"ताजे चिरमुरे"
खुप दिवसांपासून मनात कोणता विषयच तयार होत नव्हता. काय लिहावे, कोणत्या विषयावर लिहावे, कसे लिहावे, लिहिलेलं इतरांना आवडेल का.?! असे खूप प्रश्न शोधत असताना अचानक एक रिक्षा दिसली, जी बाजूच्या गल्लीतून आवाज करत निघत होती.
लक्षात ठेवा बाग. नारळाची बाग.. .
सगळ्यांना सांगा बाग. नारळाची बाग.. .
विसरू नका नारळाची बाग.. . पहिल्यांदा ऐकुन खूप गमतीशीर वाटलं. पण नंतर समजले की, काही दिवसांनी येणाऱ्या निवडणुकीसाठीचा हा प्रचार चालू आहे. काही वेळाने ती रिक्षा गल्लीचे चार पाच फेऱ्या मारून निघून गेली. पण मनातील प्रश्न अजूनही त्याच जागी होते. त्यांना कोणता विषयच सापडत नव्हता.
वेळ निघून जात होती. दुपारचेअंदाजे बारा एक वाजणार होते. पोटाची भूकही हळूहळू वाढत होती. पण डोळ्यांना नकळत थोडीशी डुलकी लागणार इतक्यात नेहमीच्या वेळी ऐकू येणारे ते शब्द हळुवार कानावर येऊन पडत होते, "ताजे चिरमुरे.. . ताजे चिरमुरे.. .''
लहान असल्यापासून चिरमुरे विषयी एक वेगळंच आकर्षण असायचं. तात्पुरती भूक म्हणून चहासोबत आम्ही नेहमी चिरमुरे खायचो. मंदिराच्या ठिकाणी सुद्धा प्रसाद म्हणून सर्रासपणे चिरमुरेच वाटले जातात.
पण, त्या आवाजाने माझी उत्सुकता आणखीनच वाढत होती. कारण, लहानपनापासून तोच आवाज, तेच आजोबा, तीच त्यांची सायकल, सायकलीवर टाकलेले त्याचे चिरमुऱ्याचे पोते, सोबत मसालेदार फुकन्या, लाल पिवळे वाटाणे. असं बरंच काही असायचं त्या सायकलीवर.
तसाच मिटलेल्या डोळ्यांच्या अवस्थेत मी त्या आजोबांचा तो आवाज ऐकत होतो. "ताजे चिरमुरे.. .ताजे चिरमुरे.. .""
जसजसे त्या आजोबांची सायकल पुढे जात होती, तसतसे "ताजे चिरमुरे.. ताजे चिरमुरे.. ." च्या आवाजाची तीव्रता हळूहळू कमी होत होती. काही वेळाने तो आवाजही नाहीसा झाला. मला अलगदशी डुलकी लागली होती. माझे डोळे अजूनही मिटलेल्या अवस्थेतच होते. पण मनामध्ये एकावेळी दोन दोन आवाज घुमू लागले होते.
"ताजे चिरमुरे.. नारळाची बाग.. . चिरमुरे.. बाग. . नारळ. . ताजे नारळ. . .चिरमुऱ्याची बाग. . . लक्ष्यात ठेवा चिरमुरे.. . विसरू नका चिरमुरे. . ताजे नारळ. . सगळ्यांना सांगा ताजे नारळ. . निवडून द्या ताजे चिरमुरे. .""
तसाच बडबड करत घामाघूम होऊन मी ताडकन उठून बसलो. काही वेळेपुरते मला समजलेच नाही की, मी काय बडबड करत होतो. "नारळ. . बाग. . चिरमुरे. . ." काय होते हे सगळं.?!!
डोक्याला थोडासा ताण दिल्यावर मला ते आजोबा, त्यांची सायकल, त्यांचे चिरमुरे, ती रिक्षा, रिक्षावरील तो झेंडा, रिक्षामधून केलेला तो नारळाच्या बागेचा प्रचार हे सगळं मला हळूहळू आठवू लागले. दीर्घ श्वास घेऊन चेहऱ्यावर फुटलेला घाम पुसून घेतला.
काही वेळेपुरते मला असे वाटून गेले होते की, ते आजोबा सुद्धा आपल्या चिरमुऱ्याचा प्रचार करण्यासाठीच आले होते. "ताजे चिरमुरे.. .ताजे चिरमुरे.." असे म्हणून ते आपला वचननामा च जाहीर करत होते असे वाटून गेले.
पण, आजोबांनी जाहीर केलेल्या वचननाम्यात मला प्रामाणिकपणा दिसून आला होता. कारण, त्यांचा हा प्रचार मी अगदी लहानपणापासून ऐकत आलो होतो. कदाचित त्या आजोबांना आपल्या "ताजे चिरमुरे" च्या जाहीरनामा मधून खूप काही सांगायचे असेल.
त्यांचंही ही बरोबरच असेल कदाचित. कारण सगळा देश निवडणुकांमध्ये व्यस्त झाला होता. जो तो एकच प्रश्न विचारत होता की, "काय वातावरण आहे.?!" "कोण निवडून येईल.?"
मलाही काही मित्रांनी विचारले होते की, कोणत्या पक्षाला मतदान करायचे.?!
माझ्याकडे या प्रश्नाचं उत्तर त्यावेळी नव्हते. पण त्याचं उत्तर मला त्या आजोबांनी दिले होते.
एक प्रकारे आजोबांनी सुद्धा आपला उमेदवारी अर्ज भरला होता. जेव्हा पासून आजोबांनी मला त्यांचा जाहीरनामा ऐकवला होता, तेव्हापासून माझी निवडणुकी बद्दलची उत्कंठा वाढत होती. कारण, मला माझा राष्ट्रीय हक्क बजावयाचा होता. मी पहिल्यांदाच वोटिंग मतदान करणार होतो. बोटावर शाई लावून त्याचा सेल्फी प्रथमच फेसबुकवर टाकणार होतो.
यापेक्षाही मी एक जबाबदार नागरीक म्हणून मी माझं कर्तव्य पार पाडणार होतो.
तसंही माझ्या एका मताने होणाऱ्या निवडणूकामध्ये असा कोणताही चमत्कार घडणार नव्हता किंवा कोणाला फायदा तोटाही होणार नव्हता. पण, माझ्यासारख्या इतर अनेक लोकांमुळे नक्कीच काही न काही चमत्कार घडणार होता. असे मला त्या आजोबांनी सांगितले होते.
ज्या लोकांनी मतदान केले आहे, अश्या लोकांचा उमेदवार जर निवडून आला तर त्यांना त्यांच्या सोयी सुविधा गरजा मागण्याचा अधिकार आहे. जर कदाचित एखाद्याचा उमेदवार निवडून नाही आला तर त्यालाही आपल्या सोयी सुविधा साठी विरोध करण्याचा अधिकार आहे. पण, ज्यांनी मतदान केलेच नाही त्यांनी मात्र वरील दोन्ही अधिकार गमावलेले असतात. त्यांना आपल्या देशाशी किंवा त्यांच्या कर्तव्याशी काहीही देणेघेणे नसते.
निवडणुकांमध्ये जे सरासरी 60 एक टक्के मतदान केले जाते, त्यातील 40 टक्के मतदान हे वृद्ध अडाणी लोकांनीच केलेले असते, ज्यामुळे येणारी आणखी काही वर्षे सर्वांनाच आणखीन अडाणी बनवले जाते.
आपल्या देशात मतदान हा एक बहुमूल्य असा हक्क घटनेने आपल्याला दिला आहे. ज्याची किंमत फक्त 500- 1000 रुपयांत केली जाते.
माझ्या आईला मी घरी गेल्यावर विचारले की, तू कोणाला करणार आहेस तुझं मतदान.??
आईच्या तोंडून काही चिन्ह ऐकायला मिळाली. जी गेली वर्षानुवर्षे ती ऐकत पाहत असावी. तिला तर हेही माहित नव्हते की, आता ही चिन्हे अस्तित्वातच नाहीयत. तिला मी रीतसर तो आजोबांचा "ताजे चिरमुरे"" चा जाहीरनामा ऐकवला. तिला समजावून सांगितलं की, न घाबरता, निःसंकोचपणे तू तुझं मतदान करून ये. मतदान करताना ते कोणत्याही एका पक्षाला किंवा उमेदवाराला न करता ज्या व्यक्तीकडे आपण आपले प्रश्न हक्काने मांडू शकतो. आपल्या प्रश्नांसाठी ज्याच्याकडे आपण निःसंकोचपणे केव्हाही जाऊ शकतो अश्याच व्यक्तीला आपण आपले मत दान करावे असे त्या आजोबांनी मला सांगितले होते. ते सगळं मी तिला सांगून टाकले.
व्हाट्सअप्प फेसबुक वर काही तरुणांनी मतदानावर बहिष्कार म्हणून NOTA ला पसंती दिली होती. तसा त्यांनी त्याचा प्रचारही सुरू केला होता. कारण, आजकालची निवडणूक ही विकासासाठी नाही तर सत्ता संपादनासाठी लढवली जाते. असा अर्थ त्यांनी काढला होता. पण दुसऱ्या बाजूला काही लोक असेही होते ज्यांनी देशाच्या बोर्डरवरून सुद्धा आपला मतदानाचा हक्क "बेलेट पेपर" मधून बजावला होता. त्यांचा खूप अभिमानच वाटत होता.
शाळेत मास्तरांनी पहिलीच्या वर्गात आम्हांला रंगांची ओळख करून दिली होती. लाल रंगाला लाल म्हणायचे. भगव्याला भगवा. पिवळ्याला पिवळा. हिरव्याला हिरवा तर निळयाला निळा. पण, हाच भगवा जेव्हा हिरव्या मध्ये मिसळतो, किंवा लाल जेव्हा निळ्या मध्ये मिक्स होतो, तेव्हा कोणता रंग निर्माण होतो हे त्या मास्तरांनी आम्हाला शिकवलेच नव्हते. त्यामुळेच कदाचित आज आम्ही रिक्षावरील ते निरनिराळे झेंडे आणि त्यांचा रंग कधीच नाही ओळखू शकलो.
देशाची अर्थव्यवस्था ढासळली. जातीय तेढ भयंकर वाढली. भ्रष्टाचार अगणित वाढतच आहे. नोकऱ्या नाहीत. आता आम्ही काय करायचे.? याचं एकच उत्तर लोकांना माहीत आहे, ते म्हणजे मागच्या सरकारला जाब विचारायचे.!! आणि नवीन सरकार सत्तेवर आणायचे.
पण नेहमीप्रमाणेच पुन्हा तेच प्रश्न, तीच आश्वासने आणि तीच निवडणूक पुढच्या वेळेसही पाहायला मिळते.
कधीकधी असं वाटतं की, आपणच एका दिवसासाठी देशाचा पंतप्रधान व्हावं आणि सगळे प्रश्न एकदमच सोडवून टाकावेत. पण, ही गोष्ट वाटते तितकी नक्कीच सोपी नाहीय.
या सर्वांमध्ये कोणी सुखी असेल तर ती म्हणजे माझी आई. कारण तिला या निवडणुकीचा किंवा त्याच्या निकालाचा कोणताच आणि कसलाही फरक पडत नाही. कारण तिला माहीत आहे की सरकार कोणतेही आले तरी, तिला महिन्याकाठी मिळणाऱ्या तिच्या पेन्शन मध्ये कोणताच फरक पडणार नाहीय. वर्षानुवर्षे ती जशी चालू आहे तशीच चालू राहणार आहे. तिच्यासाठी तोच काय तो विकास असावा. तिने सरकारकडून कोणतीच अपेक्षा ठेवली नसावी.
चहाची वेळ झाली होती. आईने गरमागरम चहा टाकला होता. इतक्यात दरवाज्यावर काही लोकांचा घोळका हातात भडंगची पाकिटे घेऊन उभा होता. काही तासांपूर्वी ज्या आजोबांनी भर उन्हात "ताजे चिरमुरे" विकले होते, त्याच चिरमुऱ्याना झणझणीत मसाला लावून त्याचं "भडंग" च्या पाकीट मधून वाटप सुरू झालं होतं. ज्यावर लिहलं होतं, "चळवळ टिकली पाहिजे."
लोकांनी त्यांची चळवळ सुरू केली होती. पण ती चुकीच्या मार्गाने जात होती. कारण चळवळ ही कोणत्या पक्षाला किंवा नेत्याला सोबत घेऊन टिकवली जाऊ शकत नाही. काही तासच शिल्लक राहिले होते. तशी एक रात्रच शिल्लक होती. राज्याची समीकरणे बदलणार होती. लोकांची प्रश्ने मात्र तशीच राहणार होती.
सकाळ झाली तसा मी चहा घेऊन पूर्ण तयारीनिशी मतदान करण्यासाठी घराबाहेर पडलो. काही चेहऱ्यावर उत्साह तर काही ठिकाणी मोठे प्रश्नचिन्ह दिसत होते. मला मात्र त्या निळ्या शाईची घाई लागली होती. कारण मला माहित झाले होते की,
"सत्ता का खेल तो चलेगा,
सरकारे आयेगी जायेगी,
पार्टीया बनेगी बिगडेंगी,
मगर ये देश रेहना चाहीये,
इस देश का लोकतंत्र अमर रेहना चाहीये,""
Continued.. .
_whosunilmali

खूप सुंदर आणि मार्मिक तसेच अभ्यास पुर्ण लेखन...👌👌👌👌✍🙏
ReplyDelete😮🙌
DeleteThis comment has been removed by a blog administrator.
ReplyDelete