्या बापाने तिच्या आईशी भांडण जरी केले, तर ते भांडण माझ्याच घरचे वाटायचे. त्या रात्रीसुद्धा त्यांच्या घरी काहीतरी गोंधळ चालूच होता. शेजारी असल्या कारणाने मला त्यांच्या गोंधळात पडण्याची गरज होती. कारण त्या निमित्ताने का होईना मला तिला पाहायची संधी भेटणार होती. आणि माझ्या मनातील गोंधळ शांत होणार होता. म्हणूनच मी तिच्या घरी पोचलो होतो.

घरात गेल्यावर एक वेगळेच चित्र. अगदी क्षुल्लक गोष्टीवरून एकमेकांशी तिचे आई बाबा भांडत बसले होते. पण त्यांच्या भांडणात मला "ती" कुठेच दिसत नव्हती. घराचे सगळे कोपरे निरखून पाहिले तरी ती तिथे कुठेच नव्हती. कदाचित लवकर झोपली असावी म्हणून मी तिच्या खोलीत जाऊन पाहिले, पण तिथे सुद्धा फक्त तिचा रिकामा बेडच दिसत होता. शेवटी मला आईबाबांच्या भांडणात पडावंच लागलं.
"आई, कुठे आहे ती.??"
"अरे.. अजून आली नाहीय ती." तिच्या आईने लगेच उत्तर दिले.
"आली नाहीय म्हणजे.! तुमच्या सोबतच बसली होती ना कट्टयावर. मग तिला घेऊन यायचं ना सोबत.?!!" मी तिच्या आईशी बोलत होतो.
"अरे... पण मला काय विचारतो आहेस.!! ती लहान आहे का काही. असेल इथेच कुठेतरी. तू नको काळजी करू."

तिच्या आईंच्या बोलण्याकडे माझे लक्षच नव्हते. रात्रीचे अकरा वाजून गेले तरी तिचे अजूनही घरी न येणे मला काळजीत टाकणारे होते. मला खूपच काळजी वाटत होती. काही तासांपूर्वी आपल्या नजरे समोर असणारी ती अजूनही घरी का आली नसेल. तिच्यासोबत काही बरे वाईट तरी झाले नसेल.! ती संकटात तरी नसेल.!? आणखी खूप प्रश्न निर्माण होण्याच्या अगोदर मी तसाच पायी चप्पल न चढवता तडक घरातून बाहेर रस्त्यावर आलो. ज्या ठिकाणी मी, ती, आणि तिची आई, बसलो होतो. त्या कट्टयावर तरी बसली असेल म्हणून मी घाई घाईने तसाच अनवाणी पायाने रस्त्यावरून धावत होतो.

पण, जेव्हा मी दमून धावून त्या चौकात पोचलो. तेव्हा मला काहीतरी वेगळेच दृश्य दिसत होते. ज्या कट्टयावर आम्ही बसलो होतो. त्याच कट्टयावर काही चार पाच पोरं व त्या पोरांसोबत एक पोरगी सुद्धा बसली होती. अगदी तिच्या सारखीच.!! तशीच हसत होती. बोलत होती. त्या पोरांच्या सोबत पूर्णपणे मिसळून गेली होती ती.
पण, इतक्या रात्री घरातून एकटी का बरी बसली असेल ती इथे.?!! तेही कोणा अनोळखी पोरांसोबत.!! कारण, मी त्या पोरांना या अगोदर कधीच पाहिले नव्हते. त्यांच्याकडे पाहून ते मला कोणीतरी टपोरी, मवाली टाईप पोरं वाटत होती. त्यामुळेच मला तिची आणखीनच काळजी वाटत होती. म्हणून मी जवळ जाऊन तिला पाहू लागलो. पण जसजसे मी जवळ जात होतो. तसतशी माझ्या मनातील शंका दूर होऊ लागली होती. कारण तिच्या सारखी दिसणारी ती पोरगी कोणीतरी दुसरीच पोरगी होती.

त्या पोरांसोबत ती नाहीय हे पाहून मला भारी वाटले, पण काही क्षणच. कारण ती त्या कट्टयावर नव्हती. घरीसुद्धा नव्हती. चौकातही कुठेच नव्हती. मग ती गेली तरी कुठे.??

"काळू" हरवली होती.!!
हरवलेल्या काळूला शोधता शोधता मी सुध्दा पुर्णपणे हरवलो होतो. पण तिचे असे हरवून जाणे हे माझ्यासाठी काही नवीन नव्हते. त्या चलबिचल मनाला सुद्धा तिच्यासोबत हरवून जायची सवयच लागली होती. त्यालासुद्धा वाटायचे की, किमान स्वप्नामध्ये येणाऱ्या "काळू" वर तरी माझा पूर्णपणे अधिकार असावा.
पण तिथे सुद्धा "काळू" हरवलेलीच दिसली. त्या सैरावैरा मनाने अजूनही एक आशा कायम ठेवली होती. त्याचा त्या हरवलेल्या काळूला एक प्रश्न होता;

वो तुम ही हो ना
जो मेरे सपनों में आती हो,
बिना बताये आके
चुपके सें चली जाती हो,
थोडा हसती हो
कभी मुस्कुराती हो,
जब तुम्हे देखता हुं
तो जल्दी सें छुप जाती हो,
मैं भी पागल,
पुरी रात आँखे बंद कर तुम्हे धुंडने में लग जाता हुं,
पर किसे पता था,
की तुम मेरे पलकों के पिछे ही छुप जाती हो,,,



_whosunilmali

Comments

  1. Casino, Resort, Spa & Gambling - Mapyro
    Find the best Casino, Resort, Spa & Gambling locations, 평택 출장샵 rates, entertainment, & 익산 출장안마 more nearby attractions. 상주 출장마사지 Address: 성남 출장샵 777 Casino Parkway, Suite 777 Casino 안성 출장안마 Parkway

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

ओय हमाली.!!

Once upon a time in बुधवार पेठ,

"काळू"