Posts

सपनों का IdiotBox//0.4

"ATM चोर" दिवसभर न जेवलेने अथवा वेळेवर न जेवलेने कदाचित मला ऍसिडिटी झाली असावी. कारण, शरीरातील पित्त समुद्रमंथन व्हावे तसे वर खाली होत होते. सोबत मलाही वर खाली करण्यास भाग पाडत होते. चारी बाजूंनी आभाळ एकदम गच्च व्हावे, तसेच एकंदरीत डोक्याची अवस्था बनली होती. काही क्षण वाटायचे की, घालावा डोक्यात हात आणि जो काही extra गच्च करणारे मटेरियल आहे, त्याला बाहेर काढून फेकून दयावं. मग डोकं निवांत होऊन जाईल व शांतपणे झोपता येईल. नेमकं कोणत्या विशिष्ट कारणांनी माझं डोकं दुखत असेल, अश्या विविध कारणांवर मी शोधविचार करीत होतो. त्या विचारांमध्येच अर्धवट पहायचा राहिलेला 'पिकू' सिनेमा मी पहायला घेतला. पण, जसजसा दीपिका आणि इरफान (irrfan) चा लव्ह angle सिनेमाच्या एन्डकडे जात होता. तसतसा माझ्या शरीरातील पित्ताचे मंथन पिकूमधील बच्चनच्या लुज मोशन सारखे तोंडातून बाहेर येण्याचा प्रयत्न करीत होते. न राहवून मी मोबाईल तसाच बाजूला टाकून दिला व दोन्हीं हातांनी जोरजोराने डोके चेपू दाबू लागलो. मध्येच बॅटरी कमी असा वॉर्निंग सिग्नल मोबाईलने दिला. लागलीच एका हाताने कसाबसा मोबाईल चार्जला लावून दिल...

सपनों का IdiotBox//0.3

मेस्ट्रो (चोरी नाही अपहरण) शेजारच्या घरातून ऐकायला येणारी कुजबुज नेहमीच माझी झोपमोड करणारी ठरायची. कधी दिवसां कधी मध्यरात्री. एक शब्द न शब्द त्यांच्या संवादातील माझ्या कानावर पडायचे. Actually तो संवाद नसायचाच. ती एक कुजबुज असायची स्पष्ट ऐकू न येणारी पण झोपमोड करून जाणारी. असं वाटायचं जणू काही त्यांच्यामध्ये एखादी दहशतवादी मिटिंग चालू असावी. आणि त्यांचं नेक्स्ट टार्गेट मीच आहे. जेव्हा त्यांना समजेल की, त्याच्या मिटींग मधील एक शब्द न शब्द मी ऐकत असतो. त्या क्षणीच ते माझ्यावर सहकुटुंब हल्लाबोल करणारे होते. असो, डिग्रीचे दिवस सुरू होते. दुसऱ्याच दिवशी माझ्या एका न सुटणाऱ्या अवघड विषयाची फायनल exam होती. अन् मी त्या दहशतवादी कुटूंबाची कुजबुज ऐकत अभ्यासाचे नियोजन करीत होतो. वेळापत्रक पाहताक्षणी माहीत झाले होते की, दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी थंडीमध्ये कुडकुडत परीक्षेला जावे लागणार. पण मला थंडीपेक्षा त्या गोल्डन विषयाचं जास्ती टेन्शन होतं. कारण, जर यावेळीही मी त्या विषयात नापास झालो, तर माझं पूर्ण वर्ष पुन्हा एकदा बेकार जाण्याच्या मार्गावर होते. माझ्यासोबत माझा मित्र "प्रा" सुद...

"ताजे चिरमुरे"

Image
खुप दिवसांपासून मनात कोणता विषयच तयार होत नव्हता. काय लिहावे, कोणत्या विषयावर लिहावे, कसे लिहावे, लिहिलेलं इतरांना आवडेल का.?! असे खूप प्रश्न शोधत असताना अचानक एक रिक्षा दिसली, जी बाजूच्या गल्लीतून आवाज करत निघत होती. लक्षात ठेवा बाग. नारळाची बाग.. . सगळ्यांना सांगा बाग. नारळाची बाग.. . विसरू नका नारळाची बाग.. . पहिल्यांदा ऐकुन खूप गमतीशीर वाटलं. पण नंतर समजले की, काही दिवसांनी येणाऱ्या निवडणुकीसाठीचा हा प्रचार चालू आहे. काही वेळाने ती रिक्षा गल्लीचे चार पाच फेऱ्या मारून निघून गेली. पण मनातील प्रश्न अजूनही त्याच जागी होते. त्यांना कोणता विषयच सापडत नव्हता. वेळ निघून जात होती. दुपारचेअंदाजे बारा एक वाजणार होते. पोटाची भूकही हळूहळू वाढत होती. पण डोळ्यांना नकळत थोडीशी डुलकी लागणार इतक्यात नेहमीच्या वेळी ऐकू येणारे ते शब्द हळुवार कानावर येऊन पडत होते, "ताजे चिरमुरे.. . ताजे चिरमुरे.. .'' लहान असल्यापासून चिरमुरे विषयी एक वेगळंच आकर्षण असायचं. तात्पुरती भूक म्हणून चहासोबत आम्ही नेहमी चिरमुरे खायचो. मंदिराच्या ठिकाणी सुद्धा प्रसाद म्हणून सर्रासपणे चिरमुरेच वाटले जातात. ...

ओय हमाली.!!

Image
Exactly, बरोबर ऐकलंय तुम्ही. पण कुठे ऐकलं असेल.?? रेल्वे स्टेशन. बस स्टँड. विमानतळ मध्ये हमाली असतो की नाही याची मलाही कल्पना नाहीय. पण असेलही कदाचित. तोच हमाली जो आपण लोकांनी लहानपणी पाहिला असेल. बच्चनच्या कूली मध्ये किंवा लक्ष्याच्या हमाल दे धमाल मध्ये. खाकी पेहरावात रुबाबदार मिश्या आणि त्यावर इस्त्री मारलेली तशीच खाकी टोपी. सोबत खांद्यावर ती लाल बावट्याची निशाणी म्हणून टाकलेला लाल रुमाल. रेल्वे आली रे आली पटकन मळलेली तंबाखू तोंडात टाकायची आणि तडक प्रवाश्यांच्या बॅगा डोक्यावर घ्यायच्या. पुढे हमाली आणि मागे त्या बॅगेचा मालक हे चित्र आपण सर्वांनी पाहिलेलं असेल. किमान गोविंदाच्या कूली नं.1 मध्ये तरी पाहिला असेलच. पण, त्या रात्री जेव्हा मी आणि माझा मित्र एका बस स्टँडवर गेलो होतो, तेव्हा त्या बस स्टँडवर एका वयस्क माणसाने आम्हाला हाक दिली. "ओय हमाली.!!""" नाही.... अशी हाक नव्हती मारली त्याने. पण त्याचा त्या हाकेमागचा उद्देश तोच असावा. "अरे पोरांनो... मला थोडी माझी सायकल बसवरून काढून देता का रे.?!" अतिशय क्षीण आवाजात त्याने आम्हाला विनंती केली. प...

सपनों का IdiotBox//0.2

Image
"Mother इंडिया एक्सप्रेस" भारतीय रेल्वेची पेपरला जाहिरात आली होती की, लोको पायलट हव्या आहेत म्हणून. शिक्षण, वयोमर्यादा, अनुभव याचा काहीच उल्लेख नसल्याने खुश होऊन माझ्या mother इंडियाने हा फॉर्म भरला होता. कथित बेरोजगारीच्या या भीषण आगीत आमच्यासाठी ही सुवर्णसंधी आयतीच घरामध्ये चालून आली होती. आणि माझी आई, माझी mother इंडिया भारतीय रेल्वेमध्ये लोको पायलट पदावर रुजू झाली होती. Actually हे स्वप्न मला दोन पार्ट मध्ये पडलं होतं. म्हणजे सलग दोन दिवशी थोडं थोडं पाठोपाठ. असं चुकूनच होत असेल कदाचित. So, पहिल्या पार्ट मध्ये माझी mother इंडिया भारतीय रेल्वेत लोको पायलट म्हणून, आपल्या पहिल्या दिवशीच्या ड्युटीवर डायरेक्ट रेल्वे इंजिन मध्ये हजर झालेली असते. माझी आई रेल्वेत पायलट झाली याचा सर्वात जास्त आनंद मलाच झालेला असतो. कारण गेली दीड एक वर्षे मी बिनपगारी घरीच बसून होतो. त्यामुळे एक सुशिक्षित बेरोजगाराचे स्वप्न एक बेरोजगार आईच समजू शकते. Nokia1100 मॉडेलचं टॉर्चही चालू न करता येणारी माझी mom भारतीय रेल्वेची एक्सप्रेस कशी चालवेल याचा मी अगोदर विचारच केला नव्हता. पण हा विचार न केल्य...

सपनों का IdiotBox/0.1

अजूनही मी स्वप्नातच होतो. पूर्ण रात्र त्या चौकातच उभा होतो. या गल्लीतून त्या गल्लीत घिरट्या घालत होतो. काळजीने मन चलबिचल झाले होते. मला समजत नव्हते की, ती कुठे गेली असावी.!! घरी नाहीय, चौकातल्या कट्टयावर नाहीय, मग गेली तरी कुठे.?? ती हरवली तरी नसेल.!! रात्रीचे जवळपास साडेतीन चार वाजले होते. सर्वत्र भयान शांतता असताना मी मात्र त्या चौकात सैरावैरा फेऱ्या मारत होतो. माझी नजर फक्त तिचाच शोध घेत होती. कारण, काही तासांपुर्वीच आम्ही एकत्र त्या कट्टयावर बसलो होतो. आम्ही म्हणजे ती, मी, आणि तिची आई.!! माझी आणि तिच्या आईची खूप चांगली ओळख होती. तशी तिची आणि माझी सुद्धा ओळख फार जुनी होती. पण ती नुसती ओळखी पुरतीच मर्यादीत. रात्रीचे पाय मोकळे करायचे म्हणून ते दोघे घरातून बाहेर आले होते. म्हणूनच मी सुद्धा त्या दोघांना जॉईन झालो होतो. रात्रीच्या त्या थंड हवेत तिला पाहताना अंगावर एक वेगळेच शहारे येत होते. अधून मधून येणारी एक हलकीशी झुळूक तिच्या चेहऱ्यावरील विस्कळीत केसांसोबत वेगळाच खेळ खेळत होती. आपल्याच विश्वात वावरणारी, मनातलं कधी ओठांवर न आणणारी ती. मी तिला फक्त लांबूनच पाहत होतो. कारण, माझ्यास...

"शिक्षणाच्या आयचा घो..!!"

Image
चौकातल्या कॉर्नर वर एक सहा वर्षांचं पोरगं गळ्यात पाण्याची बॉटल अडकवून स्कूल बसची वाट पाहत बसलेलं होतं. तर दुसरीकडे त्याच वयाचं दुसरं पोरगं बैलगाडीतुन जात जात अगदी निरागस होऊन त्या दुसऱ्या मुलाकडे पाहत आपल्या बापाला म्हणतं, "बा... म्यां पण साळा सिकणार.!" अवाक नजरेने बैलगाडी थांबवून बाप मनातल्या मनात पुटपुटतो, 'माझं बी पॉर साळा सिकावं.. मोठं व्हावं.!' आज विसावे शतक.  विज्ञानाच्या आधारे पुढे चाललेलं शतक. याच विसाव्या शतकात एका बाजूला श्रीमंताचं पोर गळ्यात बॉटल अडकवून बसची वाट बघतयं, तर दुसऱ्या बाजूला गरीबाचं पोर आपल्याच बापासोबत चहाच्या टपरीवर मोलमजुरी करताना दिसतंय.! ज्या मुलांना जगण्यासाठी मोकळा श्वाससुद्धा घेता येत नाही, दोनवेळच्या भाकरी साठी बापासोबत चाकरी करावी लागते, ना दसरा ना दिवाळी ना ईद.! सगळं विसरून कशाचीही खंत न बाळगता बालपणाचा गाडा कसातरी पुढे ढकलणाऱ्या त्या कोवळ्या जीवावर केव्हा फुलणार हा शिक्षणाचा गंध. त्यांनी कधीच शिकायचं नाही.! की त्यांना अधिकारच नाही शिकण्याचा, प्रगतीचा, पुढे जाण्याचा, समाजाला बद्दलन्याचा.!!  शिक्षणाचा नारा खरचं पोचला आहे क...

While watching PORN...nd.

Image
Actually सर सॉरी सर.... प्लीज सर... आम्ही काहीच केलं नाहीय.. सॉरी सर... हा लैपटॉप आमचा नाहिये सर... सर चूक झाली... सॉरी न सर... पाया पडतो हवं तर...!!! भीतीने आम्ही घामाघुम झालो होतो. शासकीय वसतिगृह हातकणंगले, रूम नं. 25. खिड़कीच्या काचा व्यवस्थितपणे बंद करून मी आणि माझा जूनियर लैपटॉप समोर बसलो होतो. तसा तो लैपटॉप दुसऱ्याच मित्राचा होता. टाइमपास म्हणून मीच तो बाहेर काढला होता. मूवीज च्या फोल्डर मध्ये जाऊन पाहिलो तर त्यामध्ये मस्ती, ग्रैंड मस्तीचे पार्ट आम्हाला दिसले. जूनियरने नुकतीच अकरावी ला एंट्री केली होती. त्यामुळे त्याला ग्रैंड मस्ती पाहण्याची खुपच घाई लागली होती. आणि त्याच्या संगतीने मला सुद्धा मस्ती अनुभवायची संधी भेटली होती. पण मनामध्ये थोडीशी धाकधुक चालू होती. त्यामुळे सुरक्षा म्हणून आम्ही लोकांनी खिड़कीला एक पडदा लाऊन घेतला. कारण, काही दिवसांपूर्वीच वार्डन सरांनी एका आठवीच्या मुलाला रंगेहाथ PORN पाहताना पकडले होते. आणि सर्वांना धमकीवजा इशारा दिला होता की, मोबाइल किंवा लैपटॉप मध्ये काही अश्लील साहित्य सापडल्यास त्याला वसतिगृहातुन हाकलुन देण्यात येईल. त्यामुळेच, ग्रैंड ...

"ती"

Image
Ti........, निसर्ग आणि प्रेम यांचं एक अतूट नातं आहे. निसर्गामधील प्रत्येक अशी गोष्ट जी प्रेमाशी मिळतीजुळती असते. जसे की, मी, तो पौर्णिमेचा चंद्र आणि "ती"""""" त्या चंद्रासारखंच आहे तिचं सौंदर्य, निर्मळ असं........ त्याच्या शुभ्र प्रकाशात मी तिलाच शोधत असतो, कधी लहान तर कधी मोठा होत असतो तो, अगदी तिच्या सौंदर्या सारखाचं, पण मला नाही फरक पडत, मी वाट पाहतच असतो, कधी पहाटे तर कधी रात्रि, पण काळजी तेव्हाच वाटते, जेव्हा ती अचानक एक दिवस गायब होते, त्या अमावस्येच्या रात्रि......... तरीही, मी भान हरपुन जातो, लक्ष नसतं की, त्या चंद्रासोबत खुप चांदण्या सुद्धा आहेत, चांदण्या लुकलुकत आहेत, आपलं सुद्धा सौंदर्य दाखवायचा प्रयत्न करीत आहेत, भांडत आहेत, त्या प्रयत्ना मध्ये तुटून पडत ही आहेत, पण तुला पाहण्यासाठी आतुर झालेले मन, त्या तुटलेल्या ताऱ्यांना पाहुन अपेक्ष्या ठेवणंच विसरून गेले आहे. मन मात्र, तुझाच चेहरा शोधन्यात मग्न आहे. तू काळजी नको करू, मी ही त्या ध्रुव ताऱ्यासारखाच आहे. कदाचित तुलाही न दिसणारा, त्याच जागी, त्याच वेळी,...

मी नाना पाटेकर नव्हेच..!!

Image
श्री महालक्ष्मी प्रसन्न... श्री तुळजाभवानी प्रसन्न... जय भवानी जय जिजाऊ............आणखी काय असतं बरं, ते येणाऱ्या नऊ दिवसांमध्ये दिसेलच. पण मी मागील नऊ दिवसांचा विचार करत होतो. न्यूज़पेपर चाळत होतो. कारण कुठेतरी ऐकायला भेटत होते की, नाना पाटेकर यांनी एका महिलेशी छेड़छाड़ करण्याचा प्रयत्न केला. "असा नट होणे नाही." म्हणून मोठ्या दिमाखात नटसम्राट मी सुद्धा पाहिला होता. त्यामुळेच माझ्यासाठीही क्षणभर खात्री पटणे अशक्यच होते. पण "असाही नट होऊ शकतो." हेही तितकेच खरे असावे. त्यामुळेच, शहानिशा करण्यासाठी म्हणून खुप गांभीर्याने शोध घेत होतो. अगदी मागील नऊ दिवसांचे सर्व न्यूज़पेपर चाळून पाहिले. पण कुठेच नाना दिसत नव्हते. आणि इतक्यात ते दिसणार ही नव्हते. कारण सर्वजण मी नाना नव्हेच. मी आलोकनाथ नव्हेच. मी रजत भाटिया नव्हेच. असंच बोलत होते. आणि त्यांचेही बरोबरच आहे. कारण त्यांच्या दृष्टीने कदाचित छेड़छाड़ प्रकरण ही इतकी गांभीर्याची गोष्ट नसावी. पण त्याचवेळी कुठेतरी जाणीव होत होती की, आपण अजूनही त्याच संस्कृतीप्रधान देशात आहोत. ज्या देशामध्ये जेव्हा एखादा पुरुष एख...

"पुढच्या वर्षी नक्की या... ."

Image
Hello, माइक चेक...., एक दोन तीन चार...गणपतीचा..., कृपया मंडळांनी वाहनांची गर्दी करू नये..., गणपती बाप्पा मोरया... पुढच्या..., निर्माल्य तळ्यामध्ये टाकू नका..., स्त्रियांनी लहान मुले व गळ्यातील दागिने सांभाळावित..., पाणी बोटल..पाणी..पाणी बोटल..., तुझको फिरसे जलवा दिखाना ही...., मंगलमूर्ति मोरया....,, रात्रीचे जवळपास बारा एक वाजले असतानाचे चित्र आहे हे. फुटाळा तळ्यावरचे. विजांचा सौम्य कड़कड़ाट, सोबतच ढोल ताश्यांच्या गजरामध्ये गणरायाला निरोप देण्यासाठी अगदी शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक चालू होती. अगदी वेगळ्याच स्वरूपाची विसर्जन मिरवणूक पहायला मिळाली. ना DJ होता. ना बैंड वा झांज पथक. ना कसला गोंधळ. मंडळ असो वा घरगुती बाप्पा असो, सर्वजण आपापल्या बाप्पाला घेऊन जल्लोषात, कोणी ट्रक तर कोणी ट्रैक्टर मधून येत होते. तर कोणी आपल्याच चारचाकी मधून किंवा चक्क बैलगाडीतून आपल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी आले होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता. अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्ति सर्वजण खुप खुश होते. काही लालबागच्या राण्यांचा उत्साहही अगदी पाहन्याजोगा होता. सगळ्यांच्या उत्साहाला का...

अब तक "25....."

Image
18 Sept..........' Belated Birthday whosunilmali. सुनिल माळी यांची आज जयंती।😀 कारण ही तसेच आहे। इथे स्वतःच्या bdy ची आठवण करून द्यावी लागते। Bytheway, thank you so much all of you। ज्यांनी मला वेळोवेळी माझ्या 18 sept ची आठवण करून दिली। ज्यांनी मला माझ्या आनंदात आणि संकटात तितकीच मोलाची साथ दिली, त्या सर्वांचा मी ऋणी आहे। आयुष्याच्या आजवरील प्रवासाबद्दल बोलायचे झाले तर, हा प्रवास म्हणजे थिएटर मधील एका सिनेमा सारखाच आहे। आणि आज त्या सिनेमाचा "Interval" आहे. आज त्या सिनेमाची 25 एपिसोड्स पूर्ण झाली आहेत। आणि मी या सिनेमाच्या प्रमुख भूमिकेत आहे। ज्याला आजवर समजायला इतका वेळ लागला आहे की, त्याचा हा सिनेमा हॉलीवुड आहे, बॉलीवुड, की टॉलीवुड आहे। असो मला माझ्या सिनेमाची भूमिका करत असताना खुप मजा आली आहे। पण आजचा हा Interval माझ्या इथून पुढील प्रवासाची दिशा ठरवणार आहे। हाच एक क्षण असतो, जो आपल्याला आपल्या आयुष्याच्या हाइलाइट्स मध्ये घेऊन जातो। काही वर्षांपूर्वी ज्या आतुरतेने मी 18Sept ची वाट पहायचो, ती आतुरताच हळूहळू कमी होत जाते। कारण दहा वर्षांपूर्वी ज्यावेळी ...

सपनों का IdiotBox

काळू पळाली....की पळवली...?? "मादरचोद खरं खरं बोल, नाहीतर नागड़ा करून बैटने उभा आडवा फोडून काढीन." समोर उभ्या असलेल्या खाकी वर्दीतल्या कॉनस्टेबलला बघून मला स्वतःमध्येच गणेश गायतोंडे दिसू लागला होता. क्षणभरासाठी पायाखालची जमीनच सरकली होती. गावामध्ये काहिशे तणावग्रस्त वातावरण बनले होते. माणसांचा जमाव एकत्र जमलेला होता. पण सर्वजणच भयभीत होते. सर्वत्र पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जणू काही एखादी नक्षली मोहीम चालु असावी अशी. कोपऱ्यामध्ये टक लावून बसलेल्या एका आज्जीला मी विचारून घेतलं. परंतु त्या आजीचीही अवस्था माझ्याहुनही वाईट बनली होती. इतक्यात त्या गर्दीमधून एक आवाज आला, "एका एकाची झाडून चौकशी घ्या. सुटला नाही पाहिजे. आमदाराच्या पोरीला पळवली आहे साल्याने. जिथे असेल तिथून शोधून काढा." माझ्या डोक्यामध्ये काहिशी ठिनगी पेटली. कारण बाजूच्या गावामधील आमदाराची पोरगी पळाली होती. आणि तिला शोधण्यासाठीच ही सर्व ओढ़ातान चालू होती. पण बाजूच्या गावातील आमदार, आणि त्याची पोरगी म्हणजे "काळू" असावी, असेच मला वाटू लागले होते. होय, तीच काळू जिला मी गेल्या वर्...

"भूक"

Image
कामठीपुरा, गंगा-जमुना, बुधवार पेठ, गोकुळनगर.......?? महाराष्ट्रातील वेश्या व्यवसायासाठी प्रसिद्ध असलेली काही ठिकाणे. आपल्याला माहीत आहेत का..?? नाही ना..!! तर माहिती करून घ्या. कारण इथे समाजातील पुरुष लोकांची "भूक" भागवली जाते. #SparklingCityOfDreams काही दिवसांपूर्वी सहजच सोशल मीडिया चाळत होतो. तर एक पोस्ट ठळकपणे वाचनात आली.(शेयर केली असावी) लेखकाने लेखातून एका वेश्या स्त्री ची व्यथा मांडली होती. अतिशय रंजक, विदारक, सत्य मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न लेखकाने लेखातून केला होता. खुप सकारात्मक प्रतिसाद ही मिळाला होता, त्या लेखाला व लेखकाला सुद्धा. "वेश्या ही एक वेश्या नसून ती एक "वारांगणा" असते... चित्रपटात काम करणाऱ्या बोल्ड हिरोइन पेक्ष्या वेश्या कधीही श्रेष्ठच...सत्य उघडपणे मांडले आहे...खुप छान.." वगैरे वगैरे. पण, वेश्याव्यवसाय करणाऱ्या 'स्त्री' च्या वेश्येपणाची मांडणी करत असताना, आपण एका स्त्रीला सुद्धा उघडपणे नागड़े करत आहोत, याचा लेखकाला कदाचित विसर पडला असावा. असे त्या लेखातून स्पष्ट होत होते. त्यातीलच एक प्रतिक्रिया अशी होती, जी ...

"वळू"

Image
तुम्ही लोकांनी बोलणारा पोपट ऐकला असेल. पण मी बोलनारा "वळू" पाहिला आहे. हो अगदी जवळून. माझा खुप जवळचा मित्र. पण, तुम्हाला प्रश्न पडला असेल की, याने असा "वळू" पाहिला कुठे आणि कसा. तेही चक्क बोलणारा..!! साहजिकच....मलाही पडला होता. माणसांच्या या गर्दीमध्ये माणसानेच बोललेले ऐकायला कोणी नसताना, या वेड्याने कोणत्या वळूचा आवाज ऐकला. असेच वाटत असणार. वाटायला मजेशिर असली तरी मी त्याचा प्रत्यक्ष्यदर्शी अनुभव घेतला आहे. हेही खरचं आहे. तसा मी मात्र खुपच कमी बोलतो. कारण माझ्याकडे बोलायला खुप काही आहे. पण ते ऐकून घेणारे कोणी भेटलेच नाही. खुप एकटा पडलो होतो मी. एक माझीच दुनिया बनवली होती मी. त्यामध्ये फ़क्त मी आणि मीच होतो. पक्ष्यांचा किलबिलाट, वाऱ्याची झुळुक, मावळता सूर्य, नदीचा संथ प्रवाह, पावसाची रिपरिप, आणि आकाशातले चंद्र-तारे यांच्याच सहवासात होतो मी. खुप एकटा. दिवस मावळत होते. महीने पलटत होते. पण विचारांचे चक्र मात्र भूतकाळ, भविष्यकाळ यापेक्ष्या वर्तमान कसे जाईल यातच व्यस्थ होते. स्वतःची ओळख शोधण्याचा प्रयत्न करत होते. अश्याच एके रात्री मी फुटाळ्यावर गेलो होतो. ...